Homeकोंकण - ठाणेपोलीस तक्रारीत नाव घातल्याच्या रागातून पोलीस पाटलाचा खून.- चंदगड तालुक्यातील पोवाचीवाडी येथील...

पोलीस तक्रारीत नाव घातल्याच्या रागातून पोलीस पाटलाचा खून.- चंदगड तालुक्यातील पोवाचीवाडी येथील घटना.

पोलीस तक्रारीत नाव घातल्याच्या रागातून पोलीस पाटलाचा खून.- चंदगड तालुक्यातील पोवाचीवाडी येथील घटना.

चंदगड. – प्रतिनिधी.

पोलिस तक्रारीमध्ये नाव घातल्याच्या रागातून चक्क तरुण पोलिस पाटील यांचा कोयता व खुरप्याने डोकीत व मानेवर सपासप वार करून ठार मारल्याची दुदैवी घटना चंदगड तालुक्यातील पोवाचीवाडी येथील देवचारंगी नावाच्या शेतात शनिवारी रात्री घडली. यामुळे परिसरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.संदीप ज्ञानदेव पाटील (वय ४१) रा. पोवाचीवाडी असे मृत तरुण पोलिस पाटीलांचे नाव आहे.
चंदगड तालुक्यातील पोवाचीवाडी येथे पोलीस पाटील यांचा खून झाल्याने संपूर्ण तालुका हादरून हादरून गेला आहें.जर एखाद्या पोलीस पाटीलचा बळी घेतला जातो. तर सर्वसामान्यांच काय ? अशी चर्चा आता जनसामान्यांतून होतं आहें.
आपले पोलिस तक्रारीमध्ये नाव घातल्याच्या रागातून चक्क तरुण पोलिस पाटील यांचा कोयता व खुरप्याने डोकीत व मानेवर सपासप वार करून ठार मारल्याची दुदैवी घटना पोवाचीवाडी (ता. चंदगड) येथील देवचारंगी नावाच्या शेतात शनिवारी रात्री घडली. यामुळे परिसरासह तालुक्यात खळबळ उडाली
याबाबत पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री संशयित आरोपी रोहित निवृत्ती पाटील याच्याशी आपलं भांडण सुरू असून त्याला समजावून सांगण्यासाठी सुरेश गुरव याने फोन करून पोलिस पाटील संदीप याला बोलावून घेतले.त्यानुसार पोलिस पाटील संदीप हे गुरव यांच्या देवचारंगी नावाच्या शेतात संशयित रोहित पाटील,निवृत्ती राजाराम पाटील, अरूण राजाराम पाटील व योगेश अरुण पाटील यांना समजावण्यासाठी गेले असता जुन्या वादात पोलिस तक्रारीत नाव घातल्याच्या रागातून त्यांनी संगनमत करून कोयता व खुरप्याने हातावर,डोकीत व मानेवर सपासप वार करून ठार मारले.‌या घटनेमुळे परिसरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.‌संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.मयत याच्या पश्चात आई,वडील,पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
चंदगड तालुका पोलीस पाटील संघटना व नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत जोपर्यंत सर्व आरोपींना पोलीस अटक करत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने पोलिसांसमोर पेच निर्माण झाला होता. सर्व आरोपींना अटक केल्यानंतर अंत्यविधी पार पाडण्यात आला. मयत पोलीस पाटील संदीप पाटील हे माजी पंचायत समिती सदस्या अनुराधा पाटील यांचे पती आहेत. त्यामुळे अडकूर पंचक्रोशीत सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या या हत्याने चंदगड तालुका हादरला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.