मुरूक्टे ते दिंडेवाडी रस्ता करण्यासाठी 3 कोटी 76 लाख रुपयांचा निधी मंजूर – आमदार प्रकाश आबिटकर
गारगोटी प्रतिनिधी,
भुदरगड तालुक्यातील महत्वपुर्ण असणारा मुरूक्टे ते दिंडेवाडी रस्ता नागणवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या पाण्या्मुळे बाधीत झाला होता. यामुळे वाहतूकीस मोठ्या प्रमाणात अडचण येत होती. यामुळे सदर ठिकाणी रस्ता करण्यासाठी 3 कोटी 76 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे सांगितले आहे.
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, भुदरगड तालुक्यातील इजिमा क्र.109 मुरूक्टे ते दिंडेवाडी हा रस्ता अतिमहत्वाचा तसेच अतिवाहतूकीचा रस्ता आहे. सदरचा रस्त्याची ३५० मी. लांबी ही या रस्त्याच्या लागून असणाऱ्या नागनवाडी मध्यम प्रकल्पामुळे बाधीत झाली आहे. त्यामुळे मुरुक्टे व दिंडेवाडी हया गावाचा संपर्क खंडीत झाला आहे. यामुळे सदर मार्गावर बारमाही वाहतूकीसाठी नागणवाडी मध्यम प्रकल्पाच्या बॅकवॉटरमधून जाणारा सदरील रस्ता संशोधन व विकास कार्यक्रम अंतर्गत प्रस्तावित असून कायमस्वरुपी रस्ता होणेसाठी ६३० मीटर लांबीचा रस्ता करणे आवश्यक आहे. सदर रस्त्यासाठी मुरूक्टे दिंडेवाडी सह पंचक्रोशीतील नागरीकांची मागणी होती. त्याअनुषंगाने ग्रामविकास मंत्री गिरीषजी महाजन यांचेकडे सदर रस्त्यास विशेषबाब म्हणून वाढीव निधी मंजूर करावा याकरीता लेखी निवेदन दिले होते. त्याअनुषंगाने ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी इजिमा 109 मुरूक्टे ते दिंडेवाडी रस्ता करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-2 संशोधन व विकास अंतर्गत 3 कोटी 76 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सदर रस्त्याचे काम लवकर सुरू करण्यात येणार असून येथील नागरीकांचा वाहतूकीचा प्रश्न निकाली निघणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
.