🛑व्यंकटराव प्रशालेत.- आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन विविध उपक्रमांनी संपन्न.
🛑 शिवसेना वैद्यकीय मदत कक्षपदी.- धनश्री देसाई यांची – आजरा गडहिंग्लज-चंदगड-भुदरगड तालुका- कक्ष प्रमुख पदी निवड,
🛑 स्वच्छता अभियान म्हणजे मुर्खांचा बाजार आणि येड्यांची जत्रा ! – महेंद्र कुंभारे.- कामगार नेते, भिवंडी
सह्याद्री न्युज.- अपडेट.
व्यंकटराव प्रशालेत.- आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन विविध उपक्रमांनी संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.

आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा व आजरा तहसील कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी आजरा तहसीलदार समीर माने यांचे अध्यक्षतेखाली नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांनी माहितीच्या अधिकारासंदर्भात व्यंकटराव प्रशालेतील इयत्ता अकरावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. व या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी भाषणातून, वक्तृत्व स्पर्धेतून, चित्रकला स्पर्धेतून आपले मत, विचार मांडणे आवश्यक आहे व त्यातूनच समाज प्रबोधन घडणे हे उपक्रमाचे सार आहे असे सांगितले. यावेळी तहसील कार्यालयातील श्री विकास कोलते महसूल नायब तहसीलदार आजरा, शिवराज देसाई तलाठी आजरा व सुरेश कांबळे महसूल सहाय्यक तसेच व्यंकटराव प्रशालेचे प्राचार्य आर जी कुंभार, प्राध्यापक शिवाजी पारळे, आर एस कांबळे , कृष्णा दावणे, मस्कर सर उपस्थित होते.
🛑 शिवसेना वैद्यकीय मदत कक्षपदी.- धनश्री देसाई यांची – आजरा गडहिंग्लज-चंदगड-भुदरगड तालुका- कक्ष प्रमुख पदी निवड,
आजरा.- प्रतिनिधी.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षपदी.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या आजरा- गडहिंग्लज-चंदगड-भुदरगड तालुका- कक्ष प्रमुख या पदासाठी आपली ६ महिन्या करिता निवड करण्यात येत असल्याचे निवड पत्र देण्यात आले आहे.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आपण गोर-गरीब, गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांत (१०+१०%) राखीव खाटा उपलब्ध करुन देणे, निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांवर पुर्णत: मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भातील मदत तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया मोफत करणे संदर्भात योग्य मार्गदर्शनासाठी सदैव तत्पर रहावे. गंभीर महागड्या शस्त्रक्रिया करावयाच्या असलेल्या गोरगरीब-गरजू रुग्णांना भरीव प्रमाणात अर्थ सहाय्य व्हावे याकरीता पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी. श्री. सिध्दिविनायक ट्रस्ट, टाटा ट्रस्ट यांसारख्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी थेट शिवसेना भवन येथील मुख्य कार्यालयास संपर्क साधावा.
रामहरी राऊत कक्षप्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष (महाराष्ट्र राज्य) यांनी दिलेल्या निवड पत्रात म्हटले आहे.
स्वच्छता अभियान म्हणजे मुर्खांचा बाजार आणि येड्यांची जत्रा ! – महेंद्र कुंभारे.- कामगार नेते, भिवंडी
मुंबई.- प्रतिनिधी.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ भारत पंधरवडा संपूर्ण भारतात राबविण्यात येत आहे. त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत १ तारीख १ तास श्रमदान करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागल्या. रविवार हा सुट्टीचा दिवस असूनही सर्व शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, आजी माजी नगरसेवक, आमदार , खासदार, नेते मंडळी २ ऑक्टोबर या दिवशी सुट बूट आणि पांढरे शुभ्र कपडे घालून हातात झाडू घेऊन रस्त्यावर स्वच्छता करायला निघाले. मात्र, यापैकी किती जणांनी खरोखरच रस्त्यावर झाडू मारुन कचरा काढला? किती लोकांनी यांना स्वच्छता करताना पाहिले? यांनी फोटो सेशन मात्र जोरदार केले. यांचे फोटो सेशन झाल्यानंतर रोज या कचऱ्यात मर मर मरणारा माझ्या सफाई कर्मचाऱ्यांनीच ठिक ठिकाणची स्वच्छता केली.
अशी एका दिवसात स्वच्छता करून असे काय मिळविले? सरकारने फक्त स्वतःची जाहिरातबाजी केली. या एकाच दिवशी स्वच्छता अभियान राबविण्यापेक्षा दर दिवशी राबवावे. तरच आपले परिसर, क्षेत्र आणि संपूर्ण देश स्वच्छ राहिल. तसेच स्वच्छता अभियानाचे जनक, आद्यप्रवर्तक संत गाडगेबाबा यांच्या नावाने अभियान सुरु करायला हवे होते. त्याकाळी गाडगेबाबांनी स्वतः हातात झाडु घेऊन गावोगावी स्वच्छता केली होती. ते खरे समाजसुधारक आहेत. या अभियानावर करोडो रूपयांचा खर्च करूनही स्वच्छता मात्र ‘जैसे थे’ च आहे. इतकी स्वच्छता करूनही गटार, नाले भरलेलेच आहेत. या गटारातील गाळ पांढरे शुभ्र कपडे घातलेल्या नेत्यांनी काढायला हवे. तरच त्यांना खऱ्या श्रमाची जाणीव होईल. गटार साफ करताना किती श्रम लागते हे सफाई कर्मचाऱ्यांनाच विचारा. शिवाय अशा घाणीत, दुर्गंधीत काम करुन सार्वजनिक आरोग्य अबाधित राखणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी मात्र शासन घेत नाही. या एका दिवसाच्या स्वच्छता अभियानात एका विशिष्ट ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांकडूनच काम करुन घेतले जाते. मात्र, रोजच्या ठिकाणची सफाई तशीच राहते. ती दुसऱ्या दिवशी त्याच सफाई कर्मचाऱ्यांना करताना त्याला जास्त श्रम खर्ची करावे लागते.

ज्या देशातील लोकांना शौचास कुठे बसावे हे सांगावे लागते आणि स्वच्छता किती महत्त्वाची हे पटवून द्यावे लागते त्या देशाचा प्रमुख विश्वगुरु कसा असू शकतो? म्हणजे इतर देश अस्वच्छ आणि घाणेरडे आहेत का? सरकारने ही सर्व भंपकबाजी बंद करुन जनतेला शिक्षण, आरोग्य मोफत देऊन तरूणांना रोजगार, शेतकऱ्यांना हमी भाव आणि ज्या समाजाची जितकी संख्या त्याप्रमाणे आरक्षण दिल्यास समाज आपोआप प्रबळ होईल. त्यावेळी त्याला स्वच्छतेचे महत्व सांगण्याची गरजच पडणार नाही. सरकारचा हेतु शुध्द असेल तर समाजा समाजात फुट पाडण्यापेक्षा राज्य घटनेत नमूद असल्याप्रमाणे सर्वधर्मसमभावाचे पालन करुन देशाला प्रगती पथावर न्यावे. आणि ही येड्यांची जत्रा, नौटंकी बंद करावी.
