HomeUncategorizedइथेनॉल प्रकल्प उभारण्याचे व्यवस्थापनाचे नियोजन.- चेअरमन सुनील शिंत्रे. ( आजरा साखरच्या ३३...

इथेनॉल प्रकल्प उभारण्याचे व्यवस्थापनाचे नियोजन.- चेअरमन सुनील शिंत्रे. ( आजरा साखरच्या ३३ व्या सभेत.- तज्ञ संचालकाकडून ताळेबंद खोटा व चुकीचा असल्याचा आरोप.- सभासदांनी विचारला संचालकाला जाब.)

इथेनॉल प्रकल्प उभारण्याचे व्यवस्थापनाचे नियोजन.- चेअरमन सुनील शिंत्रे. ( आजरा साखरच्या ३३ व्या सभेत.- तज्ञ संचालकाकडून ताळेबंद खोटा व चुकीचा असल्याचा आरोप.- सभासदांनी विचारला संचालकाला जाब.)

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील आजरा शेतकरी सहकारी साखर कारखानाची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. ३० रोजी संपन्न झाली. अध्यक्षस्थानी चेअरमन सुनील शिंत्रे होते. स्वागत संचालक मुकुंदराव देसाई यांनी केले.
सभेच्या सुरुवातीस दिपप्रज्वलन व संस्थापक चेअरमन कै.वसंतराव देसाई व कै अमृताकाका देसाई त्यांचे फोटो पूजन संचालक वसंतराव धुरे यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानावरून चेअरमन श्री शिंत्रे बोलताना म्हणाले आजरा साखर कारखाना सन २०१७ मध्ये कार्यान्वित झाला आहे आज अखेर कारखान्यावर साखर उत्पादन सोडून इतर कोणतेही उपपदार्थाचे उत्पादन होत नाही. सद्यस्थितीमध्ये साखर उत्पादनामुळे कारखाना आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरत नसल्याने कारखान्यावर १०५ के. एल. पी. डी क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प उभारण्याचे व्यवस्थापनाने ठरवलेले असून प्रकल्पाकरिता अत्यावश्यक केंद्र शासनाचे इरादा पत्र प्राप्त झाले आहे. परंतु एनव्हारॉनमेंटल क्लिअरन्स मिळणेस अडचणी येत आहेत. त्यासाठी शासन दरबारी व्यवस्थापनामार्फत प्रयत्न केले जात आहेत. तसेच टाऊन प्लॅनिंग परवाना प्रदूषण नियंत्रण मंडळ संमती पत्रे एक्साईज परवाना एक्सप्लोजिव्ह परवाना इत्यादी परवाने घेणे करता प्रयत्न केले जात आहेत. कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता प्रकल्प उभा करण्यास पुरेसा निधी उभा करणे अडचणीचे असल्याने सद्यस्थितीत बांधा, वापर व हस्तांतर करा ( BOOt) या तत्त्वावर प्रकल्प उभा करणे सोयीचे होणार आहे. त्यासाठी सद्याचा विचार व विषय आपण मंजुरीसाठी ठेवावा व यापुढे भविष्यात कारखाना चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील राहिल यावेळी कारखाना स्थापनेपासून आजतागायत कारखाना सुरळीत चालण्यासाठी राज्यातील व जिल्ह्यातील ज्या नेत्यांचे व मंत्री महोदय व बँकांचे सर्व अधिकाऱ्यांचे कामगारांचे सहकार्य झाले त्यांचे आभार मानले.
प्रभारी कार्यकारी संचालक व्ही. के. ज्योती. यांनी अहवाल वाचन केले सभासदाकडून सर्व ठराव मंजूर करण्यात आले.
तर साखर कारखान्याला माजी आमदार कै. वसंतराव देसाई यांचे नाव देण्याच्या ठरावाला कारखाना अगोदर व्यवस्थित सुरळीत चालू करा व एका चांगल्या संस्थापकाचे नाव द्या. अन्यथा कारखान्याला नाव देऊ नये असा विरोध सभासदाकडून करण्यात आला याबाबतचा विषय सभासद संपत देसाई यांनी मांडला. या सर्वसाधारण वार्षिक सभेला व्हा. चेअरमन आनंदा कुलकर्णी, संचालक अशोक चराटी, विष्णू केसरकर, वसंतराव धुरे, श्रीमती अंजना रेडेकर, मधुकर देसाई, दिगंबर देसाई, मारुती घोरपडे, सुनिता रेडेकर, मुकुंदराव देसाई, लक्ष्मण गुडुळकर, राजेंद्र सावंत, अनिल फडके, सौ. विजयालक्ष्मी देसाई, जनार्दन टोपले, आनंदा कांबळे, विलास नाईक, सह सभासद दीपक देसाई, उदयराज पवार, अभिषेक शिंपी, विठ्ठलराव देसाई, राजू होलम, काशिनाथ तेली, संभाजी पाटील, युवराज पोवार, युवराज येसणे, संजय सावंत सह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री गिलबिले यांनी सूत्रसंचालन केले तर संचालक अनिल फडके यांनी आभार मानले

चौकट.

तानाजी देसाई तज्ञ संचालकाकडून ताळेबंद अहवाल खोटा व चुकीचा असल्याचा व्यासपीठावरूनच आरोप.-
प्रभारी कार्यकारी संचालक श्री ज्योती अहवाल वाचन करत असताना मध्येच हातामधून माईक घेऊन शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष व आजरा साखर कारखान्याचे तज्ञ संचालक यांनी संचालक मंडळाने विश्वासात न घेता ताळेबंद खोटा व चुकीचा तयार केला असल्याचा आरोप केल्याने वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांमध्ये खळबळ उडाली व काही सभासदांनी श्री देसाई यांना जाब विचारला आपण संचालक असताना व्यासपीठावरून माईक हातातून घेऊन अशा पद्धतीचे आरोप करता कसे यामुळे श्री देसाई व सभासदांच्या मध्ये खडा जिंगी उडाली

या वार्षिक सभेला.- सभासद इंद्रजीत देसाई, संपत देसाई, सुनील शिंदे, निवृत्ती कांबळे, शांताराम पाटील, हरिबा कांबळे, तानाजी राजाराम, यांनी कारखान्याच्या हिताचे प्रश्न उपस्थित केले अर्जानी मागणी केलेल्या प्रश्नाला लेखी स्वरूपात प्रश्नांची उत्तरे समाधानकारक दिली जाणार असल्याचे चेअरमन शिंत्रे यांनी सांगितले.

आजरा साखरचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार कै. वसंतराव देसाई यांचे कारखान्याला नाव देण्याचा प्रस्तावाबाबत विचार विनिमय करण्यासाठी व वार्षिक सभेसाठी देसाई कुटुंबातील कै. वसंतराव देसाई यांच्या पाच कन्या व जावई सभेला उपस्थित होत्या. परंतु सभेत ठराव मंजूर होऊन देखील कारखाना तोट्यात असताना एका चांगल्या व्यक्तीचे नाव देऊन कारखाना आणखी आर्थिक संकटात अडकल्यास नावाची बदनामी होऊ नये यासाठी अगोदर कारखाना सक्षम करा व कारखान्याला कै. वसंतराव देसाई यांचे नाव द्या. असे एकमताने सभासदांनी सांगितले.

चौकट

कोटी नफ्याचा ताळेबंद बोगस व बनावट – सभासदांची फसवणूक –
तज्ञ संचालक तानाजी देसाई ( प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती.) कारखाना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जाणीवपूर्वक नफ्याचा ताळेबंद सादर केला.

आजरा साखर कारखान्याचे तज्ञ संचालक तानाजी देसाई यांनी प्रसिद्धी पत्रक दिली आहे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे आजरा साखर कारखान्याच्या झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मी चेअरमन यांनी सादर केलेल्या कारखान्याच्या एक कोटी नफ्याच्या ताळेबंद बोगस बनावट व सभासदांची फसवणूक करणारा आहे संस्थेच्या अहवालात वर्षात १९ कोटी ५५ लाख तोटा झालेला ही वस्तुस्थिती मी मांडली आहे. ती वास्तव्य व खरी आहे. त्याचा खुलासा त्यांनी करायला पाहिजे होता पण आपल्या समर्थकांकडून मला दाबण्याचा प्रयत्न केला पण मी माझी भूमिका पूर्णपणे मांडली संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये खोट्या नफ्याचा विरोध केला माझे मत विचारात घेतले नाही.
सभासदांना विश्वासात घेऊन कारखान्याचा कारभार करावा अशी माझी भूमिका होती पण जर्मनी यांनी जुमानले नाही. कारखाना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जाणीवपूर्वक नफ्याचा ताळेबंद सादर केला याला आमचा विरोध आहे असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात तज्ञ संचालक श्री देसाई यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.