Homeकोंकण - ठाणेजादूटोणा - अघोरी पूजेवर पोलिसांची कारवाई.- ५ जणांना अटक घरात आढळला ८...

जादूटोणा – अघोरी पूजेवर पोलिसांची कारवाई.- ५ जणांना अटक घरात आढळला ८ फुटी खड्डासुरी, कोयता साहित्य आढळल्याने नरबळीचीही शक्यता?

🟥 जादूटोणा – अघोरी पूजेवर पोलिसांची कारवाई.- ५ जणांना अटक घरात आढळला ८ फुटी खड्डा
सुरी, कोयता साहित्य आढळल्याने नरबळीचीही शक्यता?

सिंधुदुर्ग :- प्रतिनिधी

कुडाळ तालुक्यात हिर्लोक-आंबेडकरवाडी येथे एका घरात आठ फूट खोल खड्डा खणून अघोरी पूजा करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका दाम्पत्यासह पाच जणांना ताब्यात घेतले आहे. गृहदोष आणि मूल होत नसल्याने ही अघोरी पूजा होत असल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. या प्रकरणी कुडाळ पोलीस कसून तपास करत आहेत.

🟥याबाबत कुडाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिलोंक आंबेडकरवाडी येथील विशाल विजय जाधव नामक इसमाच्या राहत्या घरात काहीतरी संशयास्पद हालचाली असून घरात कोणतीतरी जादुटोणा करणारी अघोरी कृती चालल्याचा दाट संशय आहे. अशी माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलीस हवालदार मंगेश जाधव यांनी हिर्लोक – आंबेडकरवाडी येथे विशाल विजय जाधव याच्या राहते घरात जाऊन खातरजमा केली. त्यावेळी घरात सुमारे 4 X 4 X 8 लांबी-रुंदी आणि खोलीचा खड्डा खणलेला आढळला. अनिष्ट प्रथेचा वापर करुन जादूटोणा करणारे साहित्य सुद्धा आढळून आले. यामध्ये लिंबू, पान सुपारीचे विडे, हळद, पिंजर, नारळ, फळे, फुले, तिळ, बर्फीचे पुडे, पणत्या, अबीर, डमरु, रुद्राक्ष माळ, चामड्याचे छोटे चप्पल जोड, पांढरे कापड, गांधी टोप्या, बाजूला छोटया काठ्या, कांबळी घोंगड्याचे तुकडे, कवडे, बिब्बे अशा साहित्याची मांडणी करुन नरबळी अगर अन्य कोणत्या तरी अघोरी कृतीकरीता कोयता आणि सुरी अशी हत्यारे मांडणी केलेल्या स्थितीत दिसून आली.

🔴आवळेगाव दूरक्षेत्राच्या पोलिसांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांना ही माहिती कळवली. पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, पोलीस हवालदार कृष्णा केसरकर, प्रितम कदम, अनिल पाटील, महिला पोलीस ज्योती रायशिरोडकर यांनी घटनास्थळी जाऊन वस्तूस्थितीची खात्री केली. त्यावेळी घरात असलेले आरोपीत क्र. १ विशाल विजय जाधव (वय ३० वर्षे, रा. घर नं ३५३, हिर्लोक आंबेडकरवाडी ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग सद्या रा रु.नं. १, काजोळकर हाऊस, राजश्री प्लाम्सचे बाजूला धोबीबाळी, ठाणे (पश्चिम)) आरोपीत क्र. २. सुस्मित मिलींद गमरे (वय ३३ वर्षे रा. मु. पो. पातेपिलवली, धर्मवीर नगर, साईनिवास सोसायटी, विंग ९ रु. नं ७०९ ता. चिपळूण जि. रत्नागिरी), आरोपीत क्र. ३ हर्षाली विशाल जाधव पुर्वाश्रमीची समृध्दी अविनाश हडकर, (वय ३५ वर्षे रा. घर नं. ३५३, हिरलोक आंबेडकरवाडी ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग, सद्या रा. रुनं १. काजोळकर हाऊस, राजश्री प्लाम्सचे बाजूला धोबीबाळी, ठाणे पश्चिम) आरोपीत क्र. ४ अविनाश मुकुंद संते वय ३२ वर्षे रा. उसरघरगांव, मानपाडा, दिवारोड, डोंबिवली (पूर्व), जि. ठाणे) व आरोपीत क्र. ५ दिनेश बालाराम पाटील (वय ३४ वर्षे रा उसरघरगांव, मानपाडा, दिवारोड, डोंबिवली (पूर्व), जि. ठाणे) हे मिळून आले.

🟥त्यांचेकडे एवढा मोठा खड्डा खोदण्याचे कारण बिचारता विशाल विजय जाधव याचे घरास गृहदोष असल्याने तसेच त्याचे पत्नीस मुलबाळ होत नसल्याने त्यांची पिडा दूर करण्यासाठी सदरची अघोरी पूजा केल्याचे सांगितलेले आहे. परंतु ते समाधानकारक माहिती देत नाहीत, गुन्हयाचे सखोल अन्वेषणासाठी नमूद सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली असून आरोपींनी घटनास्थळी येण्या जाण्याकरीता वापरलेली इको कार क्र. MH 05 EV 6561 ही जप्त करण्यात आलेली आहे. पोलीस हवालदार मंगेश जाधव यांनी सदरबाबत फिर्याद दिलेली आहे. अधिक तपास स्वतः पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम हे करीत आहेत.

Previous article
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.