आजरा मलिग्रे येथील श्री लक्ष्मी व चाळोबा देवाची यात्रेला सुरुवात.
आजरा.प्रतिनिधी.

मलिग्रे ता.आजरा येथील श्री लक्ष्मी व चाळोबा देवाची यात्रा पंद्रावर्षा नंतर होत असून मलिग्रे ग्रामपंचायत यात्रा कमिटी देवस्थान कमिटी मंबईकर ग्रामस्थ याच्या पुढाकारातून यात्रा भव्य दिव्य स्वरुपात संपन्न करण्यासाठी धार्मिक सांस्कृतिक मनोरंजन व विविध स्पर्धात्मक कार्यक्रमाचे नियोजन सुरू आहे.
यात्रेला मंगळवार दिनांक २ मे रोजी ईरडे पडले असून सिमा बांधण्यासाठी देवस्की केली आहे. यात्रेच्या निमित्ताने व्यापार्यानी आपली दुकाने आकर्षकरित्या थाटली असून यात्रेसाठी सर्व सासुरवाशीनी माहेरी आल्या आहेत .मंबईकर ग्रामस्थ आपला लवाजमा घेऊन आल्याने, गाव फूलून दिसत आहे. प्रकाश झोतात झालेल्या कबड्डी स्पर्धा व रशीखेच स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला.
या यात्रेत लक्ष्मीदेवीच्या मुख्य भर यात्रेबरोबर स्थानिक ग्रामदैवत चाळोबा, मल्लिकार्जून, रवळनाथ व भावेश्वरी देवाची देखील, यात्रा साजरी केली जाते . हक्कीमदारांकडून त्यांच्यावर सोपवलेले धार्मिक विधी व इतर जबाबदारी पार पाडल्या जातात. त्यामध्ये शिवाजी गुरव, बाबूराव गुरव हे देवीची पुजा करतात. चंद्रकांत सुतार, भिकाजी सुतार याच्या घरी देवी असते, ते देवीची देखभाल व पुजा करतात.
भरयात्रेदिवसी देवीला रथात स्थानपन केल्यानंतर, रात्री आकरा वाजल्यापासून पहाटे सहा वाजेपर्यंत रथ खेळवण्याचा कार्यक्रम सुरू असतो.यानंतर देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम दिवसभर सुरू असतो. शनिवारी रात्री १२ वाजले पासून श्री चाळोबा देवाची पालखी सोहळा सुरू होतो. पालखीची सवाद्ये मिरवणूक सकाळ पर्यंत चालते.स्थानकापाशी गेल्यानंतर देवीला चिमणीचे बळ दिले जाते. यानंतर गावचे मानाचे बकरे दिले जाते. त्यानंतर ग्रामस्थांची बकरी पडली जातात. शुक्रवार शनिवार रविवार चालणार्या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळतो .यासाठी गावच्या सरपंच सौ शारदा गुरव, उपसरपंच सौ शोभा जाधव, माझी सरपंच समिर पारदे, यात्रा कमिटी अध्यक्ष अनिल कागिनकर, उपाध्यक्ष आप्पाजी बुगडे, किशोर जाधव, अनिल बुगडे देवस्थान कमिटी अध्यक्ष व सदस्य, मंबई ग्रामंडळाचे अध्यक्ष, सदस्य , उद्योगपती विविध संस्थाचे पदाधिकारी, मान्यवर, देणगीदार व ग्रामस्थ याच्या सहभागाने यात्रा संपन्न होत आहे.
श्री लक्ष्मीदेवीची यात्रा पुर्वी वर्षाला केली जात असे, नंतर ती तीन वर्षानी होऊ लागली. पण दिवसे दिवस वाढती महागाई पाहता, ग्रामस्थानी पाच वर्षांनी करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये देखील बदल होऊन, सात वर्षीनी यात्रा करण्याचे ठरले. यापुर्वी १९९०मध्ये नंतर १९९९मध्ये नंतर २००९ मध्ये व आता २०२३मध्ये यात्रा संपन्न होत आहे.