वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचा गळीत हंगामाची सांगता व सत्यनारायण पुजा / साखर पोती पुजन.
आजरा.- प्रतिनिधी.
कारखान्याचा २०२४/२५ या गळीत हंगामाची सांगता होवून दि.२०/२/२०२५ इ. रोजी सत्यनारायण पुजा कारखान्याचे व्हा. चेअरमन सुभाष देसाई व त्याच्या सुविद्य पत्नि सौ. विजयालक्ष्मी देसाई यांचे शुभहस्ते संपन्न झाली.
चेअरमन वसतराव धुरे व संचालक मंडळाचे शुभहस्ते साखर पोती पुजन संपन्न झाले. या हंगामात कारखान्याने ९३ दिवसात २ लाख ७८ हजार ३५७ मे. टनाचे गाळप करून ३३१२५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले सरासरी उतारा ११.९० इतका मिळाला आहे.
हंगाम २०२४/२५ मध्ये करखान्याने जास्तीत जास्त ऊस गाळपाचे उदिष्ट ठेवुन सक्षम तोडणी वाहतुक यंत्रणा उभारली होती. परंतु अती पावसामुळे ऊसाची वाढ न झाल्याने व वातावरणाच्या परिणामामुळे ऊसास अकाली तुरे आलेने सरासरी हेक्टरी उत्पादन कमी होवून साखर उता-यातही त्याचा परिणाम झाला. कारखाना गाळप करणेस सक्षम असुन सुध्दा ऊसा अभावी कारखाना लवकरच बंद करावा लागला. त्यामुळे गाळपाचे ठेवलेले उदिष्ठ पार करू शकलो नाही. कोल्हापूर जिल्हा मध्य. सह. बँकेचे अध्यक्ष.ना. हसन मुश्रीफ, वैद्यकिय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शना खाली जिल्हा बँकेच्या सहकार्याने कारखान्याकडे गाळपास आलेल्या ऊसाची व तोडणी वाहतुकीची उर्वरीत बिले देखील लवकरच जमा करणार असलेबाबत कारखान्याचे चेअरमन श्री. धुरे यांनी दिली.
आजरा साखर कारखाना स्थापने पासुनच आलेल्या अनेक संकटावर मात करीत खंबीरपणे उभा आहे. कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांचा संपुर्ण ऊस वेळेत गाळप करणे व ऊसाचे बिल वेळेत आदा करून भागातील सभासद शेतक-यांना व कामगारांना दिलासा मिळावा हाच उददेश समोर ठेवून कारखाना उर्जीत अवस्थेत आणणेचे ध्येय कारखान्याचे संचालक मंडळाने डोळयासमोर ठेवले आहे.

कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्रा बाहेरील गडहिंग्लज व चंदगड, आंबोली भागातील कारखान्यास ऊस पुरवठा करणा-या ऊस उत्पादकांच्या सहकार्याने सदर हंगाम संचालक मंडळाच्या प्रयत्नाने पार पाडला आहे. आमच्यावर विश्वास ठेवून ऊस उत्पादकांनी आपला ऊस गाळपास पाठविला तसेच तोडणी वाहतुकदारांनी सुध्दा आमच्यावर विश्वास ठेवून कारखान्यास जास्तीत जास्त ऊस पुरवठा करणेस मदत केली. तसेच मालपुरवठादारांनी कारखान्यास माल पुरवठा करून सहकार्य केले. कारखाना कामगारांनी कारखाना पुर्ण क्षमतेने चालावा यासाठी चांगल्या प्रकारे काम केले. तसेच मान्यवरांच्या सहकार्याने कोल्हापूर जिल्हा मध्य. सह. बँकेने कारखान्यास आवश्यकतो निधी उपलब्ध करून दिला. सदर निधीचा काटकसरीने व योग्य वापर करीत कारखाना व्यवस्थापनाने कारखाना सुरू ठेवला आले. आपल्या सर्वांचे असेच सहकार्य कायम लाभले आहे.
यावेळी कारखान्याचे जिल्हा बँकेचे संचालक तथा बैंक प्रतिनिधी सुधीर देसाई, कारखान्याचे संचालक विष्णू केसरकर, उदयसिंह पोवार, मुकुंदराव देसाई, मधुकर देसाई, मारूती घोरपडे, अनिल फडके, दिपक देसाई, रणजित देसाई, संभाजी पाटील (हात्तीवडे), शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरूकटे, राजेश जोशीलकर, गोविंद पाटील, संचालिका सौ. रचना होलम, सौ. मनिषा देसाई, संचालक काशिनाथ तेली, संभाजी दत्तात्रय पाटील, हरी कांबळे तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक नामदेव नार्वेकर, रशिद पठाण, शासन नियुक्त प्रतिनिधी दिगंबर देसाई आणि प्र. कार्यकारी संचालक.व्ही. के. ज्योती व अधिकारी उपस्थित होते.