ध्यास स्नेहमेळाव्याचा उद्देश एक दिवसीय शाळेचा.- आनंद लुटण्याचा.
( सरस्वती हायस्कूल हात्तीवडे माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न. )
आजरा. प्रतिनिधी.

सरस्वती हायस्कूल हात्तीवडे ता. आजरा येथील या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा दि. १ मे रोजी उत्साहात संपन्न झाला. सरस्वती हायस्कूल या माध्यमिक हायस्कूलमध्ये सन. १९९४ – १९९५ सालात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी इयत्ता १० मधुन शिक्षण घेऊन बाहेर पडलेली सर्व माजी विद्यार्थी यांचा स्नेहमेळावा एकत्रितपणे एकाच व्यासपीठावर सर्व माजी शिक्षक यांना आमंत्रित करून जुन्या आठवणींना उजाळा देत स्नेह मेळाव्यासाठी एकत्र येऊन सर्व माजी विद्यार्थी यांनी कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मुर्ती पूजन व छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती राजश्री शाहू ,फुले, भारतरत्न डॉ. आंबेडकर, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने व कार्यक्रमाचे अध्यक्ष सावंत सर व हायस्कूलचे विश्वस्त विश्वास चव्हाण यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. या हायस्कूलच्या दहावी बॅच कडून हायस्कूलसाठी म्युझिक सिस्टीम भेट देण्यात आली.

स्नेहमेळावा कार्यक्रमाच्या
शाळेतील त्या जुन्या आठवणींचा उजाळा देताना प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी आपण शाळेत असल्याचा आनंद आपल्या मनोगतातून व्यक्त करत सोशल मीडियाच्या माध्यमातून स्नेहमेळाव्याचे आयोजन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोलाचा वाटा उचलला याबद्दल सर्व विद्यार्थ्यांनी यांचे आभार मानले. या स्नेहमेळावा कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक या सर्व पाहुण्याने मागे वळून पाहणारा विद्यार्थी व जन्मभूमीची संस्कृती जपनुक करणारा विद्यार्थी या सरस्वती हायस्कूलचे असल्याचे मान्यवरांनी आपल्या मनोगतात भावना व कौतुक केले. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी आपल्या आठवणी सांगून सोहळ्याची रंगत वाढवली कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सावंतसर यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना आपल्या मुलांना शिक्षणात काहीही कमी पडू देऊ नका असे सांगत जीवन खूप सुंदर आहे ते आयुष्य आनंदात जगा अशी शिकवण दिली ..तर छडी लागे छम…छम – विद्या येई घम..घम चे महत्व पटवून दिले आपल्या बहुमूल्य मार्गदर्शनात श्री. सावंत सर यांनी केले . यावेळी बेनके सर, पाटील सर, हरेर सर सर्व विद्यार्थी शिक्षकांचे स्वागत केले यावेळी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक, गावातील जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांशी स्नेह भोजनाचा आस्वाद घेत आपल्या एक दिवशी शाळेचा आनंद लुटला.

या स्नेह मेळाव्यासाठी अप्पा शेडगे, सुजित पंडित, विनोद पाटील, संदीप पाटील, एकनाथ कांबळे, उज्वला पाटील, अशा चव्हाण, या विद्यार्थी विद्यार्थिनी परिश्रम घेतले. या स्नेहमेवासाठी ४० विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या

