Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा किणे नजीक.-अपघातात झाडावर गाडी आढळून जवानाचा मृत्यू.

आजरा किणे नजीक.-अपघातात झाडावर गाडी आढळून जवानाचा मृत्यू.

आजरा किणे नजीक.अपघातात झाडावर गाडी आढळून जवानाचा मृत्यू.

आजरा.- प्रतिनिधी.

किणे (ता. आजरा) हद्दीत आज दि २ रोजी दुपारी चारचाकी अपघातात रजेवर आलेले जवान मसणू थोंडीबा मणगुतकर (वय ३२ वर्षे) रा. तावरेवाडी ता.गडहिंग्लज यांचा मृत्यू झाला.
मणगुतकर हे आपल्या मामाच्या मुलीच्या लग्नासाठी आजच (बुधवार) आले होते. कामानिमित्त ते आजऱ्याकडे आपल्या अल्टो (गाडी क्र एम एच-०६-एएस-८५५६) ने येत असताना त्यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याकडेच्या झाडावर आदळली अपतातात ते गंभीर जखमी होवुन जागीच मरण पावले. मणगुतकर हे २०१४ साली सातारा येथे सैन्यान भरती झाले होते. त्यांनी शीख रेजीमेंट मधून लेह लडाख, लखनौ या ठिकाणी ५ वर्षे सेवा बजावली. त्यांच्या पश्चात आई-वडील दोन भाऊ,बहीण असा परिवार आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थीतीत त्यांनी सैन्यान भरती मिळवली होती. त्यांच्या या अपघातामुळे तावरेवाडी गाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.