राज ठाकरेंची आज रत्नागिरीत सभा.- उध्दव ठाकरेंचा बरसुमध्ये संवाद.- राजकीय आरोपांचा धुरळा उडणार?
राजापूरचा समर्थन मोर्चा.- सत्ताधाऱ्यांचा मोर्चा.- उध्दव ठाकरे यांची बारसू भेट वादळी ठरण्याची शक्यता
रत्नागिरी :- प्रतिनिधी.

राज ठाकरे यांची आज रत्नागिरीत सभा आहे. रत्नागिरी शहरातील प्रमोद महाजन क्रिडा संकुल मैदानावर राज ठाकरेंच्या सभेसाठीची मनसैनिक जय्यत तयारी करीत आहेत. कोकणातील या सभेला किती प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्वाचे आहे.या सभेत राजकीय तोफा धडाडणार असून राज ठाकरे आरोपांचा धुरळा उडवण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
तसेच राज ठाकरे आज बारसूवर भूमिका मांडणार का? तसेच राष्ट्रवादीच्या घडामोडींवर काय बोलतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून टीझर जारी केला आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या भाषणाचा रोख कुणाकडे असेल? हे पाहणं महत्वाचे आहे. “सगळेचजण आपापला विचार करतायत, किमान आपण तरी महाराष्ट्राचा विचार करू. असे टीझरमध्ये राज ठाकरेंच्या आवाजात म्हटले आहे.

दुसरीकडे उध्दव ठाकरे बारसू येथे प्रकल्प बधितांची भेट घेणार आहेत. त्यामुळे प्रकल्प विरोधक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. उध्दव ठाकरे यांच्या सभेला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्याने प्रकल्प विरोधकांमध्ये असंतोष आहे. तर राजापूर जवाहर चौकातून रिफायनरी समर्थकांचा मोर्चा निघणार आहे. या मोर्चात केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे दिग्गज नेते सहभागी होणार आहेत. त्यामुळे रिफायनरी विरोधक आणि समर्थक असा शक्ती प्रदर्शनाचा कलगीतुरा राजापूर मध्ये आज पाहायला मिळणार आहे.

【 बारसूच्या, रिफायनरीबाबत राज ठाकरे कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष
राजापूरचा समर्थन मोर्चा..- उध्दव ठाकरे यांची बारसू भेट वादळी ठरण्याची शक्यता 】