विशालगड गजापूर येथील घटनेच्या निषेधार्थ
फुलंब्रीत रस्ता रोको आंदोलन.
फुलंब्री प्रतिनिधी.
फुलंब्री येथे काल दिनांक 19 जुलै रोजी शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने विशालगड गजापूर जिल्हा कोल्हापूर येथील मुस्लिम वस्तीवर हल्ला केल्याप्रकरणी औरंगाबाद जळगाव महामार्गावर भव्य दिव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आला .
याप्रसंगी समाज बांधवांच्या वतीने सरकार व हल्लेखोरांच्या विरोधात संतप्त घोषणाबाजी करण्यात आली.
तसेच या आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री व इतरांना निवेदन दिले आहेत. या आंदोलनाच्या प्रसंगी औरंगाबाद जळगाव महामार्गावर तब्बल एक तास एक तास वाहतूक कोंडी झाली होती.
तर दिलेल्या निवेदनात म्हटले की ,
कोल्हापूर जिल्ह्यातील गजापूर या गावाचा मुस्लिम वस्तीमध्ये काही अतिरेक्यांनी घुसून मस्जीदची नुकसान केले. मुस्लिम वस्तीमध्ये घुसून निष्पाप लोकांना मारहाण केली व त्यांच्या साधनसंपत्तीची नुकसान केली पवित्र इस्लाम धर्माचे कुराण जाळले व इस्लाम धर्मांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
त्या वस्तीमध्ये जाळपोळ केली तसेच महिलांना व वयोवृद्धांना मारहाण केले.
या घटनेच्या जबाबदार म्हणून त्या दंगलखोरांना तात्काळ अटक करा तसेच या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे व गोरगरीब जनतेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली. तसेच काही प्रमुख मागण्या यामध्ये दंगल खोऱ्यांना तत्काळ अटक करा, पीडित कुटुंबांना संरक्षण द्यावे, शासनाने पीडित कुटुंबांना प्रत्येकी 25 लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, मजीत पूर्ववत करून द्यावी,
या प्रकरणाची सखोल चौकशी करून करावी अशी मागण्या केल्या आहेत.
या प्रसंगी फुलंब्री तालुक्यातील सर्व मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.