व्यंकटराव हायस्कूलच्या संघाचे घवघवीत सुयश.- कबड्डी संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड. / — आजरा भाजी मार्केट व्यापारी गणेशोत्सव मंडळाचे आरोगशिबिर संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा येथील व्यंकटराव हायस्कूलच्या येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये व्यंकटराव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या कबड्डी सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला आत्मविश्वासाने सुनियोजित खेळ करत तब्बल ३१ गुणांनी हरवले या घवघवीत सुयशाने व्यंकटराव हायस्कूलच्या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.. खेळाडू. विनोद मनोहर नाईक,कार्तिक प्रकाश गिलबिले,प्रतीक संजय चाळके, यश राज संतोष कुंभार,हर्षवर्धन बाळू घुरे, सुरेश सागर भालेकर,साहिल दीपक पाटील, आदित्य प्रभाकर पाटील, प्रणव विलास सावंत, उज्वल विश्वजीत मुंज,संकेत संतोष पाटील
या प्रशालेतील खेळाडूंना प्रेरणा प्रोत्साहन मिळावे म्हणून प्राचार्य श्री आर जी कुंभार, क्रीडाशिक्षक एस एम पाटील, श्री एम एम देसाई, श्री प्रभू सर, श्री भोये सर, श्री व्ही.एच गवारी, कृष्णा दावणे, शिंगटे सर, प्रत्यक्ष विद्यार्थ्यासमवेत क्रीडांगणावर उपस्थित होते. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष मा श्री जयवंतराव शिंपी सर्व संचालक मंडळ प्राचार्य आर जी कुंभार पर्यवेक्षिका सौ व्ही जे शेलार त्यांचे प्रोत्साहन लाभले. व क्रीडा शिक्षक सुनील पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले… जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झालेल्या या मुलांच्या संघाचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
आजरा भाजी मार्केट व्यापारी गणेशोत्सव मंडळाचे आरोगशिबिर संपन्न.