HomeUncategorizedविद्यार्थ्यांच्या हाताला कौशल्य देण्याचे काम व्होकेशनल विभागात - प्राचार्य डॉ. सादळे.🛑'मुख्यमंत्री माझी...

विद्यार्थ्यांच्या हाताला कौशल्य देण्याचे काम व्होकेशनल विभागात – प्राचार्य डॉ. सादळे.🛑’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची घोषणा. – राज्यातील २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा १ हजार ५०० रूपये मिळणार.🛑डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेंतर्गत प्रस्तावांची मागणी.

🛑विद्यार्थ्यांच्या हाताला कौशल्य देण्याचे काम व्होकेशनल विभागात – प्राचार्य डॉ. सादळे.
🛑’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची घोषणा. – राज्यातील २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा १ हजार ५०० रूपये मिळणार.
🛑डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेंतर्गत प्रस्तावांची मागणी.

आजरा.- प्रतिनिधी.

विद्यार्थ्यांच्या हाताला कौशल्य देण्याचे काम आजरा महाविद्यालयातील व्होकेशनल विभागामध्ये गेले अनेक वर्ष सुरू आहे. विद्यार्थ्यांनी या विभागाचा निकाल, रोजगार व स्वयंरोजगाराची परंपरा यापुढेही कायम ठेवावी असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सादळे यांनी केले. ते अकरावीच्या नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात बोलत होते. प्रमुख उपस्थिती कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील होते. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारात अकरावीच्या विद्यार्थ्यांचे औक्षण करुन, फुलांची उधळण करीत पेढा भरवून व फुल देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. तर कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या हस्ते वही व पेन देऊन गौरविणेत आले. व्होकेशनल विभागाची गौरवशाली परंपरा यापुढील काळातही विद्यार्थ्यांनी कायम ठेवावी असे आवाहन कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील यांनी केले. प्रात्यक्षिकावर आधारित व्होकेशनल विभागातील सर्व अभ्यासक्रम आहेत त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. या ठिकाणचे शिक्षण घेऊन उद्योग व नोकरीमध्ये विद्यार्थ्यांनी उंच भरारी मारावी असेही आवाहन प्राचार्य डॉ. अशोक सादळे यांनी केले. व्होकेशनल विभागातील विविध अभ्यासक्रमांची माहिती मनोजकुमार पाटील यांनी सांगितली. साक्षी देसाई, लहू सावंत व साहील कांबळे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. अकरावीच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील ग्रंथालय, कार्यालय, स्टाफ रूम, जिमखाना, संगणक कक्ष व कॅन्टीन याठिकाणी भेट दिली. सर्व विभाग व त्या ठिकाणाहून चालणारे कामकाजाची माहिती संदीप देसाई यांनी करून दिली.कार्यक्रमास सदाशिव मोरे, नेहा पेडणेकर, सुषमा पारकर, तेजस्विनी शेवाळे, अल्बर्ट फर्नांडिस यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी फनी गेम्स व अन्य कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन संदीप देसाई यांनी केले..

🟥’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची घोषणा. – राज्यातील २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा १ हजार ५०० रूपये मिळणार.

मुंबई :- प्रतिनिधी.

राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेमध्ये सरकारचा २०२४-२५ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला. लोकसभा निवडणुकीत झालेल्या महायुतीच्या पराभवामुळे आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राज्य सरकारने या अर्थसंकल्पामधून अनेक लोकानुनयी योजनांची घोषणा केली आहे. या अर्थसंकल्पामध्ये महिलांना केंद्रस्थानी ठेवून काही घोषणा केल्या जातील, असा अंदाज वर्तवला जात होता. त्यानुसार आज अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेनुसार राज्यातील २१ ते ६० वयोगटामधील पात्र महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये दिले जाणार आहेत.
🟥अर्थसंकल्पामधून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करताना अजित पवार म्हणाले की, स्त्री ही कुटुंबाचा आधार असते. आता ती एकूणच समाजाचा केंद्रबिंदू होते आहे. कुटुंबाचं व्यवस्थापन आणि अर्थाजन अशा दोन्ही आघाड्यांवर ती लढत आहे. एकहाती कुटुंब सांभाळणाऱ्या आणि कर्तबगार मुलं घडवणाऱ्या महिलाही आपल्याला पाहायला मिळत आहेत. विविध परीक्षांमधून मुलींची आघाडी दिसून येत आहे. अशा आपल्या कर्तृत्ववान माय भगिनींना संधीची कवाडे आणखी खुली करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, आमच्या लेकी बहिणींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे. महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वावलंबन, आरोग्य आणि पोषणासह सर्वांगिण विकासासाठी या योजनेंतर्गत २१ ते ६० वयोगटामधील पात्र महिलांना सरकारकडून दरमहा दीड हजार रुपये प्रदान केले जातील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले.
🔴सरकारने २०२३-२४ पासून लेक लाडकी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून मुलीच्या जन्मापासून ते १८ वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्या टप्प्याने एक लाख रुपये देण्यात येतात. पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबाता १ एप्रिल २०२३ आणि त्यानंतर जन्माला आलेल्या मुलीला हे अर्थसहाय्य करण्यात येतं. याबरोबरच १ मे २०२४ नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीचं नाव शासकीय कागदपत्रांमध्ये प्रथम त्याचं नाव, नंतर आईचं नाव, मग वडिलांचं नाव आणि अखेर आडनाव या पद्धतीने करणंही बंधनकारक करण्यात आलं आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात महिलांच्या स्वयंरोजगारासाठी पिंक ई रिक्षा योजनेची घोषणा केली होती. योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील १७ शहरांमध्ये १० हजार महिलांना अर्थसहाय्य करण्यात येईल, यासाठी ८० कोटींचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे, अशी माहितीही अजित पवार यांनी यावेळी दिली.

🛑डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेंतर्गत प्रस्तावांची मागणी.

मुंबई.- प्रतिनिधी.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना सन 2024-25 मध्ये राबविणेसाठी शासनाकडून अर्ज स्विकृती प्रक्रीया सुरू करणेत आली आहे. या योजनेत अनु. जाती/ नवबौद्ध शेतक-यांना सिंचन क्षमता निर्माण करणे, सिंचनाखालील क्षेत्र वाढविणे जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणे व त्या अनुषंगाने शेतक-यांना नवीन विहीर र.रू.2,50,000/-, जुनी विहीर दुरूस्ती रू.50,000/-, इनवेल बोअरिंग र.रू.20,000/-, विज जोडणी आकार र.रू.10,000/-, पंप संच र.रू.20,000/-, शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण र.रू.1,00,000/- व सुक्ष्म सिंचन सुविधेअंतर्गत तुषार सिंचन / ठिबक सिंचनासाठी रू.25,000/- ते रु.50,000/- हेक्टरी मर्यादेत अनुदान देय आहे.
सदर योजनेंतर्गत ज्या अनु.जाती / नवबौद्ध शेतक-यांना लाभ घेणेचा आहे अशा शेतक-यांच्या नावे किमान 0.40 हे. व कमाल 6.00 हेक्टर जमीन धारणा आवश्यक आहे. जमिनीचे 7/12, 8 अ उतारे, जातीचा दाखला, आधार कार्ड, बँक खाते पुस्तकाचे पहिले पान, रू.1.50 लाख पेक्षा वार्षिक उत्पन्न कमी असलेबाबत तहसिलदार यांचेकडील दाखला इ. कागदपत्रे आवश्यक असून लाभार्थी निवड ग्रामसभेत करणेत येते. सन 2024-25 साठी अर्ज स्विकृती प्रक्रीया सुरू करणेत आली आहे. अर्ज ऑनलाईन भरावा लागतो व यासाठी महाडीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडून शेतक-यांनी अर्ज करावयाचे आहेत. यासाठी शेतकरी स्वतःचा मोबाईल / संगणक/लॅपटॉप / सामुदायिक सेवा केंद्रे / ग्रा.पं. कडील संग्राम केंद्र इ.च्या माध्यमातून वैयक्तिक लाभार्थी म्हणून अर्ज करू शकतात. यासाठी शेतक-यांनी त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करून घेणे गरजेचे आहे. तरी जास्तीतजास्त शेतक-यांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री.धनंजय जगताप प्रशासक तथा गट विकास अधिकारी (निवड श्रेणी), पं. स. कुडाळ, व श्री.श्याम चव्हाण, सहाय्यक गट विकास अधिकारी, पं. स. कुडाळ यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेचा लाभ घेऊन मागासवर्गीय शेतकरी कुटूंबांना सिंचनाखालील क्षेत्रात वाढ करून उत्पादन वाढ व त्यायोगे स्वतःचा आर्थिक स्तर उंचावणेस मदत होईल असे आवाहनही यावेळी करणेत येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.