Home कोंकण - ठाणे रेखा गुप्ता होणार दिल्लीच्या मुख्यमंत्री.- भाजपकडून महिला नेत्याला नेतृत्वाची संधी.- आज शपथविधी.🛑...

रेखा गुप्ता होणार दिल्लीच्या मुख्यमंत्री.- भाजपकडून महिला नेत्याला नेतृत्वाची संधी.- आज शपथविधी.🛑 तालुक्यातील आगवे येथे विहिरीत पडला गवा.- वनविभागाने गव्याला सुखरूप बाहेर काढले🟥साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना लुटणारी टोळी गजाआड.🔴पुण्यातील बारामतीत तरुणीचा जीबीएस आजाराने मृत्यू.

Oplus_0

🟥रेखा गुप्ता होणार दिल्लीच्या मुख्यमंत्री.- भाजपकडून महिला नेत्याला नेतृत्वाची संधी.- आज शपथविधी.
🛑 तालुक्यातील आगवे येथे विहिरीत पडला गवा.- वनविभागाने गव्याला सुखरूप बाहेर काढले
🟥साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना लुटणारी टोळी गजाआड.
🔴पुण्यातील बारामतीत तरुणीचा जीबीएस आजाराने मृत्यू.

नवी दिल्ली :- प्रतिनिधी.

दिल्ली विधानसभेत भाजपने आम आदमी पक्षाचा मोठा पराभव केला आहे. दरम्यान उद्या दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्याचा शपथविधी होणार आहे. त्याआधी म्हणजेच आज भाजपच्या विधिमंडळ गटाची बैठक पार पडली. पक्षाच्या विधिमंडळ बैठकीत दिल्लीच्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अखेर दिल्लीला चौथ्या महिला मुख्यमंत्री मिळाल्या आहेत. भाजप आमदार रेखा गुप्ता यांची विधिमंडळ गटाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. रेखा गुप्ता या दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या आहेत. उद्या रेखा गुप्ता या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. तर परवेश वर्मा हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. रेखा गुप्ता या आता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असणार आहेत. रेखा गुप्ता या दिल्लीतील शालीमार विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. पक्षाचे दोन निरीक्षक रविशंकर प्रसाद आणि ओम प्रकाश धनखड यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रि‍पदावर कोण असावं? यावर दिल्लीच्या आमदारांसोबत वन टू वन चर्चा केली, त्यानंतर दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे, त्या उद्या मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. भाजपने त्यांच्या एक्स हँडलवर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाबाबतची माहिती देत रेखा गुप्ता यांचे अभिनंदन केले आहे. भाजपाने पोस्ट करत म्हटले की, दिल्ली भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल रेखा गुप्ता यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. तुमच्या नेतृत्वाखाली राज्य प्रगती करेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.

तब्बल 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये भाजपला सत्ता मिळाली आहे, भाजपनं आपच्या या गडाला सुरुंग लावत सत्ता काबीज केली. मात्र स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर देखील दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण असणार? याबाबत सस्पेंस कायम होता. त्यानंतर पक्षाचे निरीक्षक रविशंकर प्रसाद आणि ओम प्रकाश धनखड यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रि‍पदावर कोण असावं? यावर दिल्लीच्या आमदारांसोबत वन टू वन चर्चा केली. त्यानंतर आज भाजप आमदारांच्या बैठकीमध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. रेखा गुप्ता या दिल्लीच्या शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. त्यांच्याकडे आता दिल्लीच्या मुख्यमंत्रि‍पदाची सुत्रं असणार आहेत. भाजपसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे, कारण तब्बल 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये भाजपची सत्ता आली आहे.

🛑चिपळूण तालुक्यातील आगवे येथे विहिरीत पडला गवा.- वनविभागाने गव्याला सुखरूप बाहेर काढले

चिपळूण :- प्रतिनिधी

चिपळूण तालुक्यातील आगवे येथील लोटाची बाव या स्थानिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी गवा रेडा विहिरीत पडला. वनविभागाने या गव्याला सुखरूप विहीरीबाहेर काढत त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केले आहे.
आगवे येथील लोटाची बाव या स्थानिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी गवा रेडा विहिरीत असलेबाबात पोलिस पाटील आगवे यांनी भ्रमणध्वनी वरून आज बुधवारी वनविभागाला माहिती दिली. त्यानुषंगाने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदरच्या घटनेची जागेवर जाऊन पाहणी करून वरिष्ठांचे मार्गदर्शनात जेसीबीच्या साहाय्याने विहिरीचे एका बाजूने मार्ग करून गव्याला विहिरीच्या बाहेर सुखरूप काढले व नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. या बचावकार्य प्रसंगी वनपाल सावर्डे श्री उमेश आखाडे व वनरक्षक नांदगाव श्री अनंत मंत्रे उपस्थित होते.

🟥साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना लुटणारी टोळी गजाआड

अहिल्यानगर :- प्रतिनिधी

शिर्डीला साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना लुटणा-या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दोन दिवसांपुर्वी सुरतवरुन शिर्डीला येणा-या भाविकांचे वाहन अडवून बंदूक आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवत लूटमार केल्याची धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात घडली होती. स्थानिक गुन्हे शाखेने श्रीरामपूर येथील मोरख्यासह सात आरोपींना ताब्यात घेत लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून यापूर्वी देखील या टोळीने लूटमार केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात राज्यातील सुरत येथील रहिवाशी मोहित पाटील हे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत इर्टिगा वाहनातून शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी निघाले होते. त्यांचे वाहन सकाळी सहाच्या दरम्यान लासलगाव मार्गे कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात आले होते. त्यावेळी दुसऱ्या एका चार चाकी वाहनातून आलेल्या सात ते आठ जणांच्या टोळीने ओव्हरटेक करत पाटील यांचे वाहन थांबवले. यावेळी आरोपींनी हातातील बंदूक आणि धारदार शस्त्रांचा धाक दाखवत लुटमार केली.

मोहित पाटील यांच्याकडील सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम असा लाखो रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिनेश आहेर यांचे पथक आणि कोपरगाव पोलिस यांनी समांतर तपास करत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्याचा छडा लावला आहे. गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचत पाच आरोपींसह दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून लोखंडी कत्ती, गावठी कट्टा, एअर गण, धातूच्या अंगठ्या, चैन असा 9 लाख 64 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

🔴पुण्यातील बारामतीत तरुणीचा जीबीएस आजाराने मृत्यू.

पुणे :- प्रतिनिधी.

बारामतीतील किरण राजेंद्र देशमुख या युवतीचा जीबीएस आजाराने मंगळवारी मृत्यू झाला आहे. गेल्या तीन आठवड्यापेक्षा अधिक काळापासून तिची या आजाराशी झुंज सुरू होती. बारामतीतील किरण ही सिंहगड परिसरात शिक्षणाच्या निमित्ताने नातेवाईकांकडे राहत होती. याच दरम्यान तिला जीबीएसची लागण झाली होती.

🟥राज्यात गुलेन बॅरे सिंड्रोम या आजाराची रुग्णांची संख्या २०० वर पोहोचली आहे. नुकतंच या आजाराशी झुंज देणाऱ्या एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बारामतीतील किरण राजेंद्र देशमुख या तरुणीचा जीबीएस सिंड्रोम आजाराने मंगळवारी मृत्यू झाला. गेल्या तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळापासून तिची या आजाराशी झुंज सुरू होती. बारामतीतील किरण ही सिंहगड परिसरात शिक्षणाच्या निमित्ताने नातेवाईकांकडे राहत होती. याच दरम्यान तिला जीबीएसची लागण झाली होती.

किरण ही शिक्षणाच्या निमित्ताने सिंहगड परिसरात नातेवाईकांकडे राहत होती. याच दरम्यान पुण्यामध्ये जीबी सिंड्रोमचे रुग्ण वाढू लागले आणि किरण राहत असलेल्या परिसरातही रुग्ण आढळले. दरम्यान किरणमध्येही ही लक्षणे जाणवू लागली. जुलाब व अशक्तपणामुळे बारामतीत कुटुंबांकडे आलेल्या किरणला तिच्या कुटुंबीयांनी बारामतीतील तज्ञांना दाखवले. तेव्हा तज्ञांना तिच्या लक्षणावरून शंका आली आणि त्यांनी पुण्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तिला तातडीने पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. २७ जानेवारीपासून तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र तिचा प्रकृती अधिकच खालावत गेल्याने तिचा मंगळवारी रुग्णालयात मृत्यू झाला, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.