🛑एस. टी फेऱ्या पूर्णता बंद केल्याने – शाळेच्या विदयार्थ्यांची गैरसोय
( ग्रामपंचायत मौजे इटेचे आजरा आगाराला निवेदन.- रस्ता रोको चा इशारा..)
🛑श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर व्याख्यानमाला पुष्प पहिले वक्ते डॉ. सी. बी. देसाई विषय ‘आयुर्वेद : जीवनाची विविध अंगे
आजरा.- प्रतिनिधी.

मौजे इटे, ता. आजरा या गावी आपल्या आगारा कडून सकाळी ६.३५, ९.३५, दुपारी १२.३५, ३.३५ व सायंकाळी ५.३५ अशा एस.टी बस चालू आहेत. परंतु सद्या त्या एस.टी बसेस वेळेत न येणे तसेच रविवारच्या फेऱ्या पूर्णता बंद करणे अशामुळे शाळेच्या विदयार्थ्यांची गैरसोय होत आहे. तसेच रविवारी सुट्टीच्या दिवशीही विदयार्थ्याचें ज्यादा तास असलेने त्यांची गैरसोय होत आहे. तरी वरील वेळेप्रमाणे आमच्या येथे एस.टी बसेस सोडून आमच्या गावच्या प्रवाशांचे व विद्यार्थीची गैरसोय टाळावी हि विनंती तसेच सायंकाळी ५.३५ ला सोडणारी बस ही आवंडी व इटे स्वतंत्र सोडणेत यावी. वरील वेळेच्या बाबतीत आम्ही वेळोवेळी तोंडी व लेखी तक्रार देऊनही आमच्या गावावर अन्याय होत आहे. तरी वरील प्रमाणे एस.टी. फेऱ्या या न सोडल्यास आम्ही सोमवार दि. ३०/१२/२०२४ इ. रोजी खानापूर फाटा येथे सकाळी ११.०० वाजता रास्ता रोको करणार आहोत. या निवेदनावर

नामदेव फगरे, प्रियंका पेडनेकर अनिल पेडणेकर शिवाजी पाटील, अशोक पाटील अनंत तेजम, विष्णु सुतार यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
🛑श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर व्याख्यानमाला पुष्प पहिले वक्ते डॉ. सी. बी. देसाई विषय ‘आयुर्वेद : जीवनाची विविध अंगे’
आजरा.- प्रतिनिधी.

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा यांच्यावतीने आयोजित व्याख्यानमालेचा शुभारंभ आजऱ्याचे सुपुत्र, ख्यातनाम साहित्यिक ‘मृत्युंजय’ कार शिवाजी सावंत यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने मान्यवरांचे हस्ते करण्यात आहे. व्याख्यानमालेतील पहिले व्याख्यान डॉ. सी. वी देसाई (यादगुड कर्नाटक) यांच्या ‘आयुर्वेद : जीवनाची विविध अंगे’ या विषयावर संपन्न झाले.
सदृढ आरोग्यासाठी आपली नैसगिक जीवनशैली आत्मसात करा, दोन वेळा जेवा आणि भरपूर काम करा. भारतीय आयुर्वेद ही एक श्रेष्ठ उपचार पध्दती आहे. आयुर्वेदाने शारीरिक व मानसिक आरोग्य सदृढ राखणे शक्य आहे. माणसाने प्लास्टीक, फॅन, फीज, फ्लॅट व फीयाट या पाच गोष्टी टाळल्या तर अनेक आजार होण्यापासून बचाव होऊ शकतो. आजार झाल्यानंतर वैद्याकडे जाण्यापेक्षा आजार होणार नाही याची दक्षता आपल्या आहार विहारातून घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले कडधान्ये शरीरासाठी उपयुक्त असली तरी ती मोड न आणता खावीत कारण मोड आलेल्या काडधान्यामुळे शरीरातील अनाश्यक पेशी वाढून कॅन्सरसारख्या आजाराचा धोका संभावतो प्राचिन भारतीय मुद्रापध्दती, अॅक्युप्रेशर, अॅक्युपंक्चर, गोंदण, स्वातीजल, नक्षत्रवन याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले उपस्थीत श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.

कार्यक्रमाला डॉ. अनिल देशपांडे, जयवंतराव शिंपी, डॉ. धनाजी राणे, अनिकेत चराटी, धनंजय वैद्य, डॉ. अंजनी देशपांडे, डॉ. रश्मी राऊत, डॉ. गौरी भोसले, रचना होलम, स्वरूपा देसाई, कार्यवाह कुंडलिक नावलकर, रविंद्र हुक्केरी, संभाजीराव इंजल, बंडोपंत चव्हाण, सुभाष विभुते, महंमदअली मुजावर, विजय राजोपाध्ये, अनिकेत गाडगीळ, किरण प्रधान, राजकुमार पाटील उपस्थीत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष श्री वामन सामंत होते. श्री संदिप प्रकाश वाटवे यावेळी प्रमुख उपस्थित होते. उपाध्यक्षा विद्या हरेर यांनी सुत्रसंचालन केले.