HomeUncategorizedप्रेमाचा संदेश देणाऱ्या .- काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा.- आजरा...

प्रेमाचा संदेश देणाऱ्या .- काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा.- आजरा काँग्रेसचे पत्रकार परिषदेतून अवाहन.

प्रेमाचा संदेश देणाऱ्या .- काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा.- आजरा काँग्रेसचे पत्रकार परिषदेतून अवाहन.

आजरा.- प्रतिनिधी.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व मा. मंत्री सजेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली रविवार दि.३ रोजी जनसंवाद यात्रेला सुरुवात होणार असून या जनसंवाद यात्रेमध्ये काँग्रेस पदाधिकारी यांच्यासह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आजरा नगरपंचायत चे नगरसेवक अभिषेक शिंपी व किरण कांबळे यांनी पत्रकार परिषदेत केले.
स्वागत श्री कांबळे यांनी केले यावेळी जनसंवाद यात्रेची माहिती देताना श्री शिंपी म्हणाले जनसंवाद यात्रा प्रेमाचा संदेश घेऊन येणारी यात्रा आहे देशात सुरू असलेले राजकारण या धर्तीवर असून चंदगड मधून यात्रेला सुरुवात होणार व हांदेवाडी येथे आगमन होईल व कोळींद्रे, किणे, शिरसिंगी, वाटंगी, अशी पाई यात्रेने आजाराकडे येण्यास सुरुवात होईल. पुढे हनबरवाडी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस पुष्पहार घालून आजरा शहराकडे यात्रा पुढे येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून धर्मवीर छत्रपती महाराज संभाजी चौक आजरा येथे सायं ७.३० वा. सभा होणार आहे.
या जनसंवाद यात्रेत जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व आमदार सर्व प्रमुख पदाधिकारी आजरा तालुक्यातील गोकुळ संचालिका अंजनाताई रेडेकर जयवंतराव शिंपी नगरसेवक तसेच नगरसेविका सिमा पोवार, सुमैय्या खेडेकर, रेश्मा सोनेखान, यास्मिन बुड्ढेखान, तसेत माजी. प. स. सदस्य बशीर खेडेकर, नौशाद बुड्ढेखान वारकरी संप्रदाय मंडळे, धनगर समाज, विविध समाजाचे लोकप्रतिनिधी भजनी मंडळ, आपल्या तालुक्यातील सर्व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते, विविध चळवळी यात्रेत सहभाग नोंदवून आपले विचार मांडणार आहेत. तरी या जनसंवाद यात्रेत साठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आजरा काँग्रेस वतीने आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.