आजरा श्री रामतीर्थ धर्मस्थळावरील अस्शील चाळे, मांसाहार जेवण या घटना घडत आहेत. प्रशासनाने. – आशा काही माथेफिरूवर कठोर कारवाई करावी.
आजरा. – प्रतिनिधी.

आजरा येथील रामतीर्थ धर्मस्थळावरील अस्शील चाळे, नमाज पठन, मांसाहार जेवण या घटनेची प्रशासनाने दखल घेऊन कठोर कारवाई करावी आशा अशायाचे निवेदन बजरंग दल, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने आजरा तहसीलदार व आजरा पोलीस स्टेशन यांना देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. की श्री रामतीर्थ आजरा क्षेत्रावर अनुचित प्रकार घडत आहेत. याचा नागरिकांना त्रास होत आहे. त्या ठिकाणी नमाज पठण करणे, प्रेमी युगलांची लुटमार करणे, मांसाहार जेवण बनवून पार्टी करणे मासेमारी करत मध्य प्राशन करणे, अस्शील चाळे करणे, दमदाटी करणे, यासोबत हिंदू देवस्थान बदनाम करण्याचा कट काही वर्गाकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. या ठिकाणी पर्यटक सुद्धा मोठ्या संख्येने येत असतात सदर प्रकरण जेव्हा त्यांच्या नजरेत येतो तेव्हा ती मंडळी नाराज होऊन निघून जातात प्रामुख्याने हे पर्यटक मंडळीवर येथील उपजीविका करणारे दुकानदार यांना त्याचा चांगलाच फटका बसत आहे. आणि आपले आजरा नगरीचे नाव खराब होत आहे. सदर प्रकार आजरामध्ये स्थानिक रहिवासी व हिंदू कार्यकर्त्यांनी सांगूनही काही माथे फिरु लोक ऐकत नाहीत उलट हा प्रकार पुन्हा पुन्हा वारंवार आणि अधिक गतीने घडून आणत आहे यावर चांगला बसवावा त्या संबंधित लोकांवर तात्काळ कारवाई करावी. अन्यथा बजरंग दल तसेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने नाहक त्रास देणाऱ्या लोकांना वचक शिकवला जाईल परंतु कायदा हातात घ्यायचा नाही. म्हणून व आजरा शहरातील, तालुक्यातील वातावरण दूषित होऊ नये यासाठी संबंधित समाज कंटकावर कठोर कारवाई प्रशासनाने करावी व आमचे पवित्र क्षेत्र अबाधित रहावे. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर नाथ देसाई, सुधीर सुपल, संदीप पारळे, आनंदा कुंभार, गौरव देशपांडे, अनिल निऊगरे, शैलेश पाटील, राहुल नेवरेकर, सुरज पाटील, महेश दळवी, श्रीधर गायंगडे, प्रथमेश कानेकर, सुरेश पालपोलकर, मुकुंद निर्मळे, विशाल पाटील, राज चव्हाण, साठे काका, आनंदा घंटे सह हिंदू बांधवांच्या सह्या आहेत.

[ याबाबत आजरा नगरपंचायत नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा, नगरसेवक यांना देखील सदरचे निवेदन आजरा प्रशानाच्या दालनात देण्यात आले आहे. सदर पवित्र क्षेत्र श्री रामतीर्थ हे आजरा नगरीत येत असल्यामुळे संबंधित निवेदन हिंदू बांधवांनी आजरा नगरपंचायत यांना दिलेले आहे. नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, उप नगराध्यक्षा अस्मिता जाधव नगरसेवक अनिरुद्ध केसरकर उपस्थित होते.]