Homeकोंकण - ठाणेपुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवू' अशी धमकी देणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या!

पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवू’ अशी धमकी देणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या!

पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवू’ अशी धमकी देणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या!

पुणे :- प्रतिनिधी.

पुणे रेल्वे स्टेशनला उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. पुणे रेल्वे स्टेशनवर डॉग स्कॉड, बॉम्ब शोध पथक, पोलीस यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला, पोलीस आसपास होणाऱ्या सर्व घडामोडींवर लक्ष ठेऊन होते.रेल्वे स्थानकावर सुरक्षा वाढवण्यात आली होती. प्रवाश्यांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले होते, हा फोन कोणी केला धमकी देणाऱ्या इसमाचा शोध घेत त्याला अटक करण्यात आली आहे. मध्यरात्री एका इसमाने कॉल करून मळवली ते काने स्टेशन दरम्यान बॉम्बस्फोट घडून येईल ही माहिती दिली. या फोननंतर लोहमार्ग पोलीस स्टेशनने आसपासच्या ठिकाणी तपासणी सुरू केली. त्यानंतर पुणे रेल्वे स्टेशनमध्ये रात्री 8:00 वा दरम्यान दहशत हल्ला करण्यात येईल अशी माहिती मिळताच, लोहमार्ग पोलीस जीआरपीएफ व स्थानिक पोलीस व श्वान पथकाच्या मदतीने पुणे रेल्वे स्टेशन येथे कॉम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आली होती. तर हा फोन करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्या व्यक्तिचं नाव गोविंद भगवान मांडे वय 38 आहे. हा मूळचा परभणीचा आहे. मागील 1 महिन्यापासून कात्रज येथे वॉचमनची नोकरी करत होता. तर त्याने गाडी मनमाड स्टेशन येथे जास्त वेळ थांबली. आणि बोगीमध्ये एका पॅसेंजरशी वाद झाला होता. त्यामुळे तो राग मनात धरून होक्सकॉल केला आहे. या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, हा धमकीचा फोन कुणी केला? कुठून आला? याचा तपास सुरू होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, पोलिसांनी वर्दळीच्या या रेल्वे स्थानकाची सुरक्षा अधिक वाढवली असून प्रत्येकाच्या हालचालीकडे लक्ष ठेवलं जात होतं. तसेच रेल्वे प्रशासनही अलर्ट मोडवर आलं होतं.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. हाच जर एखादा मुस्लिम व्यक्ती असता तर त्यावर गोदी मीडिया तुटून पडली असती.. त्याचे सरळ कनेक्शन लष्करे तोयबा नको नको तेथे जोडले असते 😅😅😅

Comments are closed.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.