आजरा देवकांडगांवत मोटरसायकलवर बसलेल्या विवाहितेचा अपघातात मृत्यू
आजरा.- प्रतिनिधी.

देवकांडगांव (ता.आजरा) येथे मोटरसायकलवर बसलेल्या विवाहितेचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज दि. ४ रोजी दुपारी घडली.सौ.शोभा संजू चव्हाण (वय ३८,रा.समुद्रवाणी, जि. उस्मानाबाद) असे महिलेचे नाव आहे.
मयत विवाहितेचा पती हा आपली पत्नी शोभा समवेत मोटरसायकल वरुन भरधाव जात होता. देवकांडगांव गावाच्या हद्दीत पायरशेत जवळ घसरतीला वळणावर शोभा ह्या मोटरसायकल वरुन खाली पडल्या. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. संजू चव्हाण व इतर नवले (ता.भुदरगड) येथे रस्ते कामाला होते. अधिक तपास पो. चेतन घाटगे करत आहेत.