कै.रघुनाथ रामचंद्र बुरांडे ग्रंथालयाचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकात दादा पाटील – आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते संपन्न.
पन्हाळा.-प्रतिनिधी.

कोडोली ता. पन्हाळा येथील वाचन संस्कृतीचे जतन आणि संवर्धनासाठी ग्रंथालय चळवळ मोठी भूमिका बजावतात. त्यामुळे ग्रंथालयाचे काम अधिकाधिक वृद्धिंगत व्हावे, यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकात दादा पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.तसेच वास्तव दर्पण या साप्ताहिकाच्या तृतीय वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या…
आजकाल वाचन संस्कृती कमी झाली आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी वाचन आवश्यक असून त्याला दुसरा कोणताच पर्याय नाही. ग्रंथ आणि पुस्तक हे ज्ञान संपादनाचे सर्वात मोठे साधन आहे. तसेच वाचन हा माहिती देण्याचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. वाचन संस्कृतीकडे तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी कै.रघुनाथ रामचंद्र बुरांडे ग्रंथालय आदर्शवत ठरेल असा विश्वास आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी व्यक्त केला…
यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक अमरसिंह पाटील (भाऊ), जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते ॲड.राजेंद्र पाटील,कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर,कोडोली सरपंच प्रकाश पाटील,कोडोली उपसरपंच माणिक मोरे,सर्वोदय विकास सोसायटीचे चेअरमन लक्ष्मणराव शंकरराव कुलकर्णी,भाजपा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे,बाळासाहेब यादव,मकरंद बुरांडे,ओंकार बुरांडे यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते…
