श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह येथे इचलकरंजी शहर शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन.
इचलकरंजी.- प्रतिनिधी.
इचलकरंजी शहर पोलीस दलाच्या वतीने बुधवार दिनांक 3/05/2023 रोजी सायंकाळी 5:00 वा च्या सुमारास श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह येथे इचलकरंजी शहर शांतता समितीची बैठक आयोजित केली आहे.
सदर बैठकीमध्ये मा.श्री.राहुल रेखावारसो ( जिल्हा अधिकारी कोल्हापूर ) व मा.श्री.डॉ शैलेश बलकवडेसो ( जिल्हा पोलीस अधीक्षक कोल्हापूर ) हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक मा श्री निकेश खाटमोडे-पाटील साहेब,पोलीस उपअधीक्षक मा श्री रामेश्वर वैजने साहेब,गावभागचे पोलीस निरीक्षक श्री राजू ताशीलदार, शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक श्री सत्यवान हाके,शहापूरचे सहायक पोलीस निरीक्षक श्री अभिजित पाटील व शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक श्री विकास अडसूळ हे उपस्थित रहाणार आहेत.
तरी इचलकरंजी शहरातील शांतता समितीचे सर्व सदस्य,महिला दक्षता कमिटीच्या सर्व सदस्या तसेच शहरातील सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख व सामाजिक संघटनेचे सर्व पदाधिकारी व पत्रकार बंधूनी सदर बैठकी करीता उपस्थित रहावे असे अवाहन इचलकरंजी पोलीस दल यांनी केले आहे.