HomeUncategorizedKarnataka Election 2023 :-- तीनही ओपिनियन पोलमध्ये भाजपला झटका.- कर्नाटकात काॅंग्रेसचेच सरकार...

Karnataka Election 2023 :– तीनही ओपिनियन पोलमध्ये भाजपला झटका.- कर्नाटकात काॅंग्रेसचेच सरकार येण्याचे संकेत

Karnataka Election 2023 :– तीनही ओपिनियन पोलमध्ये भाजपला झटका.- कर्नाटकात काॅंग्रेसचेच सरकार येण्याचे संकेत

बगळुरू :- वृत्तसंस्था.

कर्नाटकात 10 मे रोजी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसताना दिसत आहे. एबीपी, टीव्ही 9 , एडिना ओपिनियन पोल मधून ही माहिती समोर आली आहे.

ओपिनियन पोलच्या आकडेवारीनुसार राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे तर भाजप आणि जेडीएसचा आलेख खाली घसरताना दिसत आहे. कर्नाटकात सध्या राजकीय पक्षांचा जोरदार निवडणूक प्रचार सुरू आहे. निवडणुकीच्या निकालाबाबत पक्षश्रेष्ठींमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.

कर्नाटक विधासभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वृत्तवाहिन्यांचे तीन ओपिनियन पोल –

👉एबीपी न्यूज-सीव्होटर ओपिनियन पोल.

एकूण जागा – 224
भाजप – 74 ते 86 जागा
काँग्रेस – 107 ते 119 जागा
जेडीएस – 23 ते 35 जागा
इतर – 0 ते 5 जागा

मतदानपूर्व सर्वेक्षण.TV9

एकूण जागा – 224
भाजप – 79 ते 89 जागा
काँग्रेस – 106 ते 116 जागा
जेडीएस – 24 ते 34 जागा

👉कन्नड माध्यमांनीही सर्वेक्षण केले आहे –

कन्नड मीडिया आउटलेट एडिना यांनी कर्नाटक निवडणुकीसंदर्भात मतदानपूर्व सर्वेक्षण केले असून त्याला ‘मेगा सर्वेक्षण’ असे नाव दिले आहे. एडिनाच्या मेगा सर्व्हेमध्ये काँग्रेस पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्याचे दिसून आले आहे. मेगा सर्व्हेनुसार काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

👉एडिनाचे मेगा सर्वेक्षण.

एकूण जागा – 224
भाजप – 57 ते 65 जागा
काँग्रेस – 132 ते 140 जागा
जेडीएस – 19 ते 25 जागा
इतर – 1 ते 5 जागा

कर्नाटकचा रस्ता भाजपसाठी अवघड –

या तिन्ही सर्व्हे आणि पोलच्या आकडेवारीनुसार कर्नाटकचा रस्ता भाजपसाठी खूपच अवघड दिसत आहे. पण, पक्ष पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास व्यक्त करत आहे. दुसरीकडे ही आकडेवारी पाहता काँग्रेसची स्थिती भक्कम असल्याचे दिसून येत आहे. जेडीएसही निवडणुकीच्या मैदानात आपली ताकद दाखवत आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून त्याचे निकाल 13 मे रोजी जाहीर होणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.