व्यंकटराव हायस्कूल आजरामध्ये १ मे महाराष्ट्र दिन साजरा.
आजरा.- प्रतिनिधी.

व्यंकटराव हायस्कूल आजरामध्ये १मे महाराष्ट्र दिन विविध उपक्रमानी संपन्न झाला. जेष्ठ नेते आजरा महाल शिक्षण मंडळचे चेअरमन जयवंतराव शिंपी यांच्या हस्ते ध्वजारोहण करणेत आले. श्री शिंपी यांचा ७२ वा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला. शाळेचा निकाल व गुणानुक्रमे प्रथम,द्वितीय,तृतीय,तसेच मागासवर्गीयात मुलात,मुलीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करणेत आला.तसेच कलाशिक्षक श्री कृष्णा दावणे यांना सह्याद्री लाईव्ह युट्युब चॅनेल महाराष्ट्र यांचे वतीने राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल अध्यक्ष श्री शिंपी संचालक मंडळाच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.तसेच यावेळी आजरा महाल शिक्षण मंडळाचे पदाधिकारी उपाध्यक्ष आण्णासाहेब पाटील,सचिव एस पी कांबळे संचालक सुनिल देसाई,सचिन शिंपी,सुनिल पाटील,पांडूरंग जाधव तसेच प्राचार्य, आर.जी.कुंभार,पर्यवेक्षिका सौ व्ही.जे.शेलार तसेच सर्व शाखांचे सहाय्यक शिक्षक.शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.