मडिलगे मंगाई पुलाच्या ओढ्यात.- अज्ञात पोल्ट्री व्यवसायिकांनी मेलेल्या कोंबड्यां – टाकून परिसरात केली दुर्गंधी.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा मडिलगे नजीक गडहिंग्लज रोड कडे १ किमी अंतरवर मंगाई ओढ्यानजीक यापूर्वी व सध्या मेलेल्या कोंबड्यांचा कचरा १० ते १२ गोणी भरून मेलेल्या कोंबड्यां टाकून दुर्गंधी पसरली असून सद्या संकेश्वर बांदा महामार्गाचे काम सुरु असून इतर पुलांवर दुरुस्ती व.काही ठिकाणी नवीन पुलाचे काम सुरु असल्याने हिच संधी साधून पोल्ट्री व्यवसायिक यांनी मंगाई नावाच्या पुलावर सदरचा पूल हा महामार्गात जाणार नसल्याने महामार्ग अधिकारी कॉन्ट्रॅक्टर कर्मचारी यांचे लक्ष नसल्यामुळे.
याची संधी साधून असा किळसवाना प्रकार अज्ञात पोल्ट्री धारकांनी केला आहे. येथील नजीकच्या शेतकऱ्यांना शेतामध्ये दुर्गंधीचा सामना करत काम करावी लागत आहे यामुळे रोगराई दुर्गंधी पसरत आहे जर जोराचा पाऊस झाला. तर सदरची दुर्गंधी घाण ही नदीत मिसळून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होणार आहे तत्पूर्वी आरोग्य विभागाने व मडिलगे ग्रामपंचायत यांनी विभागातील पोल्ट्री धारकांना सूचना द्याव्यात. व सदर दुर्गंधी पसरलेल्या कोंबड्यांची घाणीच्या गोण्याची दफन करून फवारणी करून घ्यावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांच्या कडून होत आहे.
अश्याच गोण्या डागवर देखील आहेत त्याची देखील दक्षता घेण्यात यावी..