महसूल मंत्री यांची मोठी घोषणा ! – राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालये आता शनिवार आणि रविवार – दिवशीही राहणार सुरू
मुंबई.- प्रतिनिधी.
सामान्य जनतेच्या सोयीसाठी जिल्हा मुख्यालय आणि महानगरपालिका क्षेत्रातील दुय्यम निबंधक कार्यालय आता शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशीहि सुरू राहणार आहेत.
त्यामुळे नागरिकांना दस्त नोंदणीत अडचण निर्माण होणार नाही आणि यापुढे नॉन स्टॉप दस्त नोंदणी होणार असल्याचे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

काय म्हणाले महसूल मंत्री.-
खरेदी विक्री व्यवहारामध्ये वाढ होत असल्याने नागरिकांना त्यांच्या कामाच्या वेळेत दस्त नोंदणी करणे शक्य होत नाही.तसेच दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेता नागरिकांना सुट्टीच्या दिवशी दस्त नोंदणी करता यावी या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे
यामध्ये मुंबई विभागातील मुंबई शहर, उपनगर, कोकण विभागातील ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, पालघर, रायगड अलिबाग, पुणे विभागातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती भागातील अकोला, अमरावती,
तसेच नागपूर भागातील नागपूर, लातूर भागातील लातूर, नांदेड, नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजी नगर भागातील औरंगाबाद जिल्हा या मुख्यालय –
आणि महानगरपालिका क्षेत्रातील दुय्यम निबंधक कार्यालय शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार आहेत – त्यामुळे नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.
राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालये आता शनिवार आणि रविवारीही सुरू राहणार.
