Homeकोंकण - ठाणेराज्य सरकारकडून घोषणांचा पाऊस.- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, पिंक रिक्षा खरेदी...

राज्य सरकारकडून घोषणांचा पाऊस.- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, पिंक रिक्षा खरेदी व मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना.🔴वारीच्या प्रतिदिंडीस 20 हजार रुपयांचा निधी.🟥ट्रेन मधून महिलेची बॅग चोरीला! ग्राहक मंचाचे रेल्वेला 1 लाख रुपये भरण्याचे आदेश!!🟥रत्नागिरी जिल्हा न्यायालय आवारात आलेल्या साक्षीदारावर आरोपीचा कोयत्याने हल्ला.- हल्ल्यात साक्षीदार जखमी.

🛑राज्य सरकारकडून घोषणांचा पाऊस.- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, पिंक रिक्षा खरेदी व मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना.
🔴वारीच्या प्रतिदिंडीस 20 हजार रुपयांचा निधी.
🟥ट्रेन मधून महिलेची बॅग चोरीला! ग्राहक मंचाचे रेल्वेला 1 लाख रुपये भरण्याचे आदेश!!
🟥रत्नागिरी जिल्हा न्यायालय आवारात आलेल्या साक्षीदारावर आरोपीचा कोयत्याने हल्ला.- हल्ल्यात साक्षीदार जखमी.

मुंबई:- प्रतिनिधी.

महाराष्ट्र विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक येत्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. त्यामुळे या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राज्य सरकारकडून महिलांना खूश करण्यासाठी त्यादृष्टीने महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या.लाडली बहना योजनेने भारतीय जनता पक्षाला मध्य प्रदेश राज्य जिंकवून दिल्याने महाराष्ट्रातली विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचीच पुनरावृत्ती होण्यााची विद्यमान राज्य सरकारला अपेक्षा असल्याने महिला वर्गाला आकृष्ट करण्यासाठी राज्य सरकारकडून घोषणांचा पाऊस पाडला गेला. यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तसेच महिलांसाठी पिंक रिक्षा खरेदी योजना आदी घोषणा करण्यात आल्या.
🟥मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतंर्गत महिलांना दरवर्षी 3 सिलिंडर मोफत देण्यात येणार असून, याचा अंदाजे दोन कोटी कुटुंबांना फायदा होणे अपेक्षित आहे. महिलांच्या आरोग्याच्या तक्रारी कमी करायच्या असतील तर त्यांना स्वच्छ इंधन देणे ही आपली जबाबदारी आहे, असे सांगत एलपीजी सर्वांत सुरक्षित असल्याने इंधनाचा वापर वाढला पाहिजे. त्यामुळए गॅस सिलेंडर प्रत्येक घराला परवडला पाहिजे यासाठी पात्र कुटुंबाला तीन गॅस मोफत देणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

🔴वारीच्या प्रतिदिंडीस 20 हजार रुपयांचा निधी.

संत श्री तुकाराम महाराजांचं नाव घेत अजित पवारांनी अर्थसंकल्पाची सुरुवात केली. मुख्ममंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. तसेच, वारीसाठी पंढरीकडे प्रस्थान करणाऱ्या नोंदणीकृत दिंड्यांना, प्रतिदिंडी 20 हजार रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.
🟥शेतकऱ्यांना प्रती हेक्टर 5 हजार रुपयांचं सहाय्य, वीज बिल माफ
राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर असल्याचे सांगत ई पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू केली आहे. शेतकऱ्यांना 1 रुपयांत पिक विमा देण्याची योजना कायम असणार आहे. तर, गाव तिथे गोदाम योजना राबवण्यात येत आहे. जुन्या गोदामांची डागडुजी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच राज्यातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रतीहेक्टर 5 हजार रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे. राज्यातील ⁠शेती कृषी पंपाचे सर्व थकित बील माफ करण्यात आल्याचेही अजित पवारांनी सांगितले
.

🅾️मुलींना शिक्षणशुल्क आणि परीक्षा शुल्क माफ

राज्यातील व्यावसायिक शिक्षणात मुलींची संख्या वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून अभियांत्रिकी, वास्तूशास्र, वैद्यकीय तसंच कृषीविषयक अभ्यासाठी प्रवेशीत 8 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षणशुल्क आणि परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील 2 लाख 5 हजार मुलींना होणार असून 2024-25 पासून ही योजना सुरू होत आहे.

🟥मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा.

अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली. या योजनेतून पात्र कुटुंबाना वर्षाला 3 सिलेंडर मोफत देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

🔴शुभमंगल योजनेचा निधी वाढवला.

🔺विवाहित मुलींसाठीच्या शुभमंगल योजनेच्या निधीत वाढ करण्यात आली आहे. या घोषणेंतर्गत आता 10 हजारांऐवजी 20 हजार रुपये निधी देण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
🔺राज्यातील महिलांसाठी 10 हजार पिंक रिक्षा देण्यात येतील, तसेच ⁠नवीन रुग्णवाहिका खरेदी केल्या जातील, अशी घोषणाही अजित पवारांनी केली.
🔺यावर्षी 25 लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याचा शासनाचा विचार आहे. तर, गाईच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी प्रति लिटर 5 रुपयाचे अनुदान 1 जुलैपासून देण्यात येणार.

🟥नवी शासकीय महाविद्यालये स्थापन होणार

राज्यात सध्या 1 लाख लोकसंख्येमागे 84 डॉक्टर्स आहेत. 2035 पर्यंत 1 लाख लोकसंख्ये मागे 100 हून अधिक डॉक्टर्स करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांची प्रवेश क्षमता वाढवणं आवश्यक आहे. त्यासाठी राज्यात 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेची नवी शासकीय महाविद्यालये आणि 430 खाटांची संलग्न रुग्णालये स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार, जालना, हिंगोली, धाराशिव, परभणी, नाशिक,जळगाव, अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, अंबरनाथ येथे ही रुग्णालये उभारण्यात येणार आहे.

🅾️मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना.

मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना जाहीर करण्यात आला आहे. या योजनेनंतर्गत दरवर्षी 10 लाख तरुण- तरुणींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच, दरवर्षी 10 हजार रुपयांचा स्टायफंड या तरुणांना मिळणार आहे.

🟥ट्रेन मधून महिलेची बॅग चोरीला! ग्राहक मंचाचे रेल्वेला 1 लाख रुपये भरण्याचे आदेश!!

नवी दिल्ली :- वृत्तसंस्था

ट्रेनमध्ये एका महिलेचे सामान चोरीला गेल्यानंतर दिल्लीतील एका ग्राहक मंचाने भारतीय रेल्वेला ‘निष्काळजीपणा आणि सेवेचा अभाव’ यासाठी जबाबदार धरले आहे. यासोबतच महिलेला 1 लाख 8 हजार रुपये देण्याचे आदेशही जारी करण्यात आले आहेत. दिल्लीच्या रहिवासी असलेल्या जया कुमारी या मालवा एक्सप्रेसच्या आरक्षित डब्यातून प्रवास करत होत्या. यावेळी त्यांच्याकडील सामान चोरीला गेले. जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाचे (मध्य जिल्हा) अध्यक्ष इंद्रजीत सिंग आणि सदस्य रश्मी बन्सल यांनी या प्रकरणाची सुनावणी केली. जानेवारी 2016 मध्ये दिल्लीहून इंदूरला जात असताना ही घटना घडली होती.
🛑तक्रारदार महिला जया कुमारी यांची बाजू अधिवक्ता प्रशांत प्रकाश यांनी मांडली. जयाच्या म्हणण्यानुसार, जानेवारी 2016 मध्ये झाशी आणि ग्वाल्हेर दरम्यान मालवा एक्स्प्रेसमध्ये तिच्या कोचमध्ये काही लोक उपस्थित होते, ज्यांच्याकडे आरक्षण नव्हते, त्यांनी तिची बॅग चोरली. त्यांनी तात्काळ टीटीईला याची माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच या घटनेबाबत रेल्वे प्रशासनाकडे लेखी तक्रारही करण्यात आली होती. मात्र त्यांच्या तक्रारीवर कोणतीही सुनावणी झाली नाही.

🟥’रेल्वेला संपूर्ण प्रकरणाची सुनावणी करण्याचा अधिकार होता’.

प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास तसेच त्यांच्या सामानाची सुरक्षा सुनिश्चित करणे ही रेल्वेची जबाबदारी असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रार दाखल करूनही पीडित महिलेचे सामान परत मिळालेले नाही. सुनावणीनंतर ग्राहक मंचाने सांगितले की, तक्रारदाराने दिल्लीहून ट्रेन पकडली असल्याने त्यांना इंदूरला जायचे होते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर सुनावणी घेण्याचा अधिकार रेल्वेला होता. ‘विरोधी पक्षाचे’ कार्यालय (महाव्यवस्थापक, भारतीय रेल्वे) आयोगाच्या कार्यकक्षेत होते.

🛑ग्राहक मंचाने रेल्वेचा युक्तिवाद फेटाळून लावला

सुनावणीदरम्यान जया कुमारी यांनी सामान ठेवण्यात निष्काळजीपणा केला होता किंवा त्यांचे सामान बुक करण्यात आले नव्हते, असा रेल्वेचा युक्तिवाद मंचाने फेटाळून लावला. आयोगाने महिलेचे म्हणणे मान्य केले की एफआयआर दाखल करण्यासाठी तिला जागोजागी भटकावे लागले. कमिशनने म्हटले आहे की, ‘वस्तू चोरीला गेल्यानंतर एफआयआर दाखल करण्यासाठी अधिकाऱ्याकडे जाण्यासाठी महिलेला किती त्रास सहन करावा लागला यावरून पीडितेला तिच्या कायदेशीर हक्कांसाठी त्रास आणि छळाचा सामना करावा लागला हे स्पष्ट होते.’रेल्वेच्या निष्काळजीपणामुळे व सेवेच्या अभावामुळे माल चोरीला गेल्याचे ग्राहक मंचाने मान्य केले . महिलेने आरक्षित तिकीट घेऊन प्रवास केला होता, तरीही तिचे सामान चोरीला गेले. आयोगाने म्हटले आहे की, ‘जर रेल्वे किंवा तिच्या कर्मचाऱ्यांकडून सेवेत निष्काळजीपणा किंवा कमतरता राहिली नसती, तर कदाचित ही चोरी झाली नसती…’ त्यामुळे या महिलेचे 80,000 रुपयांचे नुकसान झाले असावे, असा आयोगाने विचार केला. भरपाई या संपूर्ण प्रकरणात आयोगाने महिलेला त्रासासाठी 20 हजार आणि 8 हजार रुपये खर्च देण्याचे आदेशही दिले आहेत.

🔴ट्रेनमधून सामानाच्या चोरीबाबत काय नियम आहे?

आरक्षित डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सामानाच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वेची आहे. प्रवाशांनी आपले सामान सोबत ठेवावे आणि मौल्यवान वस्तू सोबत ठेवाव्यात. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स कडून ट्रेनमध्ये सुरक्षा पुरवली जाते. एखाद्या प्रवाशाचे सामान चोरीला गेल्यास त्याने ताबडतोब रेल्वे कर्मचाऱ्याला याची माहिती द्यावी. प्रवाशांचा अहवाल दाखल करण्यासाठी रेल्वे कर्मचारी मदत करतील. रेल्वे प्रशासन आणि आरपीएफ प्रवाशांच्या एफआयआरच्या आधारे तपास करत आहेत. काही प्रकरणांमध्ये प्रवाशांना भरपाईही मिळू शकते.

🟥रत्नागिरी जिल्हा न्यायालय आवारात आलेल्या साक्षीदारावर आरोपीचा कोयत्याने हल्ला.- हल्ल्यात साक्षीदार जखमी

रत्नागिरी :- प्रतिनिधी.

मारहाणीच्या गुन्ह्यात साक्ष देण्यासाठी रत्नागिरी येथील न्यायालयात आलेल्या साक्षीदारावर त्याच गुन्ह्यातील संशयित आरोपीने कोयत्याने पाठीत वार केला. न्यायालयाच्या आवारातच ही घटना घडल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. या हल्ल्यात साक्षीदार जखमी झाले असून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी स्वरूप राऊत याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
🟥पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारहाणीच्या गुन्ह्यात साक्ष देण्यासाठी रत्नागिरी येथील न्यायालयात आलेल्या साक्षीदारावर त्याच गुन्ह्यातील संशयित आरोपी स्वरूप राऊत याने कोयत्याने पाठीत वार केला. न्यायालयाच्या आवारातच ही घटना घडल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. या हल्ल्यात साक्षीदार योगेश रमेश चाळके हे जखमी झाले असून त्यांना जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले आहे. तर योगेश चाळके यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी स्वरूप राऊत याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ग्रामीण पोलिस स्थानकाच्या हद्दीत सन २०२३ मध्ये मारहाणप्रकरणी स्वरूप राऊत याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच गुन्ह्याची सुनावणी येथील न्यायालयात सुरू असून त्या गुन्ह्यामध्ये योगेश चाळके हे साक्षीदार आहेत.
🔴गुरूवारी गुन्ह्याची सुनावणी असल्याने योगेश चाळके ( ३२, टिके चाळकेवाडी ) व स्वरूप राऊत ( रा. हरचिरी ) त्याचे वडील जयसिंग राऊत हे न्यायालयात हजर होते. साक्ष देऊन योगेश चाळके बाहेर पडत असताना स्वरूप राऊत याने पिशवीतून आणलेला कोयता घेऊन पाठीमागून उजव्या खांद्यावर वार केला. त्यामुळे योगेश चाळके खाली कोसळले. त्यानंतर स्वरूपने पुन्हा कोयता उगारला. परंतु तो हल्ला चुकवताना स्वरूपच्या हातातील कोयतीचे टोक योगेश चाळके यांच्या पाठीत घुसले. यामध्ये ते रक्तबंबाळ झाले. न्यायालयाच्या आवारातच संशयित आरोपीने साक्षीदारावर कोयतीने हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेची माहिती तेथील पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ स्वरूप याला ताब्यात घेतले. त्यानंतर जखमी झालेल्या योगेश चाळके यांना जिल्हा शासकीय रूग्णालयात तातडीने दाखल केले. याप्रकरणी योगेश चाळके यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी स्वरूप राऊत याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.