HomeUncategorizedसोमवारी होणाऱ्या धरणे आंदोलनात सहभागी व्हा..- टोल विरोधी कृती समितीचे जनतेचे आवाहन…

सोमवारी होणाऱ्या धरणे आंदोलनात सहभागी व्हा..- टोल विरोधी कृती समितीचे जनतेचे आवाहन…

सोमवारी होणाऱ्या धरणे आंदोलनात सहभागी व्हा.
टोल विरोधी कृती समितीचे जनतेचे आवाहन…

आजरा- प्रतिनिधी.


संकेश्वर बांदा महामार्ग टोल मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी आजरा तहसील कार्यालयासमोर धरणे धरण्यात येणार असून या आंदोलनात तालुक्यातील जनतेने सहभागी होण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. धरणे आंदोलनाच्या तयारीसाठी विठ्ठल मंदिरात आज बैठक झाली.
सुरवातीला कॉ संपत देसाई यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की मोर्चा झाला पण अजूनही सरकार किंवा प्रशासनाकडून आज अखेर म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळं आंदोलन अधिक तीव्र करावे लागणार आहे. जो पर्यंत टोल रद्द झाल्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहील.
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तानाजी देसाई म्हणाले की शेतीची कामे असले तरी लोकांच्या मनात राग आहे आहे तो आपण दाखवून देऊ
परशराम बामणे म्हणाले की आता आंदोलन तीव्र करावे लागेल आपण सगळे मिळून कामाला लागुया. यावेळी डॉ उल्हास त्रिरत्ने यांनी आपल्याकडे तीस ग्रामसभा आणि ग्राम पंचायतीचे ठराव जमा झाले आहेत. सगळ्या ग्राम पंचायतीचे ठराव जमा करू.
यावेळी प्रभाकर कोरवी, रवी भाटले, प्रकाश मोरुस्कर, कॉ शांताराम पाटील, बंडोपंत चव्हाण, पांडुरंग सावरतकर, दशरथ घुरे, काशिनाथ मोरे, चंद्रकांत जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते

चौकट – संभाजी चौकात जमून कार्यकर्ते धरणे आंदोलनासाठी तहसील कार्यलयावर जाणार आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.