चाफवडे नवीन वसाहतीत भव्य सत्संग भवनचे भुमीपुजन सोहळा संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.
संत निरंकारी मंडळ दिल्ली (रजी.) यांच्या वतीने नविन वसाहत चाफवडे ता.आजरा येथे दि. १७ फेब्रुवारी रोजी सायं. ७.०० वा. प. आ. सुखदेव जी सिंह जी (जनरल सेक्रेटरी संत निरंकारी मंडळ दिल्ली) व श्री अमरलाल निरंकारी जी ( झोनल इन्चार्ज, कोल्हापूर क्षेत्र ) यांच्या उपस्थितीत भव्य सत्संग भवन चे भुमीपुजन सोहळा संपन्न झाला. २३ गु़ंठे जाग्यामध्ये भव्य अशा वास्तूची लवकरच उभारणी होईल, त्यामध्ये सत्संग हॉल, ग्रंथालय, दवाखाना, विश्रांती गृह अशा सुसज्ज सुविधेसह पर्यटनाला चालना देणारी वास्तू उभारण्यात येईल. जागेसभोवती आर.सी.सी. सात फुटी कंपाऊंड कमी वेळेत पुर्ण झाले आहे. मानवता हाच धर्म असून ती टीकविण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. आपण प्रत्येक व्यक्तीने कमीतकमी एक व्यक्ती निरंकारी मिशन ला जोडावा तसेच दिलेल्या बजेट पेक्षा कमी खर्चात कंपाऊंड बांधल्याबद्दल ग्रामस्थांचे कौतुक केले असे अनमोल विचार सिंह जी यांनी मांडले. सदरच्या कार्यक्रमास रमेश लाल, वादवानीजी, अशोक आहुजा जी, आनंद पोवारजी, पांडुरंग धडामजी, पांडुरंग चव्हाण, विलास धडाम, राजाराम घूरे, विलास सुपल, जानबा देवलकर, विजय पाटील सह ग्रामस्थ तालुक्यातील निरंकारी महाराज उपस्थित होते.