Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रशिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरेना पाठिंबा तर शिंदे गट निवडणूक आयोगचा निषेध. -...

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरेना पाठिंबा तर शिंदे गट निवडणूक आयोगचा निषेध. – आजरा.- चंदगड.- गडहिंग्लज तालुक्यातील शिवसैनिक आक्रमक.

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरेना पाठिंबा तर शिंदे गट निवडणूक आयोगाचा निषेध. – आजरा.- चंदगड.- गडहिंग्लज तालुक्यातील शिवसैनिक आक्रमक.

आजरा.- प्रतिनिधी.

पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी दि. १८/०२/२०२३ रोजी आजरा, चंदगड, व गडहिंग्लज तालुक्यातील शिवसेना, युवासेना, पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने एकत्रित प्रत्येक तालुक्यात शिंदे गट निवडून आयोगाचा निषेध करण्यात आला. चंदगड तालुक्यातील शिनोळी येथे उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली, तसेच आजरा येथे उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील व तालुकाप्रमुख युवराज पवार यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती समोर
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा व शिंदे गट व निवडणूक आयोगाचा निषेध व्यक्त करून आम्ही सर्व शिवसैनिक पक्षप्रमुख ऊद्धव ठाकरे यांच्यासोबत तालुका पूर्णपणे उभा असल्याचे सांगीतले. शिंदे गटाने कितीही दबाव व आमिषे दाखवली तरी आमच्या विधानसभा मतदार संघातील शिवसैनिक व मतदार त्याला बळी पडणार नाहीत व कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी जनता यापुढील निवडणुका मध्ये शिंदे गटाला चितपट केल्याशिवाय जनता जनार्दन शांत राहणार नाही याची ग्वाही देऊन शिवसेना पक्ष पुन्हा नव्या जोमाने ऊभा करू व महाराष्ट्रात तसेच चंदगड विधानसभा मतदार संघात भगवा फडकवुन पुन्हा आपली सत्ता आणू असे सांगीतले. यावेळी तालुकाप्रमुख लक्ष्मण मनवाडकर यांनी दि. १७ रोजी शिवसेना पक्षाबाबाबत जो केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला तो लोकशाहीला काळीमा फासणारा व हुकुमशाहीला प्रोत्साहन देणारा होता. जरी पक्षचिन्ह व पक्ष त्यांना दिला तरी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे शिवसैनिक ऊद्धवसाहेब यांच्या पाठीशी महाराष्ट्राची संपुर्ण जनता पाठीशी खंबीरपणे उभी राहिल अशी आशा व्यक्त करून या शिंदे गट व निवडणुक आयोगाचा जाहीर निषेध. व्यक्त केला.आजरा येथे ता.प्रमुख श्री. पोवार यांनी तीव्र शब्दात शिंदे गट व निवडणूक आयोग यांचा निषेध केला
यावेळी उप तालुकाप्रमुख विनोद पाटील, विभाग प्रमुख संदीप पाटील, मांडेदुर्ग शाखाप्रमुख विजय भोगण, तेऊरवाडी शाखाप्रमुख मारुती कांबळे, युवासेना ऊपतालुकाप्रमुख अवधूत भुजबळ,सुरुते शाखाप्रमुख हणमंत भोंगाळे, बांधकाम कामगार अध्यक्ष उमाजी पवार, वरिष्ठ शिवसैनिक गुंडू भाटे, बांधकाम कामगार संघटना उपतालुकाप्रमुख विलास बिरजे, दुंडगे शाखाप्रमुख मारुती पाटील, युवासेना विभागप्रमुख सम्राट पाटील, नागरदळे शाखाप्रमुख परशराम मुरकुटे, संदीप ढोलके,मनोहर चौगुले, धाकलु भाटे, दत्तू भाटे,लखन कांबळे, मारुती कांबळे, संदीप पाटील, शिवसैनीक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते. तर आजरा येथे उप.ता.प्रमुख संजय येसादे, जयसिंग पाटील, शिवाजी आढाव, युवा सेना महेश पाटील, तसेच दयानंद भोपळे, गणपती मिसाळ, राजेंद्र पाटील. युवा सेना व उद्धव सेनेचे पदाधिकारी शिवसैनिक यांनी सहभाग घेतला होता.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. सह्याद्री न्यूज निर्भिड आणि सत्यता मांडते असे वाटत नाही. विचार करा

Comments are closed.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.