Home कोल्हापूर - प. महाराष्ट्र साहित्याला भाषेची वा प्रांताची कुठलीच सीमा नसते.- शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी विभागाच्या प्रभारी...

साहित्याला भाषेची वा प्रांताची कुठलीच सीमा नसते.- शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी विभागाच्या प्रभारी प्रमुख प्रो. (डॉ.) तृप्ती करेकट्टी( आजरा महाविद्यालय.- हिंदीतरभाषी हिंदी नवलेखक शिबिराच्या समारोप. )🛑श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराचे विविध पुरस्कार जाहीर संग्राम गायकवाड यांच्या ‘मनसमझावन’ कादंबरीस ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत कादंबरी पुरस्कार.

🛑साहित्याला भाषेची वा प्रांताची कुठलीच सीमा नसते.- शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी विभागाच्या प्रभारी प्रमुख प्रो. (डॉ.) तृप्ती करेकट्टी
( आजरा महाविद्यालय.- हिंदीतरभाषी हिंदी नवलेखक शिबिराच्या समारोप. )
🛑श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराचे विविध पुरस्कार जाहीर संग्राम गायकवाड यांच्या ‘मनसमझावन’ कादंबरीस ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत कादंबरी पुरस्कार.

आजरा : – प्रतिनिधी.

साहित्याला भाषेची वा प्रांताची कुठलीच सीमा नसते. सर्व सीमा पार करण्याचं, जगण्याची नवी दृष्टी आणि उमेद साहित्य देतं. माणसां-माणसांमध्ये सेतु म्हणून कार्य करतं। त्यातील विश्वकल्याणाची भावना नवसमाजाची बांधणीसाठी उपयुक्त आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी विभागाच्या प्रभारी प्रमुख प्रो. (डॉ.) तृप्ती करेकट्टी यांनी केले. त्या आजरा महाविद्यालयामध्ये केंद्रीय हिंदी निदेशालय, नवी दिल्लीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाचदिवसीय हिंदीतरभाषी हिंदी नवलेखक शिबिराच्या समारोप समारंभामध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जनता एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अनिल देशपांडे होते.

या शिबिराचे समन्वयक आजरा महाविद्यालयातील हिंदी विभागाचे प्रमुख प्रो. (डॉ.) अशोक बाचुळकर यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले.
नवी दिल्ली येथील केंद्रीय हिंदी निदेशालयाचे सहायक निदेशक रत्नेश मिश्र आपल्या मनोगतात म्हणाले की या पाच दिवसीय शिबिराने एक नवीन मानदंड घालून दिलेला आहे. सर्व भारतीयांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने, बंधुभाव जोपसला जावा, अशाप्रकारचे प्रयत्न केंद्रीय हिंदी निदेशालयाचे नेहमीच असतात. महात्मा गांधी केंद्रीय विद्यापीठ, चंपारण (बिहार) येथील हिंदीचे प्रो. (डॉ.) शामनंदन म्हणाले की इथल्या निसर्गाप्रमाणेच इथली माणसे सुद्धा साधी-भोळी आणि सरळ आहेत. या शिबिराच्या यशस्वी आयोजनामध्ये केवळ हिंदी विभागच नव्हे तर संस्थेपासून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी पर्यंत सर्वांची एकजूट पाहायला मिळाली, जी इतरत्र दुर्मिळ आहे.
केरळची अपर्णा एस एस आपल्या मनोगतात म्हणाली की गुरुकुल शिक्षण पद्धतीची आठवण करून देणारं हे शिबिर होतं. तर मेघा तोडकर हिने सांगितलं की लेखणीलाच नव्हे तर जीवनाला नवीन दिशा देणारं हे शिबिर आहे. गोव्याच्या आकांक्षा रायकरने सांगितलं की इथल्या व्यवस्थेमुळे सोईमुळे आम्हाला घरची सुद्धा आठवण आली नाही. इकडे उत्कृष्ट व्यवस्थेबद्दल महाविद्यालय आणि संयोजकांचे आभार व्यक्त केले त्याचबरोबर सौ. वैशाली रगडे (इचलकरंजी) यांनी स्वतःला ओळखण्याची संधी या शिबिराने दिली असं सांगितलं. तबस्सूम पठाण, संस्कृती राऊत यानी संधी सोयी दिल्याबद्दल महाविद्यालयाचे आभार मानले. नवोदित लेखकाने आपल्या लेखणीतून समाजाला नेहमी नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन अध्यक्षीय मनोगतात डॉ. अनिल देशपांडे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी पाटील यांनी केले.
एज्युकेशन सोसायटीचे संचालक कृष्णा येसणे, माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी – पाटील, युवा नेते अनिकेत चराटी, कार्यालय अधीक्षक योगेश पाटील, यासह केरळ, गोवा, महाराष्ट्र, बिहार या राज्यातून आलेले नवलेखक विद्यार्थी उपस्थित होते. आभार प्रो. अशोक सादळे यांनी मानले.

🛑श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराचे विविध पुरस्कार जाहीर संग्राम गायकवाड यांच्या ‘मनसमझावन’ कादंबरीस ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत कादंबरी पुरस्कार.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील शतकोत्तर रौप्यमहोत्सवी श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरातर्फे दरवर्षी मराठी भाषेतील कादंबरी, गद्यसाहित्य, नाट्यलेखन, कविता व बालसाहित्याकरिता राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार देण्यात येतात. सन २०२३ सालात प्रथम प्रकाशित झालेल्या व ग्रंथालयाकडे पुरस्कारांकरिता प्राप्त झालेल्या पुस्तकांतून खालील साहित्यकृतींची निवड पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. तसेच ग्रंथालयातर्फे देण्यात येणाऱ्या भूमिपुत्र साहित्यिक, माता गौरव, उत्कृष्ठ ग्रंथालय व वाचक पुरकारही जाहीर करण्यात आले.

यावर्षीचा ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत कादंबरी पुरस्कार संग्राम गायकवाड पुणे यांच्या ‘मनसमझावन’ या कादंबरीला (रोहन प्रकाशन, पुणे) जाहीर झाला आहे. कै. दाजी टोपले नाट्यलेखन पुरस्कार विजय साळवी रत्नागिरी यांच्या ‘एक चंद्रकोर’ या नाट्यसंहितेस (कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर), डॉ. बाबासाहेब आंबेडकर गद्यसाहित्य पुरस्कार समीर गायकावाड सोलापूर यांच्या ‘खुलूस’ या पुस्तकास (रोहन प्रकाशन, पुणे), बालसाहित्याचा पुरस्कार सुरेश सावंत नांदेड यांच्या ‘कष्ठाची फळे गोड’ (दिलिपराज प्रकाशन, पुणे) या बाल कथासंग्रहास तर मैत्र काव्य पुरस्कार एकनाथ पाटील – इस्लामपूर यांच्या ‘अरिष्टकाळाचे भयसूचन’ (ललित पब्लिकेशन, मुंबई) या काव्यसंग्रहास जाहीर करणेत आला आहे. भूमीपुत्र साहित्यिक गौरव पुरस्कार आजऱ्यातील सुप्रसिध्द नाट्यलेखक, दिग्दर्शक व नाटयअभिनेते डॉ. श्रध्दानंद ठाकूर यांना देण्यात येणार आहे.

यावर्षीचा माता गौरव पुरस्कार श्रीमती पूजा प्रवीण तिप्पट यांना जाहीर करण्यात आला आहे. कै. काशिनाथअण्णा चराटी उत्कृष्ठ ‘अ’ वर्ग ग्रंथालय पुरस्कार क्रांतिवीर रत्लाप्पाण्णा कुंभार सार्वजनिक वाचनालय गंगानगर इचलकरंजी, कै. माधवरावजी देशपांडे उत्कृष्ठ ‘ब’ वर्ग ग्रंथालय पुरस्कार महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय मुगळी, ता. गडहिंग्लज तर कै. बळीरामजी देसाई उत्कृष्ठ ‘क’ वर्ग ग्रंथालय पुरस्कार – सिध्दिविनायक वाचनालय व सांस्कृतिक संस्था कोवाडे, ता. आजरा यांना जाहीर करणेत आला आहे. ग्रंथालयातर्फे देण्यात येणारे उत्कृष्ठ वाचक पुरस्कार बालविभागातून कु अंशुमन हिम्मत भोसले, अभ्यासिकेतून सौ पूनम रमेश नार्वेकर, महिला वाचक श्रीमती राजश्री विजय गाडगीळ तर पुरूष वाचक – श्री. अनंत शिवराम आजरेकर यांना जाहीर करण्यात आले आहेत.

या पुरस्कारांचे वितरण साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक कृष्णात खोत (पन्हाळा) यांचे शुभहस्ते बुधवार दिनांक २५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता ‘मृत्युंजय’ कार शिवाजीराव सावंत स्मृतीदालन, जूनी पोष्ट गल्ली, आजरा येथे समारंभपूर्वक करण्यात येणार असल्याचे वाचनालयाचे अध्यक्ष वामन सामंत, उपाध्यक्षा विद्या हरेर, कार्यवाह कुंडलिक नावलकर व रवींद्र हुक्केरी यांनी सांगीतले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.