आजरा. पो. ठाणे नुतन इमारतीचा लोकार्पन सोहळा.- पालकमंत्री दिपकभाई केसरकर शुभहस्ते संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा येथील आजरा पो. ठाणे नुतन इमारतीचा लोकार्पन सोहळा शनिवार दि. ०६ मे २०२३ रोजी सायं. ४.०० वा. आजरा येथे संपन्न झाला. अध्यक्षस्थानी पालकमंत्री दिपकभाई केसरकर होते. पालकमंत्री श्री केसरकर यांचे शुभहस्ते २ कोटी ८ लाख निधीतून नुतन इमारतीचा लोकार्पन करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक आजरा सपोनि सुनिल हारूगडे यांनी केले.

यावेळी बोलताना पालकमंत्री श्री केसरकर म्हणाले. आजरा व सिंधुदुर्ग सीमेवर मोठी एम.आय डि. सी उभा करण्याचा मानस. आबिटकर चांगले आम. लाभले आहेत. यावेळी जिल्हाअधिकारी व सर्वच पोलिस अधिकारी यांचे कौतुक केले. अस्तित्वात असलेल्या एम. आय. डि.सी रस्ते दुरुस्ती करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी चांगली शेती करावी यासाठी कार्यशाळा घेण्यात येणार. छत्रपती राजश्री शाहुना अभिवादन केले. कोल्हापुर जिल्हाचे महत्त्व राज्याला पालकमंत्री या नात्याने पटवून देणार असल्याचे बोलताना पालकमंत्री श्री केसरकर म्हणाले.

यावेळी आम. प्रकाश अबिटकर म्हणाले पालकमंत्री यांच्या निधीतून हे सुसज्ज असे नूतन पोलीस स्टेशन इमारत उभारली आहे कमी जागेमध्ये काम करण्यास पोलिसांना अडचणीत होती आता या इमारतीमध्ये सर्व सेवा सुविधा असल्याने चांगल्या पद्धतीचे काम करता येणार आहे व नागरिकांना चांगल्या सुविधा देता येणार आहेत गोवा आंबोली मार्ग असल्याने वाहतुकीचा अडथळा निर्माण होत आहे. यासाठी व्यापारी व नागरिकांनी देखील पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन यावेळी आम. आबिटकर यांनी केले. लोकार्पण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे
जिल्हाअधिकारी राहुल रेखावर बोलताना म्हणाले पोलीस स्टेशन ही सुखाची पायरी नाही. परंतु बदलत्या काळासोबत पोलिसांचा चेहरा मोहरा बदलला आहे नागरिकांना आपल्या अधिकाराची जाणीव झाली आहे यामुळे पोलीस देखील नागरिकांच्याकडे मदतीच्या सहकार्याच्या दृष्टीने पाहत आहेत. या नूतन इमारतीमध्ये पोलिसांना चांगल्या पद्धतीने मनमोकळे पनाने काम करता येणार आहे. आज एका सुंदर वास्तूच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचा आनंद मिळाला यापुढील कामकाजास शुभेच्छा यावेळी शैलेश बलकवडेसो पोलीस अधीक्षक, कोल्हापूर म्हणाले नुतन सुसज्ज इमारतीमुळे आजरा पोलीस स्टेशन कर्मचारी यांना काम करता येणार आहे. या पोलिस स्टेशन अधिकारी व कर्मचारी यांनी चांगले काम केले आहे. गोवा दारूची तस्करी या मार्गावर जास्त प्रमाणात होत आहे. त्याची उपायोजना झाले पाहिजेत परंतु आजरा पोलीस स्टेशन यासाठी देखील चांगले काम करत आहेत. यापेक्षा अधिक चांगले काम नूतनी इमारतीमध्ये करता येणार आहे असे श्री बलकवडे बोलताना म्हणाले यावेळी सुनिल फुलारी विषेश पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र उपविभागीय पो. अधिकारी राजीव नवले तहसीलदार मानेसो मुख्याधिकारी सुरेश सुर्वे, अशोक चराटी,नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी,उपनगराध्यक्ष अस्मिता जाधव, सर्व नगरसेवक,
जयवंतराव शिंपी, सौ सुनिता रेडेकर, सुधीर कुंभार, बशीर खेडेकर, नाथ देसाई विजय थोरवत संतोष भाटले दत्ता पाटील आजरा पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचारी तालुक्यातील सर्व सरपंच, पोलीस पाटील आजरा शहरातील नागरिक सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन नंदकुमार निर्मळे यांनी केले उपविभागीय पो.अधिकारी श्री नवले यांनी आभार मानले.
