Homeकोंकण - ठाणेराज्यात थंडीची लाट, महाराष्ट्र गारठला.- अनेक ठिकाणी तापमानात कमालीची घट.🟪लाखभर माहितीअर्ज प्रलंबित.-...

राज्यात थंडीची लाट, महाराष्ट्र गारठला.- अनेक ठिकाणी तापमानात कमालीची घट.🟪लाखभर माहितीअर्ज प्रलंबित.- शासकीय अनास्था.- रिक्तपदांमुळे तक्रारींचा निपटारा कठीण!🟥 रक्षकसच निघाले भक्षक.- पैसे तिप्पट करण्याचे आमिष दाखवून ग्रामसेवकाचे १६ लाख लुटले.- बिंग फुटताच पीएसआय सह नाईक काॅन्स्टेबलसह ५ जण जेरबंद.👇👇

🟣राज्यात थंडीची लाट, महाराष्ट्र गारठला.- अनेक ठिकाणी तापमानात कमालीची घट.
🟪लाखभर माहितीअर्ज प्रलंबित.- शासकीय अनास्था.- रिक्तपदांमुळे तक्रारींचा निपटारा कठीण!
🟥 रक्षकसच निघाले भक्षक.- पैसे तिप्पट करण्याचे आमिष दाखवून ग्रामसेवकाचे १६ लाख लुटले.- बिंग फुटताच पीएसआय सह नाईक काॅन्स्टेबलसह ५ जण जेरबंद.👇👇

मुंबई :- प्रतिनिधी

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीची लाट कायम आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्याचा पारा कमालीचा घसरलाय. अनेक ठिकाणाचे कमाल आणि किमान तापमान घसरलेय. जम्मू काश्मीर,मानालीपेक्षाही महाराष्ट्रात काही ठिकाणी तापमान कमी होतं. थंडी वाढल्यामुळे कपाटातील गरम कपडे बाहेर काढण्यात आलेत. ठिकठिकाणी शेकोट्या पेटवण्यात आल्या आहेत.
🟥महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्याचा पारा १० अंशाच्या खाली घसरल्याने हुडहुडी वाढली आहे. धुळ्याचा पारा मागील तीन दिवसांपासून पाच अंशाच्या आसपास राहिलाय. धुळे येथील कृषी महाविद्यालयात सलग दुसऱ्या दिवशी राज्याचे हंगामातील नीचांकी ४ अंश तापमान नोंदले गेले. राज्यात तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता कायम आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या तापमानात सातत्याने घट होत असून सर्वात कमी 10 अंश तापमानाची नोंद करण्यात आलीय. या आठवड्यात तीन अंसाने तापमान खाली आले आहे. पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहणार आहे या थंडीच्या लाटेमुळे वृद्ध व मुलांमध्ये कपाचे आजार वाढले असून थंडी वाढत असल्याने प्रशासनाकडूनही नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे ग्रामीण भागात तर हवेमुळे थंडीचा कडाका आणखीनच जोर पकडत आहे.
रत्नागिरीमधील मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणारे दापेली शहरही गारठले आहे. दापोली किमान तापमान 7.8 सेल्सिअसवर असल्याची नोंद झाली. नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी घेतला शेकोटीचा आधार घेतलाय. गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची दापोलीला पसंती मिळत आहे. धुळ्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात घसरला आहे, आज धुळ्यामध्ये 5 आऊंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे, काल धुळ्यात 4 आऊंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती, या हाड गोठवणाऱ्या थंडीमुळे नागरिकांना शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे, त्याचबरोबर सकाळी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या देखील घटताना दिसून येत आहे. परभणीत थंडी कायम असून पाऱ्याची घसरण सुरूच असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी जिल्ह्याचा पारा 5 अंशांवर राहिला. त्यामुळे वाढत्या थंडीने परभणीकर गारठल्याचे चित्र पाहावयास मिळाले.आज त्यात किचित वाढ झाली असून आज 6.1तापमान नोंदविले गेले आहे.गेल्या दोन दिवसांपासून शहर परिसरात धुक्याची चादर दररोज सकाळी पसरत आहे. त्यामुळे जनजीवनावरसुद्धा परिणाम झाला आहे.नागरिक शेकोट्याचा आधार घेत आहेत.तसेच रब्बी हंगामातील पिकांना याचा मोठा फटका बसत आहे. दोन दिवसांमध्ये तापमानात सातत्याने घट होत आहे.

🟪लाखभर माहितीअर्ज प्रलंबित.- शासकीय अनास्था.- रिक्तपदांमुळे तक्रारींचा निपटारा कठीण!

मुंबई – प्रतिनिधी.

राज्यकर्ते आणि प्रशासनाच्या कारभारावर अंकुश ठेवण्यात प्रभावी अस्त्र ठरलेला माहिती अधिकार कायदा सरकारलाच नकोसा झाला आहे. मुख्य माहिती आयुक्तांसह विभागीय माहिती आयुक्तांची रिक्त पदे, कर्मचाऱ्यांची वानवा यामुळे राज्यात एक लाखाहून अधिक नागरिक माहितीच्या प्रतीक्षेत आहेत. सप्टेंबरअखेर प्रलंबित द्वितीय अपिलांची संख्या ८२ हजार ३८३ तर प्रलंबित तक्रारींची संख्या २२ हजार ३९० आहे. गेल्या तीन महिन्यांतील अपिले आणि अर्जांचा विचार करता हा आकडा एक लाखावर गेल्याचे सूत्रांनी सांगितले.
🟪माहिती अधिकार कायद्यामुळे प्रशासन आणि सरकारचा कारभार अधिक पारदर्शी होण्यास मदत होते. सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढण्यासाठी विरोधकांकडून या कायद्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मात्र दोन-तीन वर्षांपासून सरकारकडून पद्धतशीरपणे या कायद्याची अडवणूक केली जात आहे. २०१९ पासून राज्यातील विविध माहिती आयुक्तांकडे माहितीसाठीचे अर्ज आणि अपिले प्रलंबित आहेत. आयोगाच्या सप्टेंबर २०२४च्या मासिक अहवालानुसार माहितीसाठीच्या द्वितीय अपिलांची संख्या ८२ हजार ३८३ आहे. त्यामध्ये सर्वाधिक २० हजार प्रलंबित अपिले मुख्यालयातील असून नाशिक १२ हजार, पुणे आणि अमरावती प्रत्येकी ११ हजार द्वितीय अपिले प्रलंबित आहेत. अशाच प्रकारे माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी माहितीसाठी केलेल्या तक्रारींची संख्या २२ हजार ३९० असून मुख्यालयात सहा हजार तर पुणे आणि कोकण खंडपीठाकडे प्रत्येकी चार हजार अर्ज प्रलंबित आहेत.

🅾️माहिती देण्यास टाळाटाळ

माहिती अधिकार कायद्यानुसार तीस दिवसांत माहिती देणे सरकारी यंत्रणांना बंधनकारक असले तरी माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते. गेल्या चार-पाच वर्षांपासून अनेक अपिले सुनावणीच्या प्रतीक्षेत आहेत. परिणामी ज्यांनी माहितीसाठी अपील केले त्यापैकी काही अपिलार्थींचे आता निधन झाले आहे. आवश्यक माहितीची उपयुक्तता संपल्यामुळे आता लोकांनीही आपल्या तक्रारी किंवा अपिलांवर सुनावणी होण्याची आशा सोडून दिली आहे.

🟪आयोगाकडे स्वत:च्या आस्थापनेवर अत्यल्प कर्मचारी आहेत. त्यामुळे आता बाह्यस्राोताच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येत असून माहिती अपिलांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी लवकरच विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. त्यामध्ये महापालिकांशी संबंधित अपिले एकत्र करून आणि पालिका अधिकाऱ्यांना पाचारण करून अपिलांचा निपटारा केला जाणार आहे.
प्रदीप व्यास, मुख्य माहिती आयुक्त (अतिरिक्त कार्यभार)
🅾️ज्यांच्यावर या कायद्याच्या रक्षणाची जबाबदारी आहे तो माहिती आयोगच कमकुवत झाला आहे. माहिती आयुक्तांची नियुक्ती आणि संख्या वाढविण्यासाठी न्यायालयीन लढाई सुरू आहे. पण तेथेही सरकार वेळकाढूपणा करीत आहे. असेच सुरू राहिले तर ही चळवळ आणि कायदा इतिहासजमा होईल.
शैलेश गांधी, माजी केंद्रीय माहिती आयुक्त

🟥 रक्षकसच निघाले भक्षक.- पैसे तिप्पट करण्याचे आमिष दाखवून ग्रामसेवकाचे १६ लाख लुटले.- बिंग फुटताच पीएसआय सह नाईक काॅन्स्टेबलसह ५ जण जेरबंद

जळगाव :- प्रतिनिधी.

जळगाव पोलीस दलाला हादरून सोडणारी एक बातमी समोर आली आहे. पैसे तिप्पट करून देण्याच्या बहाण्याने पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील ग्रामसेवकाला तब्बल १६ लाखात गंडवल्याची घटना उघडकीस आली आहे.धक्कादायक म्हणजे संपूर्ण गुन्ह्याचा कट एका पोलीस कर्मचाऱ्यानेच रचला होता.पण पोलिसांचं बिंग फुटताच तिन पोलीसांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर याप्रकरणी पोलिसांनी पीएसआय प्रकाश मेढे,पोलीस नाईक योगेश शेळके (मुख्यालय) पोर्को दिनेश भोई (फैजपूर)या पोलीसांसह सचिन धुमाळ आणि निलेश अहिरे अशा पाच संशयित आरोपींना जेरबंद केलं आहे.असून १६ लाखांची रोकडही जप्त करण्यात आली आहे.
🔴मिळालेल्या माहितीनुसार, फसवणूक झालेल्या ग्रामसेवकाचं नाव विकास पाटील आहे. त्यांची सचिन धुमाळ नावाच्या व्यक्तीसोबत मैत्री होती. धुमाळ याने ग्रामसेवक विकास पाटील यांना माझ्याकडे काही दिवसात पैसे तिप्पट करून देणारा माणूस असल्याचे सांगितलं आणि त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानुसार सोमवारी सायंकाळी सचिन धुमाळ आणि ग्रामसेवक विकास पाटील हे रेल्वे स्थानकावर दाम तिप्पट करून देणाऱ्या व्यक्तीला पैसे देण्यासाठी गेले.यावेळी रेल्वे स्थानकावर पैसे घेण्यासाठी निलेश अहिरे आला. त्याला दोघांनी १६ लाख रुपये दिले. त्याचवेळी घटनास्थळी तीन पोलीस कर्मचारी आले, त्यांनी धाड टाकून पैशांच्या बॅगेसह पैसे तिप्पट करून देणाऱ्या निलेश अहिरेला ताब्यात घेतलं. त्यावेळी धुमाळ याने ग्रामसेवक विकास पाटील यांना सांगितले की, आता पोलीस पैसे घेऊन गेले आहेत. त्यामुळे आपल्याला काहीच करता येणार नाही, असं सांगितलं. तसेच पोलीस आपल्यावरच कारवाई करतील अशी भीती दाखवली.
🔴परंतु ग्रामसेवक विकास पाटील हे पोलीस अधीक्षक कार्यालयात आल्यानंतर पोलीस चौकशीत सगळाच भांडाफोड झाला. पोलीस कर्मचारी योगेश शेळके यानेच हे सगळे षडयंत्र रचले होते. त्याने ग्रेड पीएसआय प्रकाश मेढे आणि दिनेश भोई यांच्यांशी संगनमत करत ग्रामसेवकाचे पैसे लुबाडण्याचा डाव रचल्याचं उघड झालं. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पीएसआय प्रकाश मेढे, पोलीस कर्मचारी योगेश शेळके, दिनेश भोई, सचिन धुमाळ आणि निलेश अहिरे नामक संशयित आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.