आजरा येथील खेडगे या गावातील रॉटव्हिलर जातीच्या १ वर्षाच्या रॉकी नांवाच्या कुत्र्याला कोणी अज्ञात व्यक्तीने स्फोटक पदार्थ खायला दिल्याने कुत्र्याचा जबडा फाटून व रक्तस्राव होऊन जागीच मृत्यू झाला असल्याची फिर्याद शिवाजी गोपाळ शेडगे वय. ५३ धंदा शेती यांनी आजरा पोलिसात दिली आहे. यामध्ये शेडगे यांच्या घराच्या कोणी अज्ञात व्यक्तीने रॉकी या कुत्र्यास स्फोटक पदार्थ खायला दिल्याने कुत्र्याचा जबडा फाटून रक्तस्राव झाला व रॉकी जागीच मयत झाला रॉकीला जखमी करून ठार मारले असल्याची दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास शिंदे करत