HomeUncategorizedआजरा एसटी आगाराचे १० दिवसात वेळापत्रक पूर्वीप्रमाणे करा.- शिंदे शिवसेना व सरपंचांची...

आजरा एसटी आगाराचे १० दिवसात वेळापत्रक पूर्वीप्रमाणे करा.- शिंदे शिवसेना व सरपंचांची मागणी.

आजरा एसटी आगाराचे १० दिवसात वेळापत्रक पूर्वीप्रमाणे करा.- शिंदे शिवसेना व सरपंचांची मागणी.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा- गडहिंग्लज एसटी आगाराचे वेळापत्रक हे कोलमडल्यामुळे प्रवासी वर्गाला व शालेय विद्यार्थ्यांना याचा त्रास होत आहे. याबाबत वेळोवेळी पुर्वी प्रमाणे नियमित फेऱ्या चालू करा असे अनेक वेळा ग्रामीण भागातील वेगवेगळ्या गावातून निवेदन देऊन तोंडी लेखी मागणी करून देखील दखल घेतली जात नसल्याने आजरा तहसील कार्यालयात तहसीलदार समीर माने यांच्या अध्यक्षतेखाली गडहिंग्लज व आजरा विभागाचे डेपो मॅनेजर व अधिकारी यांची तालुक्यातील ज्या विभागात फेऱ्या बंद आहेत त्या विभागातील सरपंच प्रवासी व शिंदे शिवसेना तालुका अध्यक्ष संजय पाटील यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत प्रशासनाला गावातील आबालवृद्ध नागरिक, महिला, शाळा व कॉलेजची मुले-मुली यांना तालुक्याच्या ठिकाणी प्रवास करणे संदर्भात एसटीचे वेळापत्रक चुकीचे असून सदर बाबत ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे एसटी उपलब्ध करून देण्याबाबत आजरा- गडहिंग्लज एसटी प्रशासनाला वेळोवेळी तोंडी सूचना व पत्रव्यवहार केलेले असूनही त्यांच्याकडून योग्य ती उपाय योजना करणेत आलेली नाही. त्यामुळे नाइलाजास्तव नागरिकांना लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याची परिस्थिती निर्माण झाली
असून सदर एसटी फेऱ्या बाबत खात्रीशीर मार्गाने तोडगा काढण्यासाठी दोन्ही विभागाच्या प्रशासनासोबत अथवा विभागीय स्तरावरील अधिकान्यांच्या सोबत बोलाविण्यात यावी. ने देऊन प्रवाशांना दिलासा देत मदत करावी
यामध्ये आजरा व गडहिंग्लज आगार प्रमुखांनी आपल्या विभागात सद्यस्थितीला गाड्या कमी असल्यामुळे काही प्रमाणात बदल करण्यात आले आहेत आपल्या मागणीचा प्रस्ताव आम्ही वरिष्ठांना कळवतो व ज्या विभागात एसटी फेऱ्या होणे गरजेचे आहे त्या विभागात एसटी फेऱ्या होण्यासाठी आम्ही सहकार्य करतो असे सांगितले कोरोनापूर्वीच्या वेळापत्रकानुसार एसट्या ठेऱ्या नाही चालू झाल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार असल्याचा यावेळी इशारा देण्यात आला. यावेळी संजय सावंत, विजय थोरवत, एस आर देसाई, सुनील दिवटे, संतोष चौगुले, इंद्रजीत देसाई शशिकांत शिंदे, संतोष भाटले, रणजीत सरदेसाई, बबन चौगुले, अनिल डोंगरे, सह भादवण, वडकशिवाले, कोरीवडे, देव कांडगाव , गवसे विभागातील सरपंच उपसरपंच पदाधिकारी मोठ्या संख्येने या बैठकीत उपस्थित होते.


कोरोनापूर्वीप्रमाणे वेळापत्रक करा.-

महागोंड – वडकशिवाले या मार्गावर यापूर्वी पाच फेऱ्या होत्या सद्यस्थितीला सकाळ व संध्याकाळ अशा दोनच फेऱ्या होतात तसेच भादवण, सोहाळे फेरी बंद करून देवकांडगाव एसटीमध्ये प्रवाशांना बसायला जागा नसतो त्यामुळे पूर्वीप्रमाणे सोहाळे फेरी चालू करावी. अशा ज्या – ज्या विभागात पूर्वी एसटी फेऱ्या होत होत्या त्या बंद झालेल्या गावातील सरपंच व प्रवाशांनी मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.