🟥राज्यात हुडहुडी, रत्नागिरी, पुणे, नाशिक, साताऱ्यासह अनेक जिल्हे गारठले.- थंडी आणखी वाढण्याचा इशारा.
🔴अदानी, अमित शहा, अजित डोवाल यांना कॅनडा,अमेरिकेत निर्बंध!
🟥निवडणूक संपताच रश्मी शुक्लांची पोलिस महासंचालकपदी पुन्हा नियुक्ती!
मुंबई :- प्रतिनिधी
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यातील वातावरणावर परिमाण होणार आहे. सध्या राज्यातील तापमानात मोठी घट पाहायला मिळत आहे. सकाळी व रात्री थंडी वाढली असल्यामुळे अनेक जिल्हे गारठले आहेत. पुणे, नाशिक, रत्नागिरी, जळगाव, सातारा, सांगली, कोल्हापूर, जळगाव, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात तापमानात कमी झाले आहे. किमान तापमानासोबतच कमाल तापमानात देखील १ ते २ अंशांनी घट झाली आहे.
🟥डिसेंबर महिन्यात थंडीत आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळं राज्यावरही त्याचे परिणाम होताना दिसत आहेत. जिथं हवेतील आर्द्रता कमी होऊ वातावरण कोरडं होत असल्याचं निदर्शनास येत आहे. राज्यातील परभणी, निफाड आणि धुळ्यात तापमानानं निच्चांकी आकडा गाठला असून, हा आकडा 10 अंशांच्याही खाली उतरल्याचं पाहायला मिळत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्राच्या कोकणापासून विदर्भापर्यंतच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानाचा आकडा 30 अंशांच्याही खाली आला असल्यामुळे थंडीचा प्रकोप वाढताना दिसत आहे.
🔴हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, किमान किंवा रात्रीच्या तापमानानंतर आता काही शहरातील कमाल किंवा दिवसाच्या तापमानात लक्षणीय घट होत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार, पुणे शहरातील कमाल तापमान सोमवारी २८.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे आतापर्यंतच्या हंगामातील सर्वात कमी कमाल तापमान होते. दरम्यान, किमान तापमान १२.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे आजपर्यंतच्या हंगामातील सर्वात कमी किमान तापमान आहे. कमी होणारी आर्द्रतेची पातळी आणि उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा महाराष्ट्रातील हवामानावर परिणाम होत आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस तापमान आणखी घट होण्याची शक्यता आहे, असे आयएमडीचे पुण्यातील वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञ एस.डी. सानप यांनी सांगितले. या वेळी शहरात पहाटे धुके पडण्याची शक्यता असून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे, असे सानप यांनी सांगितले.
🔴अदानी, अमित शहा, अजित डोवाल यांना कॅनडा,अमेरिकेत निर्बंध!
नवी दिल्ली – वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तीन खास मित्र उद्योजक गौतम अदानी, गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना कॅनडा, अमेरिकेत जाण्यावर निर्बंध आले आहेत. तिघांना या देशांमध्ये जाता येणार नाही.
🟥अदानी यांच्यावरील आर्थिक अनियमिततांबाबत तपास सुरु आहे. तर अमित शहा यांनी त्यांच्या कार्यकाळात मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावरही हेरगिरी किंवा पाळत ठेवण्याच्या संशयावरून अमेरिका, कॅनडामध्ये जाण्यावर निर्बंध आले आहेत. दरम्यान, मोदींच्या तीन हुकमी एक्क्यांवर कॅनडा, अमेरिकासारख्या देशांमध्ये जाण्यावर निर्बंध आले आहेत, अशा शब्दांत सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
🟥निवडणूक संपताच रश्मी शुक्लांची पोलिस महासंचालकपदी पुन्हा नियुक्ती!
मुंबई :- प्रतिनिधी.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 2024 होत असल्यानं विरोधकांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची निवडणूक आयोगाकडं तक्रार केली. त्यामुळे निवडणूक आयोगानं बदलीचे आदेश मुख्य सचिवांना दिल्यानं रश्मी शुक्लांची बदली करण्यात आली.आता मात्र राज्यातील निवडणुका पार पडल्यानंतर सरकारनं पुन्हा पोलीस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती केली आहे.
🔴राज्यातल्या काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षनेत्यांचे फोन टॅपिंगचा आरोप असलेल्या रश्मी शुक्लांना निवडणुकीच्या काळात पदावरून हटवण्यात आलं होतं. काँग्रेसने केलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्याच्या पोलिस महासंचालकपदी संजय कुमार वर्मा यांची नियुक्ती केली होती. पण त्यांच्या नियुक्तीमध्ये तात्पुरती नियुक्ती असा शब्द वापरण्यात आला होता.
🟥विधानसभा निवडणुकीचा निकाल महायुतीच्या बाजून आला असून राज्यात आता महायुतीचं सरकार येणार आहे. त्यामुळे निकाल लागल्यानंतर लगेचच रविवारी संध्याकाळी रश्मी शुक्ला यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्यानंतर आता रश्मी शुक्लांची पुन्हा एकदा पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली.
🔴महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक 2024 च्या निकालात भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात महायुतीनं दणदणीत विजय नोंदवला. महायुतीनं राज्यात विधानसभेच्या 288 पैकी 230 पेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत. निवडणूक आयोगानं शनिवारी निकाल जाहीर केला.त्या निकालात भाजपानं 132 जागा जिंकल्या, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेला 57 जागा मिळाल्या, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं 41 जागा जिंकल्या. मात्र निकालात महायुतीनं आघाडी घेतल्यानंतर राज्यात मोठ्या घडामोडी घडायला सुरुवात झाली. सरकारनं रश्मी शुक्ला यांना पुन्हा पोलीस महासंचालक म्हणून नियुक्त केलं आहे. त्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.
‘आम्ही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मिळालेला जनादेश स्वीकारतो, जनतेसाठी काम करत राहू’- कॉंग्रेस) उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना उबाठा पक्षाला 20 जागा जिंकता आल्या. तर काँग्रेसनं 16 जागावर यश मिळवलं. दुसरीकडं शरद पवार यांच्या पक्षाला फक्त 10 जागांवर समाधान मानावं लागलं. महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाल्यानं विरोधकांच्या गोटात सध्या स्मशान शांतता पसरली आहे.
🔴निवडणूक संपताच रश्मी शुक्लांची पोलिस महासंचालकपदी पुन्हा नियुक्ती!
विधानसभा निवडणुका संपल्यानंतर लगेचच महाराष्ट्र सरकारने आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक पदी नियुक्ती केली आहे. राज्याच्या गृहविभागाने सोमवारी सायंकाळी जारी केलेल्या आदेशात ही माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी 5 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि रश्मी शुक्ला यांना रजेवर पाठवण्यात आले होते.
🟥काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मागणीनंतर रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवण्यात आले. त्यानंतर ही जबाबदारी संजय वर्मा यांच्याकडे सोपवण्यात आली होती, त्यांना निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत या पदावर राहायचे होते, तर रश्मी शुक्ला यांना याच कालावधीसाठी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. मात्र, निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन निवडणूक निकाल जाहीर झाल्याने निवडणूक आयोगाने सोमवारी आदर्श आचारसंहिता संपल्याची अधिकृत घोषणा केली. दरम्यान, निवडणूक संपताच रश्मी शुक्ला या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्याने काँग्रेसने आक्षेप घेतला होता. ही शुभेच्छा भेट होती, असे विधान माध्यमांशी बोलताना शुक्ला यांनी केले होते.
🔴गृह विभागाच्या आदेशात म्हटले आहे की सरकारने रश्मी शुक्ला यांचा सक्तीच्या रजेचा कालावधी संपुष्टात आणला आहे आणि त्यांना पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार सांभाळण्यास सांगितले आहे. संजय वर्मा यांनी त्यांच्याकडे पुन्हा पदभार सोपवला आहे.
🟥महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक
वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक बनण्याचा मान मिळाला आहे. रश्मी या 1988 च्या बॅचच्या महाराष्ट्र केडरच्या अधिकारी असून, त्यांनी सशस्त्र सीमा बलाच्या महासंचालकही काम केले आहे. रश्मी शुक्ला या जूनमध्ये निवृत्त होणार होत्या, मात्र सरकारने त्यांना मुदतवाढ दिली. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या फोन टॅपिंगमुळेही त्या चर्चेत होत्या. वयाच्या 22 व्या वर्षी आयपीएस बनण्याचा विक्रमही रश्मी शुक्ला यांच्या नावावर आहे.
🛑फोन टॅपिंगचा आरोप
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात रश्मी शुक्ला या राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या, तेव्हा काही ज्येष्ठ राजकीय नेत्यांचे बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते. मुंबईत दाखल झालेल्या पहिल्या एफआयआरमध्ये त्याच्यावर शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याचा आरोप होता.
🛑कोण आहेत रश्मी शुक्ला? :-रश्मी शुक्ला या 1988 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी असून महाराष्ट्र पोलिसांच्या सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांपैकी त्या एक आहेत. रश्मी शुक्ला यांनी भूगर्भशास्त्र या विषयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. वयाच्या 22 व्या वर्षी त्या यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्या. 2005 रश्मी शुक्ला यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले होते. 2008 मध्ये त्यांची महाराष्ट्र सरकारमध्ये समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
🅾️सन 2013 मध्ये, रश्मी शुक्ला यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक देऊन गौरविण्यात आले. 2014 ते 2019 या काळात रश्मी शुक्ला यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले.
🔴सन 2014 ते 2019 या काळात रश्मी शुक्ला या राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या. त्यावेळी काँग्रेसचे नाना पटोले यांच्यासह अनेक जणांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
🔴रश्मी शुक्ला या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती होणार्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. राज्याच्या पोलीस महासंचलाकपदी नियुक्ती होण्यापूर्वी रश्मी शुक्ला या केंद्रात सशस्त्र सीमा दलाच्या केंद्र प्रमुख म्हणून कार्यरत होत्या. जून 2024 मध्ये त्या निवृत्त होणार होत्या. मात्र, राज्य सरकारने त्यांना मुदतवाढ दिली होती. रश्मी शुक्ला यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे.