आजरा तालुका खरेदी विक्री संघ पंचवार्षिक निवडणूक रणधुमाळी… कोण मारणार – बाजी सत्ताधारी कि विरोधी आघाडी.
आजरा.- प्रतिनिधी. भाग. १
आजरा तालुका खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळीला चांगलीच रंगत येणार आहे जागा वाटपामध्ये तडजोड न झाल्याने अखेर ही निवडणूक लागली असून या निवडणुकीत सत्ताधारी यापूर्वी कै. राजारामबापु यांच्या नेतृत्वाखाली तालुका खरेदी विक्री संघ उभा होता. व त्याच्याच आशीर्वादाने आजही सत्ताधारी यांचे वर्चस्व आहे. सद्यस्थितीला सत्ताधारी संचालक मंडळ यांनी धान्य व खत, गाळ्याचे भाडे वगळता जरी उत्पन्नाचे साधन म्हणून अन्य कोणताही व्यवसाय उभा केला नसला तरी कै राजारामबापू देसाई यांच्या गटाचं नेहमीच या शेतकरी संघावर वर्चस्व राहिलेले आहे. कै राजाराम बापू नंतर आजरा खरेदी विक्री संघाचे नेतृत्व जेष्ट संचालकांच्या सहकार्याने त्यांचे सुपुत्र के डी सी सी बँकेचे संचालक सुधीर देसाई हे पहात आहेत. या होत असलेल्या निवडणुकी कार्यक्रमात विरोधी गटामधून जि.प.चे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी व अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक चराटी हे विरोधी पॅनल तयार केले आहे. तर या निवडणुकीत बिनविरोध तडजोड न झाल्यामुळे जागा वाटपाच्या घोळात अखेर ही निवडणूक लागली विरोधी गटाने पाच जागेची मागणी केली होती परंतु सत्ताधारी मंडळींनी हा प्रस्ताव अमान्य केल्यामुळे निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. विरोधी आघाड्याकडून मागणी केलेल्या पाच जागा नाही दिल्यास निवडणूक रिंगणातून कदाचित बाहेर विरोधी आघाडी जाईल असा काही जणांचा अंदाज होता. परंतु हा अंदाज चुकला व अखेर दुरंगी लढत होत आहे. परंतु या निवडणुकीचा निकाल हा धक्कादायक असणार आहे. असं बोलले जाते. कोणाचं पारड जड यापेक्षा मतदार कौल कोणाच्या बाजूने देणार हे देखील महत्त्वाचे आहे. दोन्ही आघाडीचा प्रचार अंतर्गत जोरात चालू आहे अंतर्गत बैठका व गाठीभेटी चालू आहेत प्रत्यक्षात प्रचाराचे नारळ ठेवले पण निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळला सुरुवात झालेली नाही असेच चित्र आहे परंतु या निवडणुकीत एकास एक असा निकाल लागण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा सभासदांमध्ये आहे. परंतु सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व कायम राहील असेही बोलले जाते.