आजरा – वेळवट्टी ग्रामपंचायतीने सुरु केला कन्यादान उपक्रम –
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील वेळवट्टी येथील ग्रामपंचायत वतीने गावातून लग्न होवून बाहेरगावी सासरी जाणाऱ्या प्रत्येक मुलीला ग्रा. पं. वतीने माहेरची साडी कन्यादान म्हणून देणेचा उपक्रम ग्रा पं वेळवट्टी यांनी सुरु केला असून आज दि. ४ रोजी पहिली माहेरची साडी विद्या अर्जुन सुतार या नवविवाहीतेला प्रदान केली’ यावेळी लोकनियुक्त सरपंच मनिषा देसाई, उपसरपंच आंबूबाई सुतार, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी कुंभार, प्रकाश पोवार, इंद्रजीत देसाई, वर्षा निकम, स्वाती कुंभार, ग्रामसेवक संदिप. चौगले ग्रामस्थ वर – वधु कडील सर्व मंडळी उपस्थीत होते.