‘नारीशक्ती’ महिला बचत गटाची मडिलगेत स्थापना. – महिला सबलीकरणासाठी प्रयत्न करणार. नूतन अध्यक्षा – सौ. मेघा कडगावकर
आजरा.- प्रतिनिधी.

मडिलगे तालुका आजरा येथील ‘आजी – माजी सैनिक, अर्धसैनिक व पोलीस वेल्फेअर फाउंडेशन, मडिलगे’, यांच्या वतीने दि. ०५ मे २०२३ रोजी आयोजित कार्यक्रमात ‘नारीशक्ती महिला बचत गटाच्या’ स्थापना करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृष्णा पाटील होते. स्वागत व प्रास्ताविक फाउंडेशनचे संचालक भगवान पोवार यांनी केले.
या नारीशक्ती महिला बचत गटाच्या अध्यक्ष म्हणून एकमताने सौ मेघा कडगावकर तर सचिव म्हणून सौ सुजाता पाटील यांची निवड करण्यात आली. बचत गटातील महिलांना मार्गदर्शन करताना अध्यक्ष सौ. कडगावकर म्हणाल्या गावांमध्ये अनेक बचत गट आहेत. यामधील काही बचत गटांना योग्य मार्गदर्शनाची गरज किंवा मदत लागल्यास आम्ही निश्चितपणे करू गावातील सर्व महिलांना सोबत घेऊन काम करण्याचा मानस आहे. “एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत” आम्हाला कोणती मार्गदर्शनाची गरज लागल्यास ज्येष्ठ महिला बचत गटाचे आम्ही निश्चितपणे मार्गदर्शन घेऊ व एकमेकाला सोबत राहून गावातील महिलांच्या सबली करण्यासाठी प्रयत्न करू असे बोलताना सौ कडगावकर म्हणाल्या
महिला सबलीकरण धोरणांन्वेये फाउंडेशन वतीने बचत गट स्थापनेचा निर्णय घेण्यात आला असून. या कार्यक्रमास गावातील सर्व उत्साही महिलांनी लक्षणीय उपस्थिती दाखविली होती. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री.पाटील व संचालक मंडळ उपस्थित होते. सदर मडिलगे येथील बचत गटाच्या मार्गदर्शक सौ. जयश्री कांबळे यांनी बचत गटाची ध्येय धोरणे व नियम अटी अन्य माहिती दिली. अल्पोहाराने कार्यक्रमाचा शेवट झाला सूत्रसंचालन सौ. अनिता हासबे यांनी केले, सौ. सुजाता पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.
