Homeकोंकण - ठाणेपुण्यात डंपरने नऊ जणांना चिरडलं.- ( तिघांचा मृत्यू.- सहा जण गंभीर..)🛑पालकमंत्रिपदावरून जोरदार...

पुण्यात डंपरने नऊ जणांना चिरडलं.- ( तिघांचा मृत्यू.- सहा जण गंभीर..)🛑पालकमंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच.- महायुतीचे नेते कशाप्रकारे तोडगा काढणार?

🛑पुण्यात डंपरने नऊ जणांना चिरडलं.- ( तिघांचा मृत्यू.- सहा जण गंभीर..)
🛑पालकमंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच.- महायुतीचे नेते कशाप्रकारे तोडगा काढणार?

पुणे :- प्रतिनिधी.

पुण्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. डंपरने फूटपाथवर झोपलेल्या ९ जणांना चिरडले आहे. या अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. वाघोली केसनंद फाट्यावर ही अपघाताची घटना घडली आहे. फूटपाथवर हा डंपर गेला आणि झोपलेल्या ९ जणांना चिरडले. जखमींमधील सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
🅾️सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहाजण जखमी आहेत. जखमींना ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हे सर्व कामगार आहेत. डंपर चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे बोलले जात आहे. मृत्तांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, रविवारी मध्यरात्री कामगार कामासाठी अमरावती येथून कामानिमित्त वाघोली येथे आले होते. रात्री उशीर झाल्याने 12 जण फुटपाथवर झोपले होते. तर काही जण फुटपाथच्या बाजूला झोपले होते. मध्यरात्री साधारण 12.30 च्या सुमारस डंपर वेगात आला आणि फुटपाथवर झोपलेल्या कामगारांच्या अंगावर गेला. यात तिघांचा मृत्यू झाला असून सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून कारवाई कारण्याचे काम सुरू आहे.
🟥या दुर्घटनेत विशाल विनोद पवार (वय 22 वर्ष), वैभवी रितेश पवार (वय 1 वर्ष) आणि वैभव रितेश पवार (वय 3 वर्ष) या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात ६ जण जखमी झाले आहेत. जानकी दिनेश पवार (21), रिनिशा विनोद पवार (18), रोशन शशादू भोसले (9), नगेश निवृत्ती पवार (27), दर्शन संजय वैराळ (18) आलिशा विनोद पवार (47) अशी या ६ जणांची नावे आहेत. या दुर्घटनेतील जखमीवर आयनॉक्स हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले असून त्यांना ससून रुग्णालयात रवाना केले आहे. हे सर्वजण मूळ अमरावतीत राहणारे आहेत. या घटनेनंतर आरोपी डंपर चालक याला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या काही वैद्यकीय चाचण्याही करण्यात आल्या आहेत. या घटनेनंतर आरोपीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वैद्यकीय चाचणी करून त्याला अटक करण्यात आली आहे. असे समजते.

🛑पालकमंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच.- महायुतीचे नेते कशाप्रकारे तोडगा काढणार?

मुंबई :- प्रतिनिधी.

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील मंत्र्यांचं खातेवाटप झालं आहे. त्यानंतर लगेचच पालकमंत्रिपदावरून दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत. यामध्ये शिवसेनेच्या आमदारांनी आघाडी घेतल्याचं दिसतं आहे. त्यामुळे महायुतीच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांमध्येच पालकमंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे.
🟣महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाचं अखेर खातेवाटप झालं. मात्र, खातेवाटप होताच महायुतीत पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरु झाली आहे. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी मंत्री झाल्यानंतर लगेचच संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदावर दावा केला आहे. तिकडे रायगडमध्ये सुद्धा राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये पालकमंत्रिपदावरून दावे प्रतिदावे सुरू झालेत. राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत.. तर दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदावर दावा ठोकला आहे. दरम्यान नावाची अधिकृत घोषणा होईपर्यंत पालकमंत्रिपदावर कोणीही दावा करु शकत, असं शिवसेनेचे मंत्री शंभुराज देसाईंनी म्हटलं आहे. दोन दिवसांत पालकमंत्रिपदाचं वाटप होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
🟥राज्यातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रिपदासाठी चांगलीच रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्याच रस्सीखेच आहे. रायगडमध्ये आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात स्पर्धा आहे. इथे तर आपणच पालकमंत्री होऊ, असा विश्वास गोगावलेंनी व्यक्त केलाय. पुण्यामध्ये अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात स्पर्धा आहे. ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात तर बीड जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या प्रमुख नेत्यांमध्ये पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान ठाण्याचं पालकमंत्रिपदं फक्त एकनाथ शिंदे यांनाच मिळावं अशी मागणी कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळात 12 जिल्हे मंत्रिपदापासून वंचित आहेत.
🔴मात्र, आपल्यात कुठलाही वाद होणार नसून पालकमंत्रिपदाचं वाटप होणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलंय. खातेवाटप जाहीर होताच महायुतीत सुरू झालेल्या पालकमंत्रिपदाच्या वादावर महायुतीचे नेते कशाप्रकारे तोडगा काढतात आणि पालकमंत्रिपद नेमकं कुणाला दिलं जाणार हे यादी जाहीर झाल्यानंतरच कळणार आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावर शिवसेना ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. मी मंत्री होणार हे ठाम विश्वासाने सांगणारे आमदार भरत गोगावले मंत्री झाले. दरम्यान आता त्यांनी रायगडच्या पालकमंत्री पदासाठी दावा केलाय. इथल्या पालकमंत्री पदासाठी कुठलीही रस्सीखेच नाही. मी मंत्री असल्याने मीच पालकमंत्री होणार, असा दावा भरत गोगावले यांनी केला. शिवसेनेचे रायगड जिल्ह्यात तीन आमदार आहेत. त्यामुळे पालकमंत्री आमचाच होणार असे स्पष्टीकरण भरत गोगावले यांनी दिले आहे.

Previous article
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.