HomeUncategorizedआजरा किटवडेत इकोझोन मधील बेकायदेशीर उत्कलन याला जबाबदार महसूल विभाग प्रशासन.- महसूल...

आजरा किटवडेत इकोझोन मधील बेकायदेशीर उत्कलन याला जबाबदार महसूल विभाग प्रशासन.- महसूल विभागाच्या काण्याडोळ्यामुळे उत्खननाला गती. – भाग. १

आजरा किटवडेत इकोझोन मधील बेकायदेशीर उत्कलन याला जबाबदार महसूल विभाग प्रशासन.- महसूल विभागाच्या काण्याडोळ्यामुळे उत्खननाला गती. – भाग. १

संपादकीय. विशेष.

आजरा तालुक्यात मागील अनेक वर्षापासून किटवडे – अंबाडे येथे महसुल विभागात होत असलेले इकोझोन मधील बेकायदेशीर उत्खनन याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत. असताना याला जबाबदार प्रत्यक्षात महसूल विभाग आहे. इकोझोन असल्यामुळे रॉयल्टी परवानगी असे विषय हे बाजूलाच असतात परंतु प्रत्यक्षात इतकं मोठं उत्कलन होत असताना महसूल विभाग झोपला आहे का ? झोपेचं सोंग घेतलेल्या या विभागाला जाग करण्याची वेळ आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात उत्कलन होत असताना महसूल विभागातील एकही अधिकाऱ्यांना याची कल्पना नसणे असे होत नाही. यालाच “कानाडोळा असे म्हणतात” मग या ठिकाणी शंखेची पाल चुकचुकते व आर्थिक व्यवहार झाला असल्याचा वास येतो. व हाच वास तालुक्यात सर्वत्र दूरवर दरळवत आहे. अशी चर्चा उत्खलन झालेल्या विभागातील नागरिकांमध्ये आहे. या विभागाला भ्रष्ट विभाग असे नाव पडू नये म्हणून हा अट्टाहास.. परंतु यामध्ये काही लोकप्रतिनिधी यांचा देखील आशीर्वाद मिळत असल्याचे ऐकायला मिळते. संबंधित ठेकेदार हे दिवसभरात काबाडकष्ट करून उत्खनन करून मिळणाऱ्या उत्पनातून पोटाची खलगी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात हे जरी खरं असलं तरीही शासनाने इकोझोन जाहीर केला असताना यामध्ये बेकायदेशीर उत्खलन होतं त्याला जबाबदार तरी कोणाला धरायचं यामध्ये काही तलाठी यांनी काही ठेकेदार यांच्यावर दंडात्मक नोटीस देऊन कारवाई करणे म्हणजेच कायद्यातील पळवाट असे नागरिकांचे मत आहे. यामध्ये काही ठेकेदारांना दंड केलेला देखील समजतो याबाबत जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करून इकोझोन मध्ये होत असलेले उत्खनन ताबडतोब कायमचे थांबवले पाहिजे अशी मागणी आजरा तालुक्यातील नागरिकाकडून होत आहे.

….. क्रमशा.

RELATED ARTICLES

1 COMMENT

Comments are closed.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.