🟥हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 35,788 कोटींची पुरवणी मागणी.- लाडक्या बहिणींसाठी 1400 कोटींचा निधी.
🟥फसवणूक प्रकरणी तृप्ती मुळीकचे पोलिस दलातून निलंबन.- सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षकांची कारवाई.
🟥सोलापूरच्या पोलिस आयुक्तांचा नवा रेकॉर्ड! – एका वर्षात ७२ सराईत गुन्हेगारांना केले हद्दपार- तडीपार कोणाला केले जाते, पुढे कोणती कारवाई होते, त्यांच्यावर कसे ठेवले जाते लक्ष? पहा..👇
मुंबई :- प्रतिनिधी
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत 35 हजार 788 कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या मांडण्यात आल्या. यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून 1400 कोटी रुपयांची पुरवणी मागणी सादर करण्यात आली.तर मुंबई मेट्रो 3 साठी 655 कोटींची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे. राजकोटवरच्या शिवरायांच्या पुतळ्यासाठी राज्य सरकारकडून 36 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत पुरवणी मागणी मांडली.
🛑विधानसभेत मांडलेल्या पुरवणी मागण्यांत निधीची तरतूद
◼️सहकारी आणि खाजगी दूध संघांना प्रती लिटर 5 आणि 7 रुपये अनुदान यासाठी 758 कोटी रुपये.
◼️प्रधानमंत्री पिक विमा योजना यासाठी राज्याचा हिसा म्हणून 814 कोटी रुपये तरतूद.
◼️मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी 2 हजार 750 कोटींची तरतूद.
◼️यंत्रमाग वस्त्रोद्योग विज सवलतीसाठी 300 कोटी रुपये.
◼️सरपंच वाढीव मानधन यासाठी 128 कोटी.
◼️सामाजिक न्याय विभागाच्या योजनांसीठी 890 कोटी रुपयांची तरतूद.
◼️अदिवासी विकास विभागाला 1813 कोटी रुपये तरतूद.
◼️लाडकी बहिण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची अतिरीक्त तरतूद करण्यात आली आहे.
◼️अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 290 कोटी रुपयांची तरतूद.
◼️ओबीसी समाजासाठी मोदी आवास घरकुल योजनेसाठी 1250 कोटी रुपयांची तरतूद.
◼️मुंबई मेट्रो तीनसाठी 655 कोटी रुपयांची अतिरीक्त तरतूद.
◼️राज्यातील रस्ते व पुलासाठी 1500 कोटी रुपयांची अतिरीक्त तरतूद.
◼️इमारती, रस्ते, पुल बिनव्याजी कर्जातून बांधण्यासाठी 3195 कोटी रुपयांची तरतूद.
◼️राजयातील वैधकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी 1170 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद.
◼️सहकारी साखर कारखान्यांना मार्जिन मनी लोन देण्यासाठी 1204 कोटी रुपयांची अतिरिक्त निधीची तरतूद.
◼️राजकोट किल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी 36 कोटी रुपयांची अतिरीक्त तरतूद.
🟥लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींची तरतूद
लाडक्या बहिणींसाठी पुरवणी मागण्यांमध्ये 1400 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेतील तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. मात्र, मासिक लाभ 1500 वरुन 2100 करण्याची अजूनही तरतूद करण्यात आली नाही.
🟥फसवणूक प्रकरणी तृप्ती मुळीकचे पोलिस दलातून निलंबन.- सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षकांची कारवाई
सिंधुदुर्ग :- प्रतिनिधी
८५ लाखांची फसवणूक, नरबळी व जादुटोणा आदींचा वापर केल्याप्रकरणी कोल्हापूरपोलिसांनी अटक केलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलातील पोलिस चालक कर्मचारी तृप्ती मुळीक हिचे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी शुक्रवारी निलंबन केले आहे.तिला कोल्हापूर येथील न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिल्यानंतर सिंधुदुर्ग पोलिसांनी तिच्या निलंबनाची कारवाई केली आहे.
🛑राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आमदार उदय सामंत अशा अतिमहनीय व्यक्तींना असलेल्या डीव्ही कारची वाहन चालक म्हणून केलेल्या कामामुळे तृप्ती मुळीक प्रकाशझोतात आली होती. कोल्हापूर येथील या फसवणूक प्रकरणात तिचा हात असल्याचे व पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर सिंधुदुर्ग पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना धक्का बसला होता.
🔴गंगावेश कोल्हापूर येथील सुभाष हरी कुलकर्णी यांनी कोल्हापूर पोलिस ठाण्यात आपल्याला झालेल्या फसवणूक प्रकरणाबाबत ३ नोव्हेंबर २०२४ रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार एकूण नऊ संशयितांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सिंधुदुर्ग पोलिस अंमलदार असलेल्या तृप्ती संजय मुळीक (३२ रा. मूळ दरवेश पाडळी, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर व सध्या राहणार सिद्धिविनायक पार्क, दुसरा मजला, ओरोस) या सहा नंबरच्या संशयित आरोपी आहेत.
🅾️तृप्ती मुळीक हिच्यासह दीपक पाटणकर, अण्णा उर्फ नित्यानंद नायक, धनश्री काळभोर, शशिकांत गोळे, कुंडलिक झगडे, ओमकार पाटणकर, भारत पाटणकर, हरीश राऊत असे एकूण नऊ आरोपी आहेत. या सर्वांवर भादवि. कलम ३८४, ३८६, ४१९, ४२०, ३४ सह नरबळी इतर अमानूष अघोरी प्रथा व जादुटोणा आदीचा वापर करून ८४ लाख ६९ हजार रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला आहे.
🔴रोख रकमेसह, दागिने आणि किमती सामानाची फसवणूक
२४ लाख ८५ हजार किमतीचे सोन्याचे दागिने, दोन लाख ८० हजार किमतीचे चांदीचे दागिने व किमती वस्तू, ५४ लाख ८४ हजार रोख रक्कम व आरटीजीएस रक्कम, दोन लाखांचे लाकडी व किमती सामान, वीस हजार किमतीची परवाना बंदूक अशी रोख रक्कम व दागिन्यांसह किमती सामान फसवणूक करून दबाव टाकून घेतल्याचे व यात आपली या संशयित आरोपींनी फसवणूक केल्याची तक्रार दाखल झाल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे.
🟥सोलापूरच्या पोलिस आयुक्तांचा नवा रेकॉर्ड! – एका वर्षात ७२ सराईत गुन्हेगारांना केले हद्दपार
तडीपार कोणाला केले जाते, पुढे कोणती कारवाई होते, त्यांच्यावर कसे ठेवले जाते लक्ष?
सोलापूर :- प्रतिनिधी.
सामाजिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोचविणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी ‘एमपीडीए’पूर्वी तडीपारीचे अस्त्र रामबाण उपाय मानले जाते. प्रत्येक वरिष्ठ पोलिस अधिकारी तत्कालीन परिस्थिती पाहून तडीपारीची कारवाई करतात.तर अनेकदा राजकीय दबाव आणला जातो, तरीदेखील पोलिस अधिकारी समाजहिताला बाधा आणणाऱ्यांना तडीपार करतात. मागील पाच वर्षांत सर्वाधिक तडीपारीची कारवाई विद्यमान पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी शहरातील तब्बल ७२ जणांना एकाच वर्षात तडीपार केले आहे.
🅾️गुंडप्रवृत्तीचे सराईत गुन्हेगार, सार्वजनिक शांतता भंग करून सामाजिक सुरक्षितता व शांतता धोक्यात आणणारे लोक, खंडणी मागत धमकावणे, शासकीय कामात अडथळा आणून सरकारी नोकरांना कर्तव्य पार पाडताना अडथळा आणणे, असे गुन्हे दाखल असलेल्यांवर तडीपारीची कारवाई केली जाते. तरीसुद्धा त्याच्या वर्तनात सुधारणा न झाल्या पुढचा टप्पा म्हणून त्या सराईत गुन्हेगारावर ‘एमपीडीए’ची कारवाई केली जाते. या कारवाईनंतर त्या सराईत गुन्हेगाराची रवानगी थेट येरवडा कारागृहात केली जाते.
🔴महाराष्ट्र पोलिस कायद्यातील कलम ५५, ५७ अंतर्गत गुन्हेगारांच्या टोळ्यांवर तर कलम ५६ अंतर्गत वैयक्तिक सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली जाते. एम. राजकुमार यांनी एकाच वर्षात सात टोळ्यांमधील २४ जणांना तडीपार करण्यात आले. २०२० ते २०२४ या पाच वर्षांत पोलिस आयुक्तांनी एकूण ३० टोळ्यांमधील १०७ जणांना तडीपार केले आहे. पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांच्या रडारवर अजूनही तीन टोळ्या असून, वैयक्तिक स्वरूपाच्या ४० जणांवरही तडीपारीची कारवाई प्रस्तावित आहे.
🛑२०१९ नंतरचे पोलिस आयुक्त अन् कंसात कार्यकाळ
◼️१) अंकुश शिंदे :- (३१ मे २०१९ ते सप्टेंबर २०२१)
◼️२) हरिश बैजल :- (ऑक्टोबर २०२१ ते मे २०२२)
◼️३) सुधीर हिरेमठ :- (जून २०२२२)
◼️४) राजेंद्र माने :- (जून २०२२ ते जानेवारी २०२४)
◼️५) एम. राजकुमार :- (जानेवारी २०२४ ते आजपर्यंत)
🅾️वर्षनिहाय तडीपारीची कारवाई
◼️२०२० :-४२
◼️२०२१ :-५९
◼️२०२२ :-३०
◼️२०२३ :- ४९
◼️२०२४ :- ७२
🟥तडीपारीच्या यादीत आणखी ४० सराईत गुन्हेगार
महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५५, ५६ व ५७ अंतर्गत सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली जाते. तत्पूर्वी, नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार त्याला नोटीस पाठवून सुधारण्याची एक संधी दिली जाते. तरीदेखील, त्याच्या वर्तनात सुधारणा न झाल्यास त्याला किमान दोन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले जाते. मागील पाच वर्षांत सोलापूर शहरातील २५२ जणांना तडीपार करण्यात आले आहे. १ जानेवारी ते १२ डिसेंबर २०२४ या एकाच वर्षात शहरातील ७२ जणांना तडीपार करण्यात आले असून, त्यात सात टोळ्यांमधील २४ जणांचा देखील समावेश आहे. अजूनही ४० सराईत गुन्हेगार तडीपारीच्या यादीत आहेत. त्यातील बहुतेकांना शेवटची नोटीस बजावण्यात आली असून आता त्यांनी गुन्हा केला की, त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई होणार आहे.
🔴तडीपार व्यक्तींच्या घरावर ‘क्यूआर कोड‘
तडीपारीच्या कारवाईनंतर संबंधित गुन्हेगार पुन्हा निर्बंध घातलेल्या जिल्ह्यांमध्ये दिसायला नको. त्यासाठी खबऱ्यांचे नेटवर्क असतेच, याशिवाय त्याच्या घरावर क्यूआर कोड बसविला जातो. आठवड्यातून एकदा अचानकपणे त्याच्या घरी पोलिस भेट देऊन पाहणी करतात. तेथून त्या सराईत गुन्हेगाराला संपर्क करून त्याचे लोकेशन घेतले जाते. त्याने नियम मोडल्यास त्याच्यावर पुन्हा महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १४२ नुसार कारवाई होते.