Home Uncategorized पॅनकार्ड क्लब्स .- आसोसिएशनची नवीन माहिती,. ज्या ग्राहकांच्या खात्यात रक्कम प्राप्त झालेली...

पॅनकार्ड क्लब्स .- आसोसिएशनची नवीन माहिती,. ज्या ग्राहकांच्या खात्यात रक्कम प्राप्त झालेली नाही…तर काय करावे पहा..👇

पॅनकार्ड क्लब्स .- आसोसिएशनची नवीन माहिती,. ज्या ग्राहकांच्या खात्यात रक्कम प्राप्त झालेली नाही…तर काय करावे पहा..👇

मुंबई.- प्रतिनिधी.

श्री. सद्‌गुरु समर्थ मार्केटिंग प्रतिनिधी वेल्फेअर असोसिएशन यांनी मागील पत्रकात नमूद केल्याप्रमाणे, 5 नोव्हेंबर 2024 रोजी https://pancardclubs.com/ ही वेबसाईट सुरू करण्यात आली आहे.

सदर वेबसाईटवर ज्या अधिकृत गुंतवणूकदारांना ( ऍडमिटेड क्लेम धारक) त्यांच्या बँक खात्यात रक्कम प्राप्त झालेली नाही अशा फायनान्शिअल क्रेडिटर्सच्या दोन याद्या प्रसिद्ध केल्या आहेत.

  1. Return Payment List. (This list is being updated gradually)
  2. Missing Bank details.

वरील दोन यादींपैकी कुठल्याही यादीत ज्यांचे नाव आहे अशा गुंतवणूकदारांच्या बँक खात्याचे तपशील चुकीचे आढळून आले, काही जणांचे बँक खाते बंद झाले आहे, तर काही इतर कारणांमुळे त्यांच्या बँक खात्यात परतावा रक्कम प्राप्त होऊ शकली नाही. म्हणूनच अशा गुंतवणूकदारांना साठी आता वेब पोर्टल चालू झाले आहे. त्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी वेब पोर्टलच्या माध्यमातून आपल्या चालू असलेल्या बँक खात्याचे डिटेल्स (अॅक्टिव बँक अकाऊंट) कुठलीही चूक न करता व दिलेल्या सूचनांचे पालन करून योग्य पदधतीने सबमिट करायचे आहे. कारण ही शेवटची संधी असणार आहे.. सर्वप्रथम वेब पोर्टलच्या चिन्हावर क्लिक करणे.अशा प्रकारे आपण आपल्या केस नुसार वेब पोर्टलच्या माध्यमातून योग्य ते बदल करून सबमिशन करावे.

वेब पोर्टल वरील नोटचे (सूचनांचे) मराठी भाषांतर दिले आहे. हिंदी भाषांतर पोर्टल वर उपलब्ध आहे. कृपया ते वाचून समजून घेऊन मगच लॉगीन करावे.

Oplus_131072

परिचयः

कंपनीच्या वेबसाइटवर, असे अनेक वित्तीय कर्जदार (FCs) आहेत ज्यांचे दावे मान्य करण्यात आले आहेत, परंतु चुकीच्या किंवा अपूर्ण बँक तपशीलांमुळे त्यांना प्रमाणिक आगाऊ रक्कम प्राप्त झालेली नाही. हा मु‌द्दा सोडवण्यासाठी, एक वेब पोर्टल सादर करण्यात आले आहे, ज्याद्वारे FCs त्यांचे योग्य बँक तपशील सादर करू शकतात, ज्यामुळे त्यांची आगाऊ रक्कम सोडली जाईल.

Oplus_131072

वेब पोर्टल‌द्वारे सादरीकरणासाठी सूचनाः

  1. वेब पोर्टलला प्रवेश करा वेब पोर्टल आयकॉनवर क्लिक करून निर्दिष्ट वेब पोर्टलला भेट द्या.
  2. लॉगिन आपला नोंदणीकृत ईमेल आयडी आणि ओळखपत्र वापरून लॉगिन करा (आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदार ओळखपत्र / किंवा पासपोर्ट यापैकी एक).
  3. सादरीकरणासाठी श्रेणी खालील श्रेण्या प्रत्येक वित्तीय कर्जदारासाठी (FC) भिन्न असू शकतात :

अ) नाव बदलः जर नावामध्ये बदल आवश्यक असेल, तर संबंधित कागदपत्रे अपलोड कराः

  • विवाह प्रकरण :
  • विवाह प्रमाणपत्र आणि अद्ययावत आधार कार्ड अपलोड करा.
  • विवाहाशिवाय इतर नाव बदल प्रकरणः राजपत्र अधिसूचना आणि अद्ययावत आधार कार्ड अपलोड करा.
  • मृत्यू प्रकरण :
  • जर FC चे निधन झाले असेल, तर नामनिर्देशित व्यक्तीने मृत्यू प्रमाणपत्र आणि नामनिर्देशित व्यक्तीचे आधार कार्ड अपलोड करावे.
  • जर FC आणि नामनिर्देशित दोघांचे निधन झाले असेल, तर कायदेशीर वारसाने वारस प्रमाणपत्र अपलोड करावे.

शुद्धलेखन चूक : नाव दुरुस्त करा आणि अद्ययावत आधार कार्ड किंवा पॅन कार्डची प्रत अपलोड करा.

खाली नमूद केलेल्या सूचनांचे पालन करावे-: अशी माहिती श्री सद्‌गुरु समर्थ मार्केटिंग प्रतिनिधी वेल्फेअर असोसिएशन यांनी दिली आहे.

संपर्क..

नोंदणी क्रं.: महाराष्ट्र राज्य, मुंबई २०१९ जी.बी.बी.एस.डी. १०१२/२०१९ / नोंदणीकृत कार्यालयः ४०२, ओमसिद्धी कॉ. ऑप. हौ. सोसायटी लिमिटेड, अजितपार्क सोसायटी जवळ, सोमवारबाजार, मालाड (प.) मुंबई- ४०००६४ एफ न. ७६०८४

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.