अपंगांच्या मागण्यांसाठी मोर्चाने बेमुदत ठिय्या आंदोलन.- आजरा नगरपंचायत समोर
आजरा.- प्रतिनिधी.
अपंगांच्या-दिव्यांगांच्या बाबतीतील सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करून कायदेशीररित्या त्याची ताबडतोब सोडवून होत नाही.अपंगांच्या न्याय्य हक्क मागण्यांसाठी तहसीलदार,मुख्याधिकारी, नगरपंचायत व गटविकास अधिकारी आजरा यांना निवेदन दिलेले होते. मात्र याबाबतीत तहसीलदार, मुख्याधिकारी, नगरपंचायत व गटविकास अधिकारी आजरा यांनी सकारात्मकरित्या प्रश्न सोडवण्यासाठीचा पुढाकार घेऊन प्रश्न मार्गी लावले नाहीत. त्यामुळे आम्ही याबाबतीत अपंगांच्या विविध मागण्यांसाठी नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने सुरू आहे. या आंदोलनाची दखल तहसीलदार आजरा यांनी अजिबात घेतली नाही. तहसिलदार स्तरावरील मागण्यांच्या पातळीवर तहसीलदार यांनी कोणतीच दखल घेतलेली नाही. जोपर्यंत तहसिलदार स्तरावरील मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार.
गटविकास अधिकारी पंचायत समिती आजरा यांनी संघटनेला पत्र देऊन त्या संदर्भातील एक बैठक त्यांच्या दालनात घेऊन याबाबतीत आम्ही काटेकोर पालन करून या मागण्यांचा सोडवणूक करणार आहोत असे लेखी पत्र दिले आहे. आंदोलनाच्या स्थळी मुख्याधिकारी आजरा नगरपंचायत यांनी भेट देऊन त्यांचे म्हणणे मांडले व संघटनेला पत्र दिले आहे. मात्र त्यामध्ये ठोस कार्यवाही जोपर्यंत होत नाही. त्यामध्ये मुदत टाकून आम्हाला सविस्तर पत्र देऊन कार्यवाही ची अंमलबजावणी होणार नाही. तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार असे त्यांना आंदोलनाच्या स्थळी त्यांना सांगण्यात आले.

संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मागण्यांचा अजिबात विचार केलेला नाही त्यामुळे दिव्यांगांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे असे आंदोलकांचे मत आहे. याबाबत विविध मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या आहेत.
यामध्ये – आजरा तालुक्यातील अपंगांना/दिव्यांगांच्या गेली ४ महिने पेन्शनची रक्कम जमा झाली नाही ती ताबडतोब मिळावी. तसेच वेळच्या वेळी त्यांच्या खात्यात जमा झाली पाहिजे…
तालुक्यातील सर्व अपंग दिव्यांगांना अंत्योदय कार्ड मिळालेच पाहिजे.याची कार्यवाही ताबडतोब होण्याबाबत….
भूमिहीन दिव्यांगांना किंवा अपंगांना गायरान मध्ये अथवा गावठाण मध्ये जागा देऊन त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे….अशा विविध मागण्या केल्या आहेत.
या आंदोलनाचे नेतृत्व मुक्ती संघर्ष समितीचे राज्य अध्यक्ष संग्राम सावंत, यांच्यासह मजीद मुल्ला, समीर खेडेकर, संजय डोंगरे, सागर होडगे, निलेश चिमणे, रूजाय डिसोझा, आसिफ मुजावर, सुलेमान दरवाजकर, जगदीश करूणकर,बाळू सुतार,अहमदसाब नेसरीकर, इम्तियाज दिडबाग, सकिना माणगावकर, आस्मा नसरुद्दी, यास्मिन लतीफ, सुष्मिता चंदनवाडे, नामदेव पाटील बाळू सुतार, बेपारी मुस्ताक, अशोक हरेर, रमेश शेंद्रेकर रणजीत सावंत यांच्यासह अपंग दिव्यांग बांधव व मुक्ती संघर्ष समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट.
आंदोलनाला शिवसेना उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, शिवसेना उपशहर प्रमुख समीर चांद यांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.