🛑झुलपेवाडी चे सुपुत्र शुभम पावले याची इंडियन आर्मीत लेफ्टनंट या पदावर नियुक्ती.
🟥नव्या मंत्र्यांच्या शपथविधीनंतर आता खातेवाटप कधी? कोणाला कोणते खाते मिळणार? उत्सुकता शिगेला.
( कोणाला मिळणार कोणतं खातं.)
🛑आजऱ्यात हिंदी नवलेखकांसाठी पाच दिवसीय निवासी शिबिर.- आजरा महाविद्यालय व केंद्रीय हिंदी निदेशालयाच्यावतीने आयोजन.
आजरा.- प्रतिनिधी.
झुलपेवाडी गावचे सुपुत्र शुभम विठ्ठल पावले याची इंडियन आर्मी मध्ये लेफ्टनंट या पदावर नियुक्ती झाली आहे . शुभम ने दोन वर्षाचे खडतर प्रशिक्षण डेहराडून इंडियन मिलिटरी अकॅडमी मधून पूर्ण केले. काल तो पासिंग आऊट झाला. वयाच्या सहाव्या वर्षी पाहिलेले स्वप्न त्याने वयाच्या २४ व्या वर्षी पूर्ण केले. त्याच्या रूपाने भारतीय सैन्याला एक मराठा मावळा लेफ्टनंट म्हणून मिळाला. शुभम तुझे खूप खूप अभिनंदन आणि भावी आयुष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय हिंद जय भारत.
🟥नव्या मंत्र्यांच्या शपथविधीनंतर आता खातेवाटप कधी? कोणाला कोणते खाते मिळणार? उत्सुकता शिगेला.
( कोणाला मिळणार कोणतं खातं.)
मुंबई :- प्रतिनिधी
महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. नव्या सरकारच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा काल पार पडला आहे. महायुतीच्या मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात ३९ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये ६ राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. यामध्ये तब्बल २५ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली बघायला मिळत आहे. महिला, तरुण, विविध समाज यांचा विचार करुन महायुती सरकारकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे मंत्रिमंडळ विस्तारात अनेक दिग्गज नेत्यांना डच्चू देण्यात आला आहे. नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडल्यानंतर आता खातेवाटप कधी होईल? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
🔴हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आम्ही सर्वजण आज नागपुरात आलो आहोत. मंत्रिमंडळ बैठक नुकतीच पार पडली. अलिकडे पायंडाच पडलेला आहे की, विरोधी पक्ष हा सातत्याने चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकतात. हे वर्षानुवर्षे अलिकडे चाललं आहे. त्यामुळे चहापान करावं की न करावं हा एक विचार करणारा प्रश्न आहे. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना जे पत्र पाठवलं आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे नेहमीचे काही दाखले देण्याचा प्रयत्न केला गेला आहे, असं अजित पवार म्हणाले.
🟥महायुतीचं प्रचंड बहुमताने सरकार आलं आहे आणि आज त्याला खऱ्या अर्थाने मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊन अंतिम स्वरुप प्राप्त झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन-तीन दिवसांत सर्वांचे खातेवाटप करतील आणि सर्वजण कामाला लागलेले असतील. आमच्या सर्वांचा प्रयत्न आहे की, आमच्याकडे बहुमत असल्याने जनतेने दिलेला विश्वासाला पात्र राहून विकास कामे करु. तसेच विरोधकांची संख्या कमी असली तरी महाराष्ट्राच्या दृष्टीकोनाने महत्त्वाचे प्रश्न सभागृहात चर्चेला आले तर महाराष्ट्राच्या हिताने उत्तरे दिले जातील.
विरोधकांनीदेखील त्या पद्धतीने प्रश्न मांडायचे असतात, साधकबाधक विचार करायचे असतात, असंही अजित पवार म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील खातेवाटपावर प्रतिक्रिया दिली. खातेवाटप येत्या दोन दिवसांत पूर्ण करु. जवळपास आमची सर्व क्लियारिटी झालेली आहे. या अधिवेशनात आपल्याला कल्पना आहे की, राज्यपालाच्या अभिवादनावर चर्चा, पुरवणी मागण्यांवरील चर्चा, सत्तारुढ आणि विरोधी पक्षांच्या प्रस्तावावरील चर्चा, त्याचबरोबर जवळपास २० बिलं या अधिवेशात येणार आहेत. त्यामुळे चांगलं कामकाज करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
🛑आजऱ्यात हिंदी नवलेखकांसाठी पाच दिवसीय निवासी शिबिर.- आजरा महाविद्यालय व केंद्रीय हिंदी निदेशालयाच्यावतीने आयोजन
आजरा : – प्रतिनिधी.
आजरा महाविद्यालयात १७ ते २१ डिसेंबर दरम्यान हिंदीतरभाषी हिंदी नवलेखकांसाठी शिबिर होत आहे. केंद्रीय हिंदी निदेशालय शिक्षा मंत्रालय ( उच्च तर शिक्षा विभाग ) भारत सरकार, नवी दिल्ली व आजरा महाविद्यालय आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर होत आहे. पाच दिवसीय निवासी शिबिरात महाराष्ट्र, दिल्ली, केरळ, गोवा, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू या ठिकाणाहून नवलेखक आणि मार्गदर्शक सहभागी होत आहे. भ्रष्टाचारांनाबिराचे उद्घाटन १७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता शिवाजी विद्यापीठाचे प्र – कुलगुरु प्रो. डॉ. पी. एस. पाटील यांच्या उपस्थितीत व जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी बिहार येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्याम नंदन, पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. महेंद्र ठाकूरदास, केंद्रीय हिंदी निदेशालय, नवी दिल्ली येथील उपसंचालक रत्नेश मिश्रा उपस्थित राहणार आहेत. शिबिरात कविता, गीत, गझल, महाकाव्य, कथा, कादंबरी, एकांकिका, नाटक, निबंध, आत्मकथा, प्रवास वर्णन, समीक्षा आणि पत्रकारिता लेखन व अनुवाद इत्यादी विषयांवर मार्गदर्शन व चर्चासत्र होणार आहेत
शनिवार दिनांक २१ डिसेंबर रोजी दुपारी २ वा. शिवाजी विद्यापीठ हिंदी विभागाच्या प्रभारी अध्यक्ष प्रो. डॉ. तृप्ती करेकट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. नवलेखकांसाठीच्या शिबिरासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन आजरा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. ए. एन. सादळे, हिंदी विभाग प्रमुख व शिबिर संयोजक प्रो. डॉ. अशोक बाचुळकर यांनी केले आहे.