गारगोटी ते निगडी बससेवा सुरू – आम. प्रकाश आबिटकर
गारगोटी प्रतिनिधी,
भुदरगड तालुक्यातील अनेक नागरीक निगडी (जि.पुणे) येथे नोकरी, उद्योग व व्यावसायानिमित्य वास्तव्यास आहेत. यानागरीकांच्या सोईकरीता गारगोटी बसस्थानकातून गारगोटी ते निगडी नियमित बससेवा सुरू आमदार प्रकाश आबिटकर यांच्या शुभहस्ते व आगार प्रमुख यांच्या उपस्थित करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले की, भुदरगड तालुक्यातील अनेक नागरीक निगडी येथे वास्तव्यास आहेत. या सर्व प्रवाशांना निगडी येथे जाण्यासाठी कोल्हापूर अथवा खाजगी ट्रॅव्हल्सने जावे जागते. यामध्ये प्रवाशांची गैरसोय होत असे. याबाबत निगडी येथे वास्तव्यास असणाऱ्या नागरीकांना गारगोटी आगारातून निगडी येथे बससेवा सुरू करण्याची मागणी माझेकडे केली होती. त्याअनुषंगाने गारगोटी आगारामध्ये नव्याने दाखल झालेल्या 5 हिरकणी बसमधील 1 बस निगडी करीता उपलब्ध करून देण्याच्या सुचना आगार व्यवस्थापक यांना केल्या होत्या. त्यानुसार सदरील गाडी सुरू करण्याकरीता आवश्यक त्या परवानग्या घेवून या गाडीचा शुभारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे निगडी येथे वास्तव्यास असणाऱ्या प्रवाशांची सोय झाली असल्याचे ते म्हणाले. यावेळी आगार व्यवस्थापक परशुराम नकाते, कार्यशाळा अधिक्षक श्री.चौगले, सुर्यवंशी मॅडम, प्रमुख कारागीर श्री.कोळी, श्री.बुगडे, अरुण मोरे, सुहास भोई यांच्यासह प्रमुख मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते.
