HomeUncategorizedराजा शिवछत्रपती परिवार महाराष्ट्र - कोल्हापूर जिल्हा परिवार - आयोजित, (बावेली पदभ्रमंती...

राजा शिवछत्रपती परिवार महाराष्ट्र – कोल्हापूर जिल्हा परिवार – आयोजित, (बावेली पदभ्रमंती मोहीम क्र. ६२.- यशस्वी संपन्न.)

राजा शिवछत्रपती परिवार महाराष्ट्र – कोल्हापूर जिल्हा परिवार – आयोजित, (बावेली पदभ्रमंती मोहीम क्र. ६२.- यशस्वी संपन्न.)

गगनबावडा.- प्रतिनिधी.

राजा शिवछत्रपती परिवार कोल्हापूर परिवार आयोजित “बावेली” पदभ्रमंती मोहीम क्र. ६२
शिव’काळ अनुभव बावेली पदभ्रमंती मोहीम यशस्वीरित्या रविवार दि. २७ रोजी संपन्न झाली. मौजे कडरवाडी या ठिकाणी मावळे व रणरागिनी यांच्या उपस्थितीत शिवप्रभूंना अभिवादन करत राष्ट्रगीत, ध्येयमंत्र, प्रेरणा मंत्राने मोहिमेला सुरुवात झाली. येथील स्थानिक रणरागिणी यांनी मर्दानी खेळाचे प्रदर्शन दाखवले
या मोहिमेस कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील बेळगाव सीमाभागातील तालुक्यातील शिवभक्त या ठिकाणी पोचले होते. या मोहीमेला राज्यातून जवळपास सर्व तालुक्यातील १६६ शिवभक्त मावळे व रणरागिनी या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवून या राजा शिवछत्रपती परिवाराच्या माध्यमातून गड संवर्धन जपण्याचे कार्य केले जाते. हा मनोमनी ध्येय, ध्यास, व उद्देश डोळ्यासमोर ठेवून परिवाराच्या नियमाचे पालन करत या मोहीमा यशस्वी होत असतात
छत्रपती शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत प्रत्येकाने गड संवर्धन राखले पाहिजेत गडाचे पावित्र्य प्रत्येकाच्या ध्यानीमनी असावे ही गोष्ट काही सांगण्यासारखी नाही. परंतु आजच्या बदलत्या व डिजिटल युगातील काही तरुण पिढीला सांगणे समजावणे भाग पडत आहे. गडाचे पवित्र्य म्हणजे प्रथम स्वच्छता गडावरती कोणती कृती करावी याचे भान ठेवून गड किल्ल्यावर यावं प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या, कचरा गडावर फेकून देऊन आजचे तरुण मंडळी व नागरिक फक्त मनसोक्त गड किल्ल्यावर सेल्फी व फोटो विरंगुळा म्हणून येत असतील तर हा शिवप्रभूंचा अवमान आहे.
म्हणून “शिवकार्य करूया” स्वच्छता राखूया, गडकिल्ल्यांचे संवर्धन करूया, आजही महाराष्ट्रातील अनेक गड किल्ले दुर्लक्षित आहेत. या गडकिल्ल्यांचे पुनर्वसन झाले पाहिजेत पण पुरातन विभागाचे देखील याकडे दुर्लक्ष व कानाडोळा होत आहे. प्रत्येक गड किल्ल्या आवारातील स्थानिक प्रशासन याची गडकिल्ल्यांचे संवर्धनाबाबत दुर्लक्ष होय आहे. लोकप्रतिनिधींना विकास कामासाठी शासन कोट्यावधीचा निधी देतो मग गड संवर्धनासाठी का नाही. असाही राज्यातील शिवभक्ताकडून भावना व्यक्त होतात. राज्यातील माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीसह शिवमंदिर गड किल्ले पुरातन विभागाने पाहणी करून पडझड झालेले बांधकाम करावे अशीही मागणी होत आहे.

राजा शिवछत्रपती परिवार पुणे. व कोल्हापूर परिवार – यांच्या वतीने शासनाने गड-किल्ल्यांचे संवर्धन व पडझड झालेले बांधकाम करून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व वास्तू जिवंत राहाव्या हा एकच.. अट्टाहास मावळ्यांच्या ध्यानीमनी असतो परंतु राजा शिवछत्रपती परिवार आपले शिवकार्य अखंडपणे करत असतो या मोहिमेला मौजै. करडवाडी. ता. गगनबावडा ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ व प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक यांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला. राजा शिवछत्रपती परिवारातील स्थानिक मावळ्यांनी या मोहिमेसाठी परिश्रम घेतले.

स्थानिक ग्रामस्थ व ग्रामपंचायत कडून राजा शिवछत्रपती परिवाराचे अभिनंदन.
【 येथील काटे घराण्याचा इतिहास व त्यांची शौर्यगाथा आज ही नोंद आहे. त्यांचे वंशजयांनी मोहिमेच्या उपक्रमात सहभाग नोंदवला परंतु इतिहासाच्या अनेक वर्षानंतर ही ज्या ठिकाणी पुरातन विभाग इतिहास तज्ञ प्रशासन या ठिकाणापर्यंत कोणीही पोहोचलो नव्हतो रविवार दि. २७ रोजी प्रथमच राजा शिवछत्रपती परिवाराचे मावळे व रणरागिनी यांनी फक्त या ठिकाणी पोचून माहिती न घेता घडाच्या टोकावर घनदाट जंगलातून व मुसळधार पावसातून अखेर ठिकाणावर पोचूनच येथील भगव्या निशाणावर नतमस्तक होण्याचे कार्य या परिवाराकडून झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ ग्रामपंचायत यांनी परिवाराचे अभिनंदन केले. 】

RELATED ARTICLES

1 COMMENT

Comments are closed.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.