कृषी पायाभूत सुविधा निधी योजना प्रचार व प्रसार – लाभार्थी माहिती सत्र संपन्न. ( तरुण पिढीने उद्योजक म्हणून पुढे यावे.- आजरा कृषी विभागाचे आवाहन. )
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथे केंद्र सरकार पुरस्कृत आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेची बैठक आजरा पंचायत समिती सभागृहात संपन्न झाली. अध्यक्ष स्थानी गटविकास अधिकारी डी. एच. दाईगडे होते.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना श्री. दाईगडे म्हणाले आजच्या तरुण पिढीने उद्योजक म्हणून पुढे यावे तरुणांनी कृषी विभागाच्या योजनेची माहिती घेऊन व्यवसाय करावा भविष्यकाळात उद्योजकांची गरज आहे. घेतलेल्या उत्पनातूनच व्यवसाय करून उद्योजक बनावे तक्रारी करून प्रश्न सुटत नाही. व तक्रारी करुन मार्ग निघणार नाही. यातून मार्ग काढत नव्याने कोणती पिक घेऊन कोणते उत्पादन मार्केट पर्यंत पोहवचता येईल याकडे लक्ष द्यावे. यासाठी कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेची माहिती घेऊन तरुणांनी उद्योजक बनावे असे आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून गटविकास अधिकारी यांनी केले. अर्थतज्ञ अक्षय पवार यांनी या योजनेची स्क्रिप्ट दाखवून माहिती दिली याबाबत फॉर्म कसा भरायचा कोणत्या योजनेची माहिती कोणत्या पद्धतीने मिळवावी याबाबतची माहिती दिली.
यावेळी जिल्हा संसाधन अशोक मोरे म्हणाले केंद्र शासनामार्फत कृषी पायाभूत सुविधा निधी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आले आहेत या योजनेतील काढणी पश्चात व्यवस्थापन सुविधा आणि सामूहिक शेती सुविधा निर्माण करण्यास प्रोत्साहन देऊन एकूणच कृषी पायाभूत सुविधा उभारणे अपेक्षित आहे यासाठी मध्यम व दीर्घ मुदतीच्या आर्थिक गुंतवणुकीची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. याचे उद्दिष्ट प्राधान्य क्षेत्रात पुरवठा करताना आकारण्यात येणाऱ्या व्याजदरात या योजनेत सवलत दिली जाईल अशा पतपुरवठातील बँकेची जोखीम कमी करण्यासाठी पथ हमी आणि व्यास सवलत या योजनेतून दिली जाईल एकूणच शेतकरी बँका व ग्राहक यांच्याशी परस्पर हिताचे वातावरण तयार होईल असे उद्दिष्ट असून पात्र लाभार्थ्यांच्या कृषी पतसंस्था सहकारी बँका शेतकरी उत्पादक संस्था शेतकरी संयुक्त उत्तरदायित्व गट बहुउद्देशीय सहकारी संस्था कृषी उद्योजक केंद्रीय राज्य यंत्रणा अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रस्तावित केलेले सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्प कृषी उत्पन्न बाजार समिती, वखार महामंडळ याचे लाभार्थी असतील यातील पात्र प्रकल्प उदा. गोदाम उभारणी, पॅक हाऊस, फळे पिकवणे सुविधा, प्राथमिक प्रक्रिया सुविधा, सेंद्रिय निविष्ठा उत्पादन, केंद्र जैविक निविष्ठा उत्पादन केंद्र, काटेकोर शेतीसाठी सुविधा, पुरवठा साखळी सुविधा, पीपीपी तत्त्वावरील केंद्र व राज्य सरकारच्या सामूहिक शेतीसाठीच्या योजनेमधील सुविधा, ट्रॅक्टर असे या योजनेतील घटक आहेत. तर नव्याने पात्र प्रकल्पाचा समावेश देखील असून यामध्ये ड्रोनची खरेदी, शेतीवरील विशेष सेन्सर्स लावणे, रिमोट सेन्सिंग आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज, हवामान केंद्र फॉर्म, नर्सरी वीज प्रक्रिया, कस्टम हायर किंग सेंटर फॉर्म मशनरी मध प्रक्रिया अशा वेगवेगळ्या योजना आहेत. याचा शेतकरी नागरिकांनी लाभ घ्यावा. यामध्ये कोणती अधिक माहिती हवी असल्यास आजरा कृषी विभागाची मदत घ्यावी. असे बोलताना श्री मोरे म्हणाले सदर माहिती सत्रात बँक ऑफ इंडिया शाखेचे मॅनेजर चंद्रकांत त्रिभुवणे यांनी आपल्या विभागात येणाऱ्या गावातील लाभार्थ्यांना बँक स्टेटमेंट च्या नियमानुसार सहकार्य करण्याची व कर्जाचा परतवा लागणारी कागदपत्रे याबाबतची माहिती देऊन कर्जाची हमी दिली.
यावेळी सहाय्यक तालुका कृषी अधिकारी ए. आर. फोंडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त संख्येने योजनेची माहिती घेऊन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. तसेच शेतकरी सल्ला समिती ( आत्मा ) चे अध्यक्ष इंद्रजीत देसाई यांनी अनेक शेतकरी तरुण वर्ग व्यवसाय कडे वळण्यासाठी तयार आहे परंतु बँकेचे सहकार्य समाधानकारक नसल्यामुळे आजचे शेतकरी व्यवसायाकडे दुर्लक्ष करत आहेत यासाठी बँकांनी सहकार्य करावे व याबाबत तालुक्यातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व राष्ट्रकूट बँकांची बैठक भरून याबाबतची हमी त्यांच्याकडून घेऊन शेतकऱ्यांना या व्यवसायाबाबत उत्सुकता वाटावी असे कार्य व्हावे असे श्री देसाई म्हणाले.
यावेळी बी.आर. दळवी आजरा कृषी विभाग अधिकारी, कृषी विभागातील सर्व विभागाचे अधिकारी तालुक्यातील सर्व कृषी सहाय्यक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृप्ती पाटील यांनी केले. श्री दळवी यांनी आभार मानले.

राष्ट्रीय बँका शेतकऱ्याला कर्ज देण्यास टाळताळ का? करतात शेतकऱ्यांचा थेट बँक अधिकाऱ्यांना प्रश्न.- अधिकाऱ्यांना धरले धारेवर.
【 कृषी विभागाच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व राष्ट्रीय बँकेंना सदर योजनेची माहिती देण्यासाठी पत्राने कळविण्यात आले होते. परंतु या माहिती सत्रात बँक ऑफ इंडिया शाखा उत्तूर वगळता एकही राष्ट्रीय बँकेचे जबाबदार अधिकारी या योजनेपोटी कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत ची माहिती देण्यासाठी उपस्थित राहिले नाहीत. यामुळे उपस्थित शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.- त्यामध्ये राष्ट्रीय बँकेचे मॅनेजर हे शेतकऱ्याला व्यवसायासाठी कर्ज देण्यास दुसऱ्या बँकेची नाव सुचवतात दुसऱ्या बँकेत गेल्यानंतर त्या बँकेचे मॅनेजर आपल्या विभागात ही बँक येत नसल्याचे सांगतात व शासन म्हणतं शेतकऱ्यांनी उद्योजक बनावं यासाठी बँकेचे अधिकारी कर्मचारी सहकार्य करत नसल्याने योजनेचा लाभ घेत असताना संबंधित विभागातील कोणकोणत्या बँक आहेत. त्या – त्या गावातील शेतकऱ्यांनी कोणत्या बँकेतून कर्ज घेता येईल याची माहिती द्यावी. व याबाबत पुन्हा बँक अधिकाऱ्यांची बैठक बोलूवुन शेतकऱ्यांना बोलवावे अशी मागणी या बैठकीत शेतकऱ्यांच्या कडून करण्यात आली. 】
