गिरणी कामगारांना घराचा ताबा दिला तरच.- मतदान करण्याचा निर्धार.- अन्यथा बोटाने सरकारला मारणार.- धोंडिबा कुंभार.( आजरा येथे सर्व श्रमिक गिरणी कामगार संघटनेचा मेळावा संपन्न. )
गिरणी कामगारांना घराचा ताबा दिला तरच.- मतदान करण्याचा निर्धार.- अन्यथा बोटाने सरकारला मारणार.- धोंडिबा कुंभार. ( आजरा येथे सर्व श्रमिक गिरणी कामगार संघटनेचा मेळावा संपन्न. )
आजरा.- प्रतिनिधी.
गिरणी कामगारांना हक्काचे घर नाही. दिल्यास येणाऱ्या निवडणुकीत सध्याच्या सत्तेतील सरकारला मतदान न करण्याचा निर्णय घेऊन एका बोटाने सरकारला मारणार असल्याचे गिरणी कामगारांना मार्गदर्शन करताना सर्व श्रमिक गिरणी कामगार संघटना आजरा तालुका यांच्या वतीने गिरणी कामगार व वारसांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष धोंडिबा कुंभार अध्यक्षस्थानावरून बोलत होते. पुढे म्हणाले लढा, संघर्ष आंदोलन केल्याशिवाय यश मिळत नाही कोणाचे पैसे घेऊन ही चळवळ उभी राहिली नाही. ही एक चळवळ आहे. व जोपर्यंत गिरणी कामगारांना पेन्शन व हक्काचे घर मिळत नाही. तोपर्यंत कोणीही हा लढा संपवण्याचा प्रयत्न करत असाल तर संपणारा लढा हा नाही. या सरकारचे वय किती आहे. सद्यस्थितीला तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र येता आणि मनाला येईल त्या पद्धतीने सरकार चालवता पण आम्ही संघर्ष करण्यासाठी लढण्यासाठी उभे आहोत. आपण मुंबईची सिंगापूर करतो म्हटला पण खऱ्या अर्थाने बौद्धिक नागरिकांनी श्रमाने मुंबई टिकवली होती. ती आपण सिंगापूर करण्याच्या नादात बरबाद करत आहात याचे भान नेत्यांना असले पाहिजेत आमच्या हक्काच्या घराची लढाईची आम्ही ठाम आहोत बदलणार नाही. पक्ष बदलल्यासारखे खोके व बोके घेणारी मंडळी निष्ठा बाजूला ठेवून बदलतात परंतु आमचा हा लढा कायमस्वरूपी चालूच राहणार असे बोलताना श्री कुंभार म्हणाले.यावेळी गिरणी कामगार संघटनेचे अध्यक्ष शांताराम पाटील म्हणाले या सरकारवर विश्वास ठेवून चालणार नाही घराचा ताबा मिळत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही चळवळीत फूट पाडून दिशाभूल करणाऱ्यांना व कामगारांचे कान भरून विभागणी करणाऱ्यांनी आपण गिरणी कामगारांना कोणते सहकार्य करत असाल तर आपलं अभिनंदनच आहे पण चळवळीबाबत चुकीची अफवा पसरवून कामगारांना दिशाभूल करण्याची सुपारी घेऊ नये “मालकांवर कर व गिरणी कामगारांना मोफत घर” हा हक्क आम्ही सोडणार नाही यामध्येच मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडवणीस हे वेगवेगळे बोलतात या सरकारवर विश्वास न ठेवता हा लढा चालू ठेवायचा आहे. म्हाडाच्या ऑफिसवर गिरणी कामगारांना न्याय मिळत नाही, दखल घेतली जात नाही. तरी म्हाडा फॉर्म न भरलेल्या वंचित लोकांना माहिती द्यावी. कारण थोड्याच दिवसात वेळ पडल्यास म्हाडावर मोर्चा काढण्याची वेळ येणार आहे. असे बोलताना श्री पाटील म्हणाले. यावेळी सुनील शिंदे म्हणाले गिरणी कामगारांनी क्षमता ठेवावी व एकाच रांगेत उभे राहून घर मिळण्याची वाट पहावी तरच आपला नंबर येईल आपण चळवळीच्या रांगेतून बाजूला गेलात तर आपला ज्या रांगेतून इतक्या वर्षात नंबर लावला आहे. तोही आपला नंबर जाईल व दुसऱ्या रांगेत उभे राहून तोही नंबर येणार नाही त्यामुळे आपल्या चळवळीचे काम सोडून इकडे तिकडे दिशाभूल करणाऱ्या रांगेत जाऊन उभे राहू नका गिरणी कामगारांनी संप काळात आपल्या मुलाला मोलमजुरी करून वाढवले शिक्षण दिले व काही गिरणी कामगार गिरणीचं व इतर स्वप्न न पाहता निघून गेले या सरकारला मुंबई जतन ठेवलेल्या गिरणी कामगारांची जाण पाहिजे होती पण हा आपला लढा चालूच ठेवूया जोपर्यंत शेवटच्या गिरणी कामगाराला हक्काचे घर मिळत नाही तोपर्यंत या लढ्यात आम्ही सर्व सहभागी होऊन या चळवळीला ताकद देऊया असे श्री शिंदे म्हणाले. यावेळी चंदगड तालुका अध्यक्ष गोपाळ गावडे तसेच नारायण भडांगे तानाजी पाटील यांनी गिरणी कामगार व वारसांना मार्गदर्शन केले. या गिरणी कामगार व वारसांच्या मेळाव्यासाठी आजरा तालुक्यातील सर्व गिरणी कामगार संघटनेचे पदाधिकारी गिरणी कामगार वारसदार मोठ्या संख्येने उपस्थित होते .
Good
I will not comment on this
I will comment on this side