आजरा अर्बन बँकेच्या वतीने आजरा बस स्थानकावरील पाणपोई लोकार्पण सोहळा संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.
हिंदू हृदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान अंतर्गत आजरा बस स्थानकावर प्रवाशांना शुद्ध व स्वच्छ पाणी मिळणेसाठी दि आजरा अर्बन को-ऑप. बँक लि. आजरा (मल्टी स्टेट) च्या वतीने बसविणेत आलेल्या पाणपोईचे व प्लॉट फॉर्म वरील गावांचे नाम फलक यांचा लोकार्पण सोहळा अण्णा भाऊ संस्था समूह प्रमुख व आजरा अर्बन बँकेचे संचालक अशोक अण्णा चराटी यांचे उपस्थितीत बँकेचे चेअरमन मा. डॉ. अनिल देशपांडे यांचे शुभहस्ते संपन्न झाला.
आजरा अर्बन बँकेचे कार्यक्षेत्र हे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यामध्ये विस्तारीत असून बँकेचा व्यवसाय महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात आहे. प्रवाशांना स्वच्छ व शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने आजरा बसस्थानकावर पाणपोईची सुविधा केली. तसेच बँकेच्या वतीने बसस्थानकावरील १० प्लॉट फॉर्मवर गावांचे नाम फलक बसविले आहेत. याच बरोबर कोरोना काळातही बँकेने सामाजिक दायित्व जाणून शासनाला वेळोवेळी मदत केली आहे.
सदर कार्यक्रमाचे वेळी आजरा अर्बन व्हा. चेअरमन रमेश कुरुणकर, संचालक सुरेश डांग, विलास नाईक, डॉ. दीपक सातोसकर, किशोर भुसारी, बसवराज महाळक, मारुती मोरे, आनंदा फडके, सौ. प्रणिता केसरकर, श्रीमती शैला टोपले, सौ. अस्मिता सबनिस, सुनिल मगदुम, सुर्यकांत भोईटे, मा. श्री. किरण पाटील, संजय चव्हाण, अॅड. सचिन इंजल, मनोहर कावेरी, जयवंत खराडे व बँकेचे अधिकारी तसेच आजरा बसस्थानक आगार व्यवस्थापक राजेंद्र घुगरे यांनी सर्वांचे स्वागत केले. सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक पृथ्वीराज चव्हाण सह कर्मचारी उपस्थित होते. बसस्थानक आगार सेवक प्रसाद जोशी यांनी सर्वांचे आभार मानले.