गिरणी कामगारांचे प्रलंबित प्रश्न शासनाने मार्गी लावावे.- काँ. शांताराम पाटील
( हक्काची घरे मिळाली पाहिजे. आजरा येथे गिरणी कामगाराचा रास्ता रोको.)
आजरा.- प्रतिनिधी.

गिरणी कामगारांचे प्रलंबित प्रश्न शासनाने मार्गी लावावे अन्यथा २०२४ ला राज्यातील १२ लाख गिरणी कामगार सह वारसदार योग्य निर्णय घेलील व सत्तेतून भाजप सेना सरकारला पायउतार करतील असा इशारा आजरा येथील गिरणी कामगार संघटनेच्या रास्ता रोखो आंदोलनात देण्यात आला. गिरणी कामगारांना मुंबईत गिरणील जागेतच हक्काची घरे मिळण्यासाठी शासनाला आमच्या भावना कळवणे बाबत आजरा येथे रास्ता रोखो करण्यात आला. गिरणी कामगारांच्या वतीने सर्व श्रमिक वेब मार्फत शासनाकडे आपल्या न्याय हक्कासाठी सातत्याने आंदोलने व रस्ता रोको करून करत शासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत दि.३० रोजी मोर्चाने जावून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले शासन खोटी आश्वासने देऊन वेळ काढून धोरण अवलंबत आहे. आम्ही गिरणी कामगार सहन करणार नाही, असे बोलताना काँ शांताराम पाटील म्हणाले यावेळी काँ. शिवाजी सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलकांनी अर्धा तास रास्ता रोको केला. यामुळे काही काळ वहातुक टप्प झाली होती.
यावेळी कॉ. शिवाजी सावर, काँ. नारायण भंडागे, गोपाळ गावडे, शाहीर राजाराम श्री. भोसले, दौलत राणे, शांताराम परेिट, हणमन खामकर, लक्षण पाटील,अर्जुन घेवडे, मनवा बोलक सह गिरणी कामगार वारस उपस्थित होते.